Site icon InMarathi

जगभरातील सुमारे २७०० भाषांबद्दल अतिशय रंजक माहिती..!

language inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखिका – केटलीन निकोलसन
मराठी रूपांतर – ज्ञानभाषामराठी प्रतिष्ठान
मूळ लेख – http://lingualinx.com/blog/12-interesting-facts-languages
[ ] या कंसातील वाक्ये मूळ लेखात समाविष्ट नसून अनुवादकाने लिहिलेली आहेत.

===

वयाच्या पहिल्या वर्षातच, आई किंवा बाबा हा शब्द उच्चारताना आपलं भाषेशी नातं जोडलं जातं. मुळातच, संशोधनाव्दारे सिद्ध झालं आहे, की मूल आईच्या गर्भात असल्यापासून आईने साधलेला संवाद, इतरांचे शब्द यांतून भाषेची पहिली ओळख होते.

त्यानंतर घरात बोलली जाणारी मातृभाषा असो, शाळेतील शिक्षणाची वेगळी भाषा असो वा सभोवताली एकली जाणारी अन्य कोणतीही भाषा, अनेक भाषा एकाच वेळी शिकण्याची कला माणसाला मुळातच अवगत आहे.

कुठलीही भाषा ही मानवी आयुष्याचा एक क्लिष्ट तरीही रंजक भाग आहे. केवळ भारतीयच नाही तर जागतिक पातळीवर भाषेचा अभ्यास केल्यास, अनेक विचार करायला लावणारी तथ्य आपल्या समोर येतात.

किंबहुना, वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास करत, याच क्षेत्रात काम करणा-यांची संख्याही सातत्याने वाढत असल्याने, भाषांचे वैविध्य या विषयाची व्याप्ती लक्षात येते,

भाषांच्या उत्क्रांतीची तथ्ये वाचून आपण आपल्या मातृभाषेच्या संवर्धनाकरता किती जागरूक असायला हवे, कोणत्या योजना/धोरणांच्या आखणीची गरज आहे, याची तुम्हाला कल्पना येईल.

१. जगात एकूण २७०० च्या आसपास भाषा, आणि ७००० च्यावर बोली आहेत. जगात सर्वात जास्त चिनी, स्पॅनिश, इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलल्या जातात.

चिनी भाषा जगात सर्वाधिक बोलली जाते, आणि चिनी भाषेत ५०,००० अक्षरे आहेत, पण एखादे चिनी वृत्तपत्र वाचण्याकरता यातली केवळ २००० अक्षरे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

 

linguisticsociety.org

 

२. दर पंधरवड्याला एक भाषा/बोली मरण पावते. आत्तापर्यंत एकूण २३१ भाषा जगातून नष्ट झालेल्या आहेत तर, जगातील २४०० भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. [भाषातज्ञ श्री. गणेश देवींच्या अभ्यासानुसार मराठी आणि बंगालीला सध्या कसलाही धोका नाही.]

३. बायबल सर्वात जास्त भाषांतरीत झालेला ग्रंथ असून एकूण २४५४ भाषांमध्ये बायबलचे भाषांतर झालेले आहे. दुसऱ्या क्रमांकावर पिनोकियो हे पुस्तक आहे.

 

bible study tools

 

[१८८३ मध्ये प्रकाशित झालेले ‘द ऍडव्हेंचर्स ऑफ पिनोकियो’ आतापर्यंत २६० हुन अधिक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. हे पुस्तक इटलीच्या कार्लो कोलोडी यांनी लिहिले आहे ] तर अॅगॅथा ख्रिस्ती या इंग्लिश लेखिकेचे साहित्य सर्वाधिक भाषांतरीत झालेले आहे.

४. जागतिक स्तरावर, कंबोडीयन-खमेर भाषेत सर्वात मोठी वर्णमाला असून त्यात ७४ अक्षरे आहेत, तर पपुआ न्यू गिनीतील रोटोकास भाषेत केवळ १२ अक्षरांची वर्णमाला आहे.

 

 

जगातील सर्वाधिक शब्द असलेली भाषा म्हणून इंग्रजी, २५०००० शब्दांच्या शब्दभांडारावर शेखी मिरवते आहे. इंग्रजीचा वाढता वापर याचा प्रत्यय सध्या आपणही अनुभवत आहोत.

५. अमेरिकेत एकूण ३०० भाषा बोलल्या जातात पण सर्वात जास्त म्हणजे ११ अधिकृत भाषा असण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे.

 

facebook

 

अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या २१% लोक घरी इतर भाषेत संवाद साधतात. यात स्पॅनिश वापरणारांचे प्रमाण ६२% आहे . घरी स्पॅनिश बोलणाऱ्यांपैकी ५६ टक्के लोकांना इंग्रजी चांगले येते.

६. प्राचीन भाषांमध्ये संस्कृत, सुमेरियन, हिब्रू आणि बस्कचा समावेश होतो, असं आपण म्हणू शकतो कारण या भाषांमध्ये प्राचीन लिखित साहित्य उपलब्ध आहे.

पण कुणी विचारलं की, जगातील सर्वात जुनी भाषा कोणती? तर त्याचं उत्तर आपल्याला कधीच मिळू शकणार नाही, कारण मौखिक स्वरुपात असणाऱ्या भाषांच्या नोंदी मिळणे अशक्य आहे.

 

pinimg.com

 

७. भाषा आपल्या पूर्वजांशी आपली नाळ जोडते. १००००० वर्षांपूर्वी भाषांचा उगम झाला असे म्हटले जाते. भाषेचा उगम कधी झाला यावर मतमतांतरे असली तरीही, बहुतेक भाषातज्ञ मानतात की, आधुनिक मेंदू, स्वरयंत्र, कवटीचा आकार, वगैरे सहीत अफ्रिकेत उत्क्रांत झालेला आधुनिक मानव (Homo sapiens) तयार झाला, आणि भाषेचा उगम झाला असावा.

काही मानववंशशास्त्रज्ञ असंही मानतात की, मानव उत्क्रांत होण्याअगोदरपासून भाषेचा उगम झाला असावा. पण एकूणच परिस्थितीचा अभ्यास केला तर १००००० वर्षांपूर्वी, हा काळ पकडायला हरकत नाही.

८. आपल्या पूर्वजांमध्ये सामाजिक बंध दृढ होण्यासाठी भाषा विकसित झाली. शृंगार, हातवारे अथवा तत्सम देहबोली बाजूला सारून परस्परांमधील बंध अधिक मजबूत घडविण्यासाठी भाषा उत्क्रांत झाली असावी.

याला मकॅक माकडांवर झालेल्या संशोधनाने पुष्टी मिळते.

 

slideshare

 

अजून एका सिद्धांतानुसार आपल्या पूर्वजांनी प्राणी आणि पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करून वेगवेगळे आवाज काढायला सुरुवात केली आणि भाषेची निर्मिती झाली.

एक सिद्धांत तर असं देखील सांगतो की मानवी संवादाची उत्पत्ती विव्हळणे, वेदना, आश्चर्य, राग, आनंद अशा विविध संवेदनशील भावना व्यक्त करणाऱ्या नादातून झाली असावी.

९. दुसरी भाषा शिकणे तुम्हाला चतुर बनवू शकते. अनेक शास्त्रज्ञांच्या मते बहुभाषिक असल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढते त्याचप्रमाणे एक अभ्यास असं देखील सांगतो की, बहुभाषिकत्त्वामुळे मन ताजंतवानं राहण्यास मदत मिळू शकते.

 

TED

 

१०. भाषा सतत एकमेकांवर प्रभाव पाडत असतात. इंग्रजी भाषा, ३०% फ्रेंच आहे, कारण फ्रेंचमधले शब्द जसेच्या तसे इंग्रजीत उचलले आहेत. उदा. बॅलेनृत्य! या नृत्याशी संबंधित सर्व शब्द फ्रेंच आहेत, आणि ते जसेच्या तसे इंग्रजीने उचलले आहेत.

[आता तुमची मराठी इतर भाषांमधून शब्द उचलते, सायकल बाहेरून आली, त्याबरोबर सायकलचे सर्व सुटे भाग आले, सर्व नावे इंग्रजी! त्याला मराठीत प्रतिशब्ददेखील नाहीत!!! म्हणून खिजवणाऱ्यांच्या तोंडावर बॅलेचे उदाहरण नक्की मारा…!]

११. जवळ जवळ २०० अनैसर्गिक / फसव्या भाषा आहेत ज्या पुस्तकं, दूरदर्शन किंवा सिनेमा या माध्यमांसाठी शोधल्या/तयार केल्या गेल्या आहेत. त्यात १३ विशिष्ट भाषा आहेत ज्या टॉल्किनच्या विश्वातल्या आहेत.

पण कृत्रिम भाषा काही शतकांपुर्वीपासून अस्तित्वात आहेत, जेव्हा तत्वज्ञानविषयक चर्चा/वादविवादासाठी भाषांचा शोध लावला गेला.

 

handluggageonly.co.uk

 

१२. पण, इतकं सगळं असूनही नादानुकरणीय शब्द मात्र प्रत्येक भाषेत वेगळे आहेत. जसं अमेरिकेत राईस क्रीस्पीज (एक प्रकारच्या तांदळाच्या वड्या) बनताना होणाऱ्या आवाजसाठी ‘snap, crackle व pop’ (स्नॅप, क्रॅकल व पॉप) हे शब्द आहेत.

तोच पदार्थ जर्मनीमध्ये बनतानाचं वर्णन ‘Knisper! Knasper! Knusper! (क्नीस्पर, क्नॅस्पर व क्नस्पर) आहे; फ्रांसमध्ये त्यासाठीच ‘‘Cric! Crac! Croc!’ (क्रिक, क्रॅक व क्रॉक) आणि स्पेनमध्ये शब्द आहेत ‘Cris! Cras! Cros!’ (क्रिस, क्रॅस व क्रॉस).

आफ्रिकन्स भाषेत मधमाश्या बझ्झ (buzz) करत नाहीत तर त्या ‘झोम झोम’ (zoem-zoem) करत फिरतात. आणि, अमेरिकेतल्या मांजरी ‘म्याऊ’ (meow) म्हणतात तर व्हिएतनाम मधल्या ‘मेओ-मेओ’ (meo-meo), एस्टोनियामधल्या ‘नाउ’ (nau) तर माले मधल्या मांजरी ‘न्-गीआऊ’ (ngiau) करतात.

गायी भारतात पवित्र मानल्या जातात पण त्या बंगाली भाषेत ‘मूऽऽऽ‘ (moo) असा आवाज नाही काढत, त्या ‘हंबाऽऽऽ‘ (hamba) असं करतात. थायलंड मधले घुबड ‘हुक हुक (hook hook) म्हणतात, इंग्लंड मधल्या सारखे ‘हुट हुट’ (hoot hoot) नाही. अल्बेनियामधली डुकरे ‘ऑऽऽऽइंक ऑऽऽऽइंक’ (oink) असा आवाज करत नाहीत, ते ‘हंऽऽक हंऽऽक) असा करतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version