Site icon InMarathi

भारतातील या ७ सुंदर जागा, फॉरेन लोकेशन्सला देखील देतात टक्कर!

tourism-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्हा-आम्हा सारख्या प्रत्येकालाच फिरण्याची थोडीफार का होईना पण आवड असते.

काही तर पर्यटनासाठी इतके वेडे असतात जणू काही त्यांच्या आयुष्यात भ्रमंती हीच सर्वात महत्वाची गोष्ट असते आणि ती असायला पण हवी.

कारण आपण एवढ्या सुंदर पृथ्वीतलावर जन्म घेतलाय मग तिचं सौंदर्य बघायला नको का…?

 

 

पृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणी नैसर्गिक देखाव्यासोबतच माणसाच्या हातूनही काही अप्रतिम वास्तू घडल्या आहेत. मग हे सर्व बघायची आवड का नसावी आणि त्यातही जर International Tourist Places म्हटलं तर ‘cherry on the cake’, नाही का…?

==

हे ही वाचा : विदेशी ठिकाणांना मागे टाकत हे भारतीय मंदिर बनले जगातील सर्वात जास्त बघितले जाणारे पर्यटन स्थळ

==

 

आपल्या लोकांना फॉरेन टुर्स आणि फॉरेन लोकेशन्स बाबतीत खुपच कुतूहल आहे, प्रत्येकाला वर्ल्ड टुर आयुष्यात एकदातरी करायचीच आहे, हे फॉरेन लोकेशन्स बाबतीत इतकं खूळ आपल्या लोकांच्या डोक्यात भरवण्यात सिनेमाचा सुद्धा तितकाच हात आहे!

कित्येक हिंदी चित्रपट फॉरेन लोकेशन्स वर शूट होतात, त्यामुळे त्याबाबतीत लोकं आणखीन चर्चा करायला लागतात, जसं DDLJ या सिनेमाच बऱ्यापैकी शूटिंग ही स्वित्झर्लंड मध्ये झालं आणि त्यानंतर तिकडे जाणारे भारतीय पर्यटकांच्या संख्येत सुद्धा प्रचंड वाढ झाली!

 

 

पण मंडळी या International पर्यटन स्थळांवर जायचं म्हटलं तर आपला खिसा खाली करणं आलंच की, आता फिरायला जायचं म्हटलं तर पैसा तर लागणारच ना…!

पण जर तुम्हाला तीच International स्थळे कमी पैश्यात तसंच पासपोर्ट आणि व्हिसाच्या कटकटीशिवाय बघायला मिळाली तर… पण आता तुम्ही म्हणाल की हे कस बरं शक्य आहे…?

तर तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही अशा भारतीय पर्यटन स्थळांची माहिती जी तुम्हाला तो International feel नक्की देतील…

चला तर मग बघुयात foreign destination भासवणारी आणि बहुदा त्याहीपेक्षा सुंदर अशी काही भारतीय पर्यटन स्थळं …

 

१. गुलमर्ग येथील बर्फाच्छादित पर्वत आणि स्वित्झर्लंडचे पर्वत…

 

 

पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या काश्मीरमधील गुलमर्ग येथील बर्फाच्छादित पर्वत हे काही स्वित्झर्लंडच्या पर्वतांपेक्षा कमी नाहीत.

गुलमर्ग हे हिवाळ्यात भारतातील क्रीडाप्रेमींचे सर्वात आवडते ठिकाण असून त्याला आशियातील सातव्या सर्वोत्तम स्की ठिकाणाचा दर्जा देण्यात आला आहे.

त्यामुळे एवढ्या दूर स्वित्झर्लंडला स्की करण्यासाठी जाण्यापेक्षा एकदा गुलमर्गला भेट देणं नक्कीच परवडणारं आहे.

 

२. श्रीनगर येथील ट्यूलिप वॅली आणि अॅमस्टरडॅमची ट्यूलिप वॅली…

 

==

हे ही वाचा : पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे काय हे अनुभवायचं असेल तर या भारतीय ठिकाणांना भेट द्या

==

काश्मीर हे भारतातील पर्यटनस्थळांपैकी सर्वात महत्वाचं आणि प्रथम क्रमांकाच स्थळ आहे. येथील श्रीनगर मधील ट्यूलिप वॅली तुम्हाला नेदरलँडच्या ऍमस्टरडॅममधील ट्यूलिप वॅलीची आठवण नक्की करून देईल.

इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप वॅली, पूर्वीचे मॉडेल फ्लोरिकल्चर सेंटर, ही श्रीनगरमधील ट्यूलिप बाग आहे. ही आशिया खंडातील सर्वात मोठी ट्यूलिप बाग आहे जी ३० हेक्टर जागेत पसरलेली आहे.

एवढंच नाही तर पर्यटनाला चालना देण्यासाठी येथे दरवर्षी जम्मू-काश्मीर सरकारतर्फे येथे ट्युलिप फेस्टिवल देखील ठेवण्यात येतो.

 

३. औली असल्यावर “स्कीइंग” करायसाठी अलास्काला का जायचे?

 

 

उत्तराखंड येथील चमोली जिल्ह्यात असलेले औली हे ठिकाण ‘स्की-डेस्टीनेशन’ म्हणून प्रसिद्ध आहे. स्कीइंग शौकिनांचं तर हे आवडत ठिकाण. मग का अलास्काला जायचं जेव्हा की तुम्ही औलीमध्येच अलास्कासारखा अनुभव घेऊ शकता.

 

४. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क आणि ऍन्टीलोप व्हॅली…

 

 

उत्तराखंड येथील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स या अमेरिकेतील ऍन्टीलोप व्हॅली प्रमाणेच आहेत.

‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क’ हे एक राष्ट्रीय उद्यान आहे जे उत्तराखंड राज्यातील पश्चिम हिमालयात वसलेल आहे. हे ठिकाण अल्पाइन फुले आणि विविध प्रकारच्या वनस्पतींसाठी ओळखले जाते.

 

५. खज्जियारचा भूभाग हा स्वित्झर्लंडच्या भूभागाप्रमाणे दिसतो…

 

 

खज्जियारचा भूभाग तुम्हाला स्वित्झर्लंडच्या कुरणांची आठवण करून देतो. हिमाचल प्रदेशातील हिल स्टेशन खज्जियार हे तिथले मोकळे मैदान आणि देवदार वृक्षांच्या जंगलांसाठी प्रसिद्ध आहे.

 

६. मंडी आणि स्कॉटलँडच्या रोलिंग हिल्स एकसारख्याच भासतात…

 

 

हिमाचल प्रदेशातील मंडी येथील रोलिंग हिल्स आणि स्कॉटलँड येथील रोलिंग हिल्स या तुम्हाला सारख्याचं भासतील.

मग जेव्हा भारतातच एवढा निसर्गरम्य देखावा आपल्याला अनुभवायला मिळू शकतो तर त्यासाठी स्कॉटलँडला का बरे जायचे…!

 

७. गुरुडोंगमार लेक आणि जोलकुर्लन लेक…

 

==

हे ही वाचा : भारतीयांच्या अफाट स्थापत्यशास्त्राची कल्पना देणाऱ्या या ११ ऐतिहासिक वास्तु बघायलाच हव्यात

==

आइसलँडमधील जोलकुर्लन तलाव हा जेवढा मनमोहक वाटतो तेवढाच सिक्किममधील गुरुडोंगमारचा तलावही आपल्या सौंदर्याने मंत्रमुग्ध करतो. गुरुडोंगमारचा हा तलाव जगातील सर्वात उंच तलावांपैकी एक आहे.

काय मंडळी मग पटलं की नाही ! आहेत ना या भारतीय foreign destination…

अशीच काही आणखी पर्यटन स्थळांची माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत या लेखाच्या पुढील भागात….

पुढील भागाची लिंक : Foreign trip वरचे पैसे वाचवा – भारतातील ह्या डेस्टिनेशन्स ला जा – भाग २

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version