मानवनिर्मित ५ महाकाय यंत्रे ज्यांच्यासमोर प्रत्यक्ष माणूससुद्धा मुंगी समान…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तंत्रज्ञान ही एक अशी गोष्ट आहे ज्याने मानवाचं जीवन अतिशय सुकर केलं. तंत्रज्ञानामुळे अश्या काही गोष्टी शक्य झाल्या ज्या केवळ स्वप्नवत वाटायच्या.
याच तंत्रज्ञानातून निर्माण झाली यंत्रे! पूर्वी काम कमी होते म्हणून यंत्रे लहान असायची, पण जसजशी प्रगती होत गेली, तसा कामाचा व्याप वाढत गेला त्यामुळे मोठ्या यंत्रांची गरज भासू लागली आणि आज आपण अश्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत, जिथे आपल्याकडे अशी काही यंत्रे आहेत ज्यांच्या ताकदीला तोड नाही.
यंत्रे नसून जणू महाकाय दानवे वाटावीत इतकी अवाढव्य आहेत, पण त्यांनी माणसाचे कष्ट कमी केले हे देखील खरेच! चला तर आज अश्या काही भल्या मोठ्या यंत्रांची माहिती जाणून घेऊया, ज्यांना पाहताच डोळे विस्फारल्या शिवाय राहत नाहीत!
१) प्रिलूड फ्लंग
हे जहाज एखाद्या लहान पर्वताच्या आकाराचे आहे. सुमारे १६०० फूट लांब असलेल्या या जहाजाचे एकूण वजन ६ लाख टन आहे. एवढे मोठे वजन पाण्यावर तरंगत ठेवणे हे एक आश्चर्यच आहे. याच्या माध्यमातून नैसर्गिक गॅस वाहून नेला जातो. यात भरल्यानंतर गॅसचे रुपांतर लिक्विडमध्ये होते. जमिनीवर आणल्यावर पुन्हा त्याला वायूरुप दिले जाते. हे एक पाण्यावर तरंगते आश्चर्यच आहे.
२) अॅंटोनोव्ह अॅन-225
सोव्हिएत युनियनने ८० च्या दशकात तयार केलेले हे एक स्ट्रॅटेजिक कार्गो विमान आहे. लॅंड करताना याची तब्बल ३२ चाकं उघडावी लागतात. याचे पंख २९० फुट लांब आहेत. म्हणजेच एखाद्या फुटबॉल मैदानावर कदाचितच या विमानाचे पंख बसू शकतात. याचा युद्धात खुप उपयोग होत असे.
३) बॅग्गर 288
ही मशिन ऑपरेट करण्यासाठी 16.5 मेगावॅट वीज लागते. यावरुन या मशिनची काम करण्याची क्षमता लक्षात येते. ही खरंच कामाच्या बाबतीत बलदंड दानवच आहे. खोदकाम करण्यासाठी या मशिनचा उपयोग होतो. या मशिनच्या मदतीने फुटबॉल मैदानाऐवढ्या आकाराचा 90 मीटर खोल खड्डा एका दिवसात करता येऊ शकतो. या मशिनला लागते तेवढ्या वीजेत 2500 घरांना वीज पुरवठा करता येऊ शकतो. ही एक मशिन नसून चाकांवर असलेली भव्य फॅक्टरीच आहे.
४) डॉज पॉवर व्हॅगन
१९५० च्या मॉडेलमध्ये सुधारणा करुन याची निर्मिती करण्यात आली आहे. इतिहासातील हा सर्वांत मोठा पिकअप ट्रक आहे. यात चार एअरकंडिशन बेडरुम्स आहेत. तसेच लिव्हिंग रुम आणि बाथरुमही आहे. युएईचे अब्जाधिश शेख हमाड यांनी याची निर्मिती केली होती.
५) बिलाझ 75710
हा जगातील सर्वांत विशाल डंपट्रक आहे. याला दोन इंजिन जोडण्यात आले आहेत. त्याच्या माध्यमातून ४६०० हॉर्सपॉवरची ऊर्जा तयार केली जाते. मालाची मोठी खेप वाहून नेण्यासाठी या अतिविशाल ट्रकची मदत होते.
काय आहेत की नाही हे विशालकाय पण उपयुक्त दानव!!!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.