Site icon InMarathi

तब्बल ३९ देशांना आपल्या विरोधात चिथवून युद्ध छेडायला लावणारा एक क्रूर ‘हुकुमशहा’!

saddam hussein gulf war inmarathi

timesofisrael.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

हुकुमशाही आपल्याला काही नवीन नाही, भारतात जरी लोकशाही असली तरी पहिले मुघल मग ब्रिटिश यांची हुकुमशाही वजा दडपशाही आपण अनुभवली आहे!

शिवाय हिटलर, स्टॅलिन, गद्दाफी अशा काही हुकुशहांनी केलेला नरसंहार आपण वाचला आहे, त्यांची राज्य करण्याची पद्धती आणि स्वतःच वर्चस्व स्थापन करण्याची मनोकामना लोकांनी हाणून पाडली!

 

metrosaga.com

 

आता जरी चित्र बदलले असले तरी इराक, इराण, अफगाणिस्तान, रशिया, चीन, उत्तर कोरिया अशा काही देशांमध्ये आजही तिथल्या हुकुमशहाचे वर्चस्व आहे!

त्यांच्यापैकीच एक हुकुमशहा  म्हणजे सद्दाम हुसेन, अगदी हिटलर इतकाच क्रूर, महत्वाकांक्षी पण तरी ह्या अशा हुकूमशहांचा शेवट हा दारुणच होतो!

काही वर्षांपूर्वी आलेल्या अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट या सिनेमात सुद्धा इराक मधली राजवट आणि सद्दाम हुसेनचा शेवट यांचे काही छोटेसे संदर्भ आपल्याला बघायला मिळतील!

 

thughtco.com

 

एकंदरच ह्या हुकुमशाही राजवटीत जगणं हे अत्यंत कठीण, कारण संपूर्ण राष्ट्राच्या दोऱ्या ह्या एकाच माणसाच्या हातात असतात तिथं सामान्य नागरिक हे कधीच विकास करू शकत नाहीत!

सद्दाम हुसेन म्हणजे जगातील सर्वात क्रूर हुकुमशहांपैकी एक. इराकवर तर तो राज्य करतच होता, पण हळूहळू त्याची महत्त्वकांक्षा बळावयला लागली होती.

‘अरब का शेर’ म्हणून त्याचा अखाती देशांमध्ये बोलबाला होता. हिटलर सारखी त्याची प्रवृत्ती होती, सत्तेच्या लोभापायी त्याने इतके कठोर आणि चुकीचे निर्णय घेतले की त्याचे अतिशय प्रतिकूल परिणाम याला पुढे भोगावे लागले.

याच सत्तेच्या आणि ताकदीच्या धुंदीत एकदा सद्दाम हुसेनने ३९ देशांना आपल्या विरोधात चिथावले आणि त्याचा परिणाम म्हणून छेडले गेले आधुनिक जगतातील एक भीषण युद्ध जे गल्फ वॉर म्हणून ओळखले जाते.

 

stripes.com

 

या युद्धाचे मूळ होते सद्दाम हुसेनने कुवेतविरोधात पुकारलेले युद्ध!

२ ऑगस्ट १९९० रोजी इराकने कुवेतवर हल्ला केला. या हल्ल्याच्या प्रत्युत्तर दाखल अमेरिकासह इतर ३८ देश सद्दाम हुसेनच्या विरोधात रणांगणात उतरले होते.

संयुक्त राष्‍ट्रसंघाने प्रथम इराकला कुवेतमधून सैन्य हटवण्‍यासाठी वेळ दिला.

मात्र सद्दामने हा सल्ला धुडकावून लावल्याने मित्र राष्‍ट्रांच्या लष्‍कराने इराकवर हल्ला केला आणि सुरु झाले आखाती युद्ध अर्थात गल्फ वॉर!

१९८० पासून इराण व इराकमध्ये तब्बल आठ वर्षे युद्ध सुरु होते. या युध्‍दात कुवेतने साथ तर इराकचीच दिली होती, त्यांनी इराकला इराणसोबतच्या युध्‍दासाठी बरीच आर्थिक मदत केली होती.

पण युध्‍द संपताच इराक कर्जात बुडाले होते व इराकने कुवेतला कर्ज माफ करण्‍याची विनंती नाही तर थेट आदेशच दिला.

कुवेतने मात्र कर्जमाफी करणार नाही असे ठणकावले. झालं, सद्दाम हुसेनचा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या मित्रदेशावरच हल्ला केला.

 

looklex.com

 

हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्राने ठराव संमत करुन कुवेतवर इराकच्या हल्ल्यांची निंदा केली.

त्यांनी इराकवर अनेक प्रतिबंध घातले. पण ऐकेल तो सद्दाम कसला, आता काहीतरी ठोस पाउल उचलायला हवे असा विचार करून अमेरिकेचे राष्‍ट्रपती जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांनी ऑपरेशन डेझर्ट शील्ड सुरु करण्‍याचे आदेश दिले.

इकडे ८ ऑगस्ट १९९० रोजी इराकने कुवेतवर कब्जा केला व तो आता आपला भाग असल्याचे घोषित केले.

सामंजस्याने हा प्रश्न सुटणार नसल्याचे लक्षात येताच संयुक्त राष्ट्राने इराकविरोधात सैन्याचा वापर करण्‍यास मंजूर दिली. अमेरिका व मित्र देशांनी मिळून इराकच्या विरोधात ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्मची सुरुवात केली.

 

libcom.org

 

इराकविरोधात अमेरिका व ३८ देशांची संयुक्त आघाडी बनवण्‍यात आली. मित्र राष्‍ट्रांच्या सैन्यात २८ देशांचे ६ लाख ७० हजार सैनिक सहभागी होते.

४ लाख २५ हजार सैनिक तर एकट्या अमेरिकेचे होते. २४ फेब्रूवारी १९९१ रोजी संयुक्त आघाडीने इराकच्या विरोधात जमिनीवरील हल्ले सुरु केले.

इराकची मोठी हानी झाली. संपूर्ण इराक हादरला. युध्‍दात एक लाखांपेक्षा जास्त इराकी सैनिक मारले गेले होते. सद्दाम हुसेनने नमते घेण्याचे ठरवले.

अवघ्या ३ दिवसातच बगदाद रेडिओने घोषणा केली, की इराक संयुक्त राष्ट्राचा ठराव मान्य करेल.

अश्या या भीषण युद्धाने इराक पुरता कोलमडला. कुवेत इराकच्या कचाट्यातून मुक्त झाला इराकने सर्व अटी मान्य करून गुडघे टेकले.

अमेरिकेच्या संरक्षण अहवालानुसार, गल्फ वॉरमध्ये ४ हजार १३० अब्ज रुपये खर्च झाले होते.

कुवेत, सौदी अरेबिया व इतर अखाती देशांनी इराकला अद्दल घडावी म्हणून २ हजार ४३५ अब्ज रुपयांचा युद्ध निधी दिला. दुसरीकडे जर्मनी व जपानने देखील १ हजार ८२ अब्ज रुपयांचा निधी दिला होता.

 

healthline.com

या युद्धाने अखाती जगताचे राजकारण मात्र कायमचे बदलले!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version