आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
न्यूमॅरिक कि-पॅडचा वापर खूप ठिकाणी केला जातो. तुम्ही खूप ठिकाणी या कि-पॅडचा वापर होताना पाहिला असेल. टेलिफोन, मोबाईल हँडसेट आणि रिमोट कंट्रोल यांसारख्या जवळजवळ सर्वच डिव्हाइसेस मध्ये या कीपॅडचा झालेला वापर तुम्ही पहिला असेलच.
या प्रत्येक कि-पॅडच्या ५ या अंकाच्या ठिकाणी उठाव डॉट किंवा बार असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहेत का – की या डॉट किंवा बारचा उपयोग काय असतो? याचा वापर करण्यामागे काही तरी उद्देश असेल का? नक्की कशामुळे या डॉटला प्रत्येक कि-पॅडमध्ये स्थान मिळाले आहे.
असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील, तर त्याची उत्तरं तुम्हाला आज मिळतील. हा डॉट असण्याला आणि त्याची जागा निश्चित असण्याला काही कारणं आहेत. जी जाणून घेणं खूपच मजेशीर आहे.
चला तर मग, जाणून घेऊ या ह्या डॉटचा वापर करण्यामागे काय उद्देश असतो ते…
कि-पॅडमधील ५ या अंकावर असलेला उठाव बार किंवा डॉट हा खासकरून अंध व्यक्तींना या कि-पॅडचा वापर करता यावा यासाठी देण्यात आलेला असतो. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलंय. अंध व्यक्तींना ही उपकरणे नीट वापरता यावीत, यासाठी हा छोटासा डॉट मदत करतो.
न्यूमॅरिक कि-पॅडमध्ये ५ हा अंक मध्यभागी असतो. त्यामुळे या डॉट किंवा बारच्या आधारे अंध व्यक्तींना संपूर्ण कि-पॅडचा अंदाज बांधणे शक्य होते. आपल्याला माहित आहे की, ५ या अंकाच्या बरोबर वरती ८ हा अंक असतो, तसेच ५ अंकाच्या बरोबर खाली २ हा अंक असतो.
त्याचप्रमाणे डावीकडे ४ आणि उजवीकडे ६ हे अंक असतात. ४ या अंकाच्या वर ७ आणि खाली १ हा अंक असतो आणि ६ या अंकाच्या वर ९ आणि खाली ३ हा अंक असतो. अशी ही या कि-पॅडची रचना असते.
५ हा अंक मध्यभागी असल्याकारणाने अंध व्यक्ती हाताची हालचाल जास्त न करता संपूर्ण कि-पॅड योग्यप्रकारे हाताळू शकतात. तसेच नंबरही सहज डायल करू शकतात.
जरी सुरुवातीस या कि-पॅडची रचना अंध व्यक्तींसाठी करण्यात आली असली तरी, या गोष्टीचा उपयोग डोळस लोकांना सुद्धा खूप होतो. या सोयीमुळे कि-पॅड न पाहता आपण नंबर किंवा अंक डायल करण्यास सक्षम बनतो.
हा बार किंवा डॉट रात्री किंवा अंधारामध्ये खूप उपयुक्त ठरतो. संगणकाच्या की-बोर्डवर देखील F आणि J या दोन बटनांवर सुद्धा हा उठावदार बार असतो. या दोन बटणांद्वारे आपण संपूर्ण की-बोर्ड हाताळू शकतो.
कीबोर्डकडे न पाहता टाईप करण्यासाठी या दोन बटणाचा आधार घेता येऊ शकतो. यामुळे तुही फक्त स्क्रीनकडे पाहत राहू शकता. साहजिकपणे यामुळे टंकलेखन अर्थात टायपिंगचा वेग वाढल्यास मदत होते.
अश्या या उठावदार बारचा खूप उपयोग केला जातो. मग तुम्ही विचार कराल की, आजच्या स्मार्टफोन युगामध्ये याचा वापर कसा काय होणार… कारण या फोनमध्ये न्यूमॅरिक कि-पॅडच नसते.
आजचे स्मार्टफोन कि-पॅडवाले नसल्याने सॅमसंग, आय-फोन यांसारख्या स्मार्टफोनमध्ये व्हॉइस कमांड हा पर्याय देण्यात आलेला आहे. नोकिया आणि इतर जुन्या कि-पॅडच्या फोनना देखील हा उठावदार बार किंवा डॉट दिलं जात असे.
साहजिक आहे की या तंत्रामुळे खूप लोकांचा फायदा झाला आहे, कीपॅड वापरणं बऱ्यापैकी सोपं झालं आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.