भारतमातेसाठी लढा त्यांनीही दिला होता, पण जणू ‘इतिहास’ त्यांची दखल घ्यायला विसरला!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारत…आज जरी आपला देश स्वतंत्र असला तरी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक वीरपुत्रांनी आपले प्राण गमावलेत. इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं आणि या दीडशे वर्षांत कितीतरी स्वातंत्र्यवीरांनी आपले जीवन या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केले.
पण, या स्वातंत्र्यवीरांपैकी किती आपल्याला आठवतात किंवा ज्यांच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल आपल्याला माहिती आहे.
भगत सिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस आणि आणखी काही… पण याही व्यतिरिक्त असे काही स्वातंत्र्यवीर आहेत ज्यांनी भारतमातेच्या रक्षणासाठी आपले जीवन दिले. आज आपण अशाच काही माहित नसलेल्या स्वातंत्र्यवीरांबद्दल जाणून घेऊया…
१. राणी गाईदिनल्यू
राणी गाईदिनल्यू या नागा आध्यात्मिक आणि राजकीय नेत्या होत्या, ज्यांनी ब्रिटीश सरकारविरुद्ध बंड पुकारले, तसेच नागा धार्मिक प्रवर्तकांना ख्रिश्चन धर्मात रुपांतर करण्याच्या विरोधात उभे केले. वयाच्या १३ व्या वर्षी त्या हरका धार्मिक चळवळीत सामील झाल्या त्यानंतर या चळवळीने राजकीय चळवळीचे वळण घेतले.
ब्रिटिशांना मणिपूर आणि आसपासच्या नागा क्षेत्रापासून दूर थाटण्याचा प्रयत्न या चळवळीतून करण्यात आला. १६ वर्षांच्या असताना त्यांना अटक झाली आणि ब्रिटिशांनी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पाच वर्षांनंतर, १९३७ मध्ये नेहरू त्यांना भेटायला गेले आणि त्यांना लवकरच बाहेर काढण्याचे आश्वासन दिले, तेव्हा नेहरूंनी त्यांना ‘राणी’ म्हणून संबोधले.
१९४७ मध्ये त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर त्या समाजासाठी काम करत राहिल्या. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना ‘नागालँड च्या राणी लक्ष्मीबाई’ म्हणून देखील संबोधिले जाते.
२.अल्लूरी सीताराम राजू
त्यांनी १९२२-२४ च्या दुर्दैवी “रॅम्पा बंड” चे नेतृत्त्व केले होते, ज्या दरम्यान आदिवासी नेत्यांचा एक गट आणि इतर समर्थक ब्रिटीशांविरोधात लढले होते. स्थानिक लोकांकडून त्यांना “मनाम वीरुडू” (हिरो ऑफ हिरोंगल) म्हटले जात असे.
आंध्र प्रदेशातील समृद्ध क्षत्रिय घराण्यात जन्मलेल्या अल्लूरी सीताराम राजू यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी सर्वकाही सोडले. एजन्सी क्षेत्रातील आदिवासी लोकांवर ब्रिटीश अधिकाऱ्यांकडून वन कायदा अंतर्गत केल्या जाणाऱ्या जाचाविरोधात त्यांनी हत्यार उपसले आणि ब्रिटीश सैन्याविरुद्ध सशस्त्र बंडखोरीचे नेतृत्व केले.
३. तिरोत सिंग
१८ व्या शतकाच्या सुरुवातीला तिरोत सिंग हे खासी लोकांचे प्रमुख होते आणि त्यांनी खासी डोंगरावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या ब्रिटिशांना लढा दिला होता. १७ जुलै, १८३५ रोजी ब्रिटीशांसोबत लढताना त्यांना वीरमरण आले.
४. पिंगली वेंकैय्या
पिंगली वेंकैय्या हे महात्मा गांधींचे एक अनुयायी होते. त्यांना ‘डायमंड वेंकैय्या’ या नावानेही ओळखले जाते. ते भूगर्भशास्त्र, शेती आणि शिक्षणतज्ज्ञ होते. स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांचे प्रमुख योगदान हे भारताचा राष्ट्रीय ध्वज डिझाइन करणे हे होते. पहिल्यांदा हा ध्वज भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा ध्वज म्हणून आणण्यात आला आणि त्यानंतर त्यात सुधार करून तो परत भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून नावारूपास आला.
५. वीर पंड्या कट्टाबोम्मन
वीर पंड्या कट्टाबोम्मन हे १८ व्या शतकातील तामिळनाडूमधील एक धाडसी पाल्येकर सरदार होते. उत्तरेकडील भागांत भारतीय स्वातंत्र्य लढा सुरु होण्याच्या साठ वर्षांआधी त्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले होते. पण १७९५ साली ते पकडले गेले आणि त्यांना फाशी देण्यात आली.
त्यानंतर त्यांचा किल्ला नष्ट करण्यात आला आणि त्यांची संपत्ती ब्रिटिश सैन्याने लूटली. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सार्वभौमत्वाविरुद्ध आंदोलन केले आणि कर भरण्यास नकार दिला होता.
६. टंगुटूरी प्रकाशम
टंगुटूरी प्रकाशम हे एक राजकारणी आणि स्वातंत्र्यसैनिक, तसेच ते मद्रास प्रांताचे पहिले मुख्यमंत्री होते आणि नंतर आंध्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी एक वकील म्हणून करिअरची सुरुवात केली, परंतु १९२१ मध्ये त्यांनी आपली प्रॅक्टिस सोडून दिली आणि ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले.
१९२८ मध्ये मद्रास येथे सायमन कमिशन विरोधातील निदर्शनांदरम्यान काही भागात निषेध करण्यावर बंदी घातली होती आणि आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास गोळी मारण्यास पोलिसांना सांगण्यात आले होते. तेव्हा टंगुटूरी प्रकाशम हे पोलिसांनसमोर निधड्या छातीने उभे राहिले आणि हिम्मत असेल तर गोळी चालवा असे आव्हान केले.
या त्यांच्या धाडसी कृत्यामुळे त्यांना आंध्र केसरी (आंध्रचे सिंह) हे शीर्षक मिळाले.
७. दि ट्रायो : बेनेट, बादल आणि दिनेश
कोलकातातील डलहौसी स्क्वेअरवर हल्ला करणारी ही तिकडी. त्यांचे पूर्ण नावः बादल गुप्ता, बेन्यो बासू आणि दिनेश गुप्ता आहेत आणि हे सर्व बंगालचे होते. कर्नल एन.एस. सिम्पसन, जेलचे इन्स्पेक्टर जनरल, हे कैद्यांचे निर्दयीपणे शोषण करण्यासाठी कुप्रसिद्ध होते.
या तीन क्रांतिकारकांनी केवळ त्याचा खून करण्याचाच नव्हे तर कोलकातामधील डलहौसी स्क्वेअरमधील The Secretariat Building and The Writers’ Building वर हल्ला करून ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या तिघांनी युरोपियन्स बनून सिम्पसनला ठार केले.
पण त्यांना स्वतःला अटक होऊ द्यायची नव्हती म्हणून बादलने विष घेऊन आपले जीवन संपवले, तर इतर दोघांनी रिव्हॉल्व्हरनी स्वतःला शूट केले.
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डलहौसी स्क्वेअरचे नाव बदलून बी.बी.डी. बाग असे ठेवण्यात आले.
८. सूर्य सेन
ब्रिटिशांविरूद्ध सशस्त्र उठाव करणे शक्य आहे, हे सिद्ध करण्यासाठी सूर्य सेन यांनी चितगाव आर्मरी रेडचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वातील, ६६ क्रांतिकारकांच्या एका गटाने पोलिसांची शस्त्रास्त्रे मिळविली, दूरध्वनी व टेलिग्राफ लाईन्स नष्ट केल्या आणि चटगांवहून रेल्वे मार्गांना डिसलोकेट केले.
शहरावर ताबा मिळविल्यानंतर तिरंगा फडकवून तिथे गांधी राज घोषित केला. त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणात दारुगोळा असण्याच्या कारणावरून ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर हल्ला केला, पण त्यांना कोणताही दारुगोळा सापडला नाही. त्यानंतर सेन यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना फाशी देण्यात आली.
९. सुरेंद्र साई
१८२७ साली महाराजा साईच्या मृत्यूनंतर राजवंशी असल्याने सुरेंद्र साई यांचा संबलपूरच्या राजगादीवर अधिकार होता. पण सुरेंद्र साई हे इंग्रजांना कधीही मदत करणार नाही हे त्यांना माहित होते, म्हणून इंग्रजांनी सुरेंद्र यांच्या पत्नी मोहन कुमारी हिला राणी बनवून तिचा स्वतःच्या हितासाठी उपयोग केला.
याविरोधात सुरेंद्र साई आणि त्यांच्या सेनेने शसस्त्र विरोध केला. राज्यातील लोक त्यांना प्रेमाने ‘बिरा’ म्हणून संबोधायचे. ते १८ वर्षांचे होते तेव्हापासून त्यांनी इंग्रजांविरोधात लढा सुरु केला होता. २२ जानेवारी १८६४ रोजी सुरेंद्र साई यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर हल्ला करून त्यांना अटक करण्यात आली.
तुरुंगात त्यांच्यावर अनेक मानसिक तसेच शारीरिक छळ करण्यात आले तरीदेखील सुरेंद्र साई हे इंग्रजांपुढे झुकले नाही, अखेर ३७ वर्ष तुरुंगवास सोसल्यावर २८ फेब्रुवारी १८८४ त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
१०. पोटी श्रीरामुलू
पोटी श्रीरामुलू यांना अमरजीवी म्हणून संबोधले जाते. हे गांधीजीचे अनुयायी होते, एवढेच नाही तर स्वतः गांधींनी त्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली. त्यांनी आपल पूर्ण जीवन मानवहिता संबंधी आणि दलित समाजासाठी अर्पण केले.
मद्रास प्रांतातील आंध्र राज्यातील वेगळ्या भाषिक राज्यांच्या मागणी काळादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली.
आपल्या भारताला स्वतांत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक राष्ट्रभक्तांनी आपले प्राण गमावले, तेव्हा आपण भलेही त्यांच्या प्रमाणे एवढ मोठ काही नाही करू शकलो तरी आपल्या देशाचा मान कसा वाढवता येईल याकरिता प्रयत्न नक्कीच करायला हवेत… “जय हिंद”…!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.