Site icon InMarathi

अट्टल गुन्हेगारांची “नार्को टेस्ट” व्हावी असं म्हणतात, ती “नार्को टेस्ट” म्हणजे नेमकं काय?

molestation narco Test Feature inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करणे लोकांची सवय असतेच. आरोपी कधीही लगेच खरं बोलत नाहीत. त्यातल्या त्यात सराईतपणे खोटे बोलणारे आरोपी तुम्हाला खूप पाहायला मिळतील.

हे आरोपी खोटे सुद्धा अश्या विश्वासाने बोलतात की, त्यांना प्रश्न करणारे पोलीस सुद्धा कधी-कधी आपण चुकीच्या माणसाला तर नाही पकडले ना या विचारात पडतात. मग अशावेळी पोलिसांना या लोकांकडून खरे जाणून घेण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करणे भाग पडते.

तुम्ही बहुतेक चित्रपटांमध्ये नार्को टेस्ट करताना पाहिले असेलच. नार्को टेस्ट म्हणजे एखाद्या आरोपीकडून किंवा माणसाकडून सत्य काय आहे, हे जाणून घेणे होय. ही टेस्ट करताना समोरचा व्यक्ती खोटे बोलणे शक्य नसते किंवा तो खोटे बोलला तरी त्याचे खोटं लगेचच पकडले जाते.

चला मग आज आपण याचा नार्को टेस्टची माहिती घेऊया.

 

milligazette.com

खोटे बोलणारा व्यक्ती कल्पनांचा आधार घेतो, पण ही टेस्ट करत असताना आरोपीला सेमी कॉन्शिअस स्थितीमध्ये आणले जाते, ज्यामुळे तो झालेल्या घटनांची योग्य ती माहिती देतो.

या टेस्टमध्ये आरोपीला सोडियम पेंटोथॉलचे इंजेक्शन दिले जाते. हे इंजेक्शन आरोपीचे वय, लिंग, आरोग्य आणि शारीरिक स्थिती यांच्या आधारावर देण्यात येते. चुकीच्या मात्रेमध्ये हे इंजेक्शन दिल्यास आरोपी कोमामध्ये जाऊ शकतो किंवा त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो.

नार्को शब्द हा नार्क शब्दापासून घेण्यात आला आहे, ज्याचा अर्थ नार्कोटिक. हॉर्सलेमध्ये पहिल्यांदा नार्को या शब्दाचा प्रयोग करण्यात आला होता. १९२२ मध्ये नार्को हा शब्द तेव्हा वापरण्यात येऊ लागला जेव्हा १९२२ मध्ये रॉबर्ट हाऊस, टेक्सस येथे एका ऑब्झेटेशियनने स्कोपोलेमाइन ड्रगचा प्रयोग दोन कैद्यांवर केला होता.

नार्को टेस्ट करण्यासाठी सोडियम पेंटोथॉल, सोडियम एमेटल, इथेनॉल, बार्बीचेरेट्स, स्कोपोल-अमाइन, टेपाजेमॅन इत्यादी शुद्ध पाण्यामध्ये मिसळले जाते. टेस्ट करतेवेळी त्या व्यक्तीला सोडियम पेंटोथॉलचे इंजेक्शन लावले जाते.

 

3.bp.blogspot.com

नार्को टेस्टमध्ये प्रश्नांची उत्तरे देत असताना आरोपी पूर्णपणे शुद्धीत नसतो. त्यामुळे तो प्रश्नांची खरी उत्तरे देतो, कारण त्यावेळी तो व्यक्ती उत्तरांना उलट-सुलट फिरवण्याच्या परिस्थितीमध्ये नसतो. या ड्रगच्या प्रभावाने तो फक्त अर्ध बेशुद्ध अवस्थेमध्ये नसतो तर त्याची तल्लख बुद्धी देखील कार्यशील नसते.

माणूस एकप्रकारच्या संमोहन अवस्थेमध्ये गेलेला असतो, तो त्याच्या बाजूने जास्त काही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. फक्त विचारलेल्या काही प्रश्नांचीच उत्तरे देऊ शकतो.

म्हणूनच असे मानले जाते की, नार्को टेस्टमध्ये माणूस नकळतपणे नेहमी सत्यच सांगतो. त्यामुळे नार्को टेस्टमधील कबुली पुरावा म्हणून घेता येत नसले तरी त्यातून पुरावे मिळवण्यासाठी धागेदोरे नक्कीच काढता येऊ शकतात. ज्यामुळे दोषींच्या विरोधात खरे पुरावे गोळा करून त्यांना शिक्षा ठोठावता येते. आपल्याकडे “पुराव्यांअभावी सुटका” होण्याचं लक्षणीय प्रमाण पहाता नार्को टेस्ट फारच उपयुक्त ठरते.

तर मंडळी अशी ही नार्को टेस्ट! ‘दुध का दुध और पानी का पानी’ करण्यामध्ये खूपच महत्त्वाची भूमिका बजावते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version