' ना जिम ना खुराक; तरीही या पठ्ठ्याने कमावली भल्याभल्यांना लाजवेल अशी बॉडी! – InMarathi

ना जिम ना खुराक; तरीही या पठ्ठ्याने कमावली भल्याभल्यांना लाजवेल अशी बॉडी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

फिटनेससाठी तुम्ही काय करता असा प्रश्न विचारला तर जीम, योगा, डाएट अशी उत्तर येतील.

जरा विचार करा, तुम्ही काय करता?

काहीजण जीममध्ये घाम गाळतात, काहीजण शरिराचा तोल सांभाळत योगा, झुंबा असे प्रकार शिकतात.

 

group yoga
hindustan times

 

मात्र बहुतेक सगळेच जीभेवर ताबा ठेवत मन मारून जगतात.

सामान्य माणुस हे सगळं करतोच, मात्र खेळाडु, अभिनेते यांना तर फिटनेसची सर्वाधिक गरज असल्याने ते यांहूनही कठीण परिश्रम करतात.

 

malika arora yoga inmarathi

 

मात्र फिटनेस किंवा बॉडीबिल्डींगचं हे वेड आजचं नाही.

एखादा मनुष्य तरुण वयामध्ये आला की, तो आपल्या आजूबाजुच्या लोकांना पाहतो. बहुतेक लोक त्याला बदललेली दिसतात.

त्यांच्यातील बदल हा मग वागण्याचा असो किंवा त्यांच्या शरीरयष्टीचा असो,

त्यांच्याकडे पाहून आपणही त्यांच्यासारखे धष्टपुष्ट व्हावे असे सर्वांनाच वाटत असते. त्यासाठी अनेक लोक आपआपल्या परीने प्रयत्न करत असतो.

मग त्याचा बॉडी बनवण्यामागचा आदर्श असतो आर्नोल्ड.

मग त्याच्यासारखी बॉडी बनवण्यासाठी आपण जिम लावतो, वेगवेगळ्या प्रकारचे डायट सुरू करतो.

खूप पैसे खर्च करतो आणि हे सर्व करून देखील बॉडी बनली नाही तर सर्व काही बंद करून गप्प घरी बसतो.

पण घानाच्या ‘सॅम्युअल कुलबिला’ याने काहीही साहित्य नसून सुद्धा आणि कोणतेही डायट न करता अशी बॉडी बनवली आहे, जी मोठमोठ्या स्तरावरील प्रोफेशनल बॉडी बिल्डर्सना देखील टक्कर देईल.

 

Samuel Kulbilla inmarathi
instaliga.com

 

सॅम्युअलकडे भलेही जिमच्या साहित्यांची कमी होती,पण त्याच्याकडे अश्या दोन गोष्टी होत्या, ज्यामुळे तो एवढी चांगली बॉडी बनवू शकला. त्या दोन गोष्टी म्हणजे इंटरनेट आणि मेहनत.

पश्चिम आफ्रिकेच्या खूपच गरीब देशामध्ये राहणाऱ्या सॅम्युअलने येथे असलेल्या थोड्याश्या इंटरनेटने आणि इच्छाशक्तीने आपले जीवन बदलून टाकले.

 

Samuel Kulbilla inmarathi
maxthebodyclub.com

 

सॅम्युअलने जिम सुद्धा स्वतः बनवली.

सॅम्युअलने डम्बेल्स सिमेंटच्या बनवल्या आणि बारबेल्सला जुन्या लोखंडाच्या रॉडने तयार केले. बेंच आणि स्क्वॅट रॅक्स हे लाकडाचे असून ते सुद्धा हाताने बनवण्यात आलेले आहेत.

इंटरनेटवर आजकाल सॅम्युअलचे वर्कआउट रुटीन वायरल होत आहेत आणि सॅम्युअलला कितीतरी लोक सोशल मिडियावर फॉलो करत आहेत.

 

Samuel Kulbilla inmarathi
scontent.cdninstagram.com

 

आपल्या डायटला अजून चांगले करण्यासाठी त्याला सप्लीमेंटसची गरज भासत असे, पण या समस्येला त्याने आपल्या यशस्वी होण्याच्या मार्गाच्या आड येऊ दिले नाही.

सॅम्युअलने यूट्युबवर न्युट्रिशनच्या संदर्भातील कितीतरी विडीओ बघितल्या आणि त्यामधून खूप काही शिकून घेतले, फक्त पारंपारिक घाना पद्धतीचे भोजन करून जबरदस्त 8 पॅक्स बनवले.

सॅम्युअलला Kulbila_Fitness या त्याच्या इंस्टाग्रामच्या आयडीवर फॉलो करता येऊ शकते. ५ फुट ८ इंच लांब असलेल्या सॅम्युअलचे बॉडी फॅट १० टक्क्यांच्या जवळपास आहे.

आज सॅम्युअलने स्वबळावर फिट होऊन दाखवले आहे.

 

Samuel Kulbilla inmarathi
fitnessandpower.com

 

कोणत्याही ट्रेनरची मदत न घेता आणि बॉडी कशी बनवावी याबद्दल कोणतीही कल्पना नसताना, सॅम्युअलने खूप चांगल्याप्रकारे आपली बॉडी बनवली आहे.

सॅम्युअल हा त्या लोकांसाठी नक्कीच एक प्रेरणा देणारा आहे, जे मोठमोठ्या बॉडी बिल्डर्सना बघून त्यांच्यासारखी बॉडी बनवण्याचा प्रयत्न करतात.

पण बॉडी बनवताना हे नक्की लक्षात ठेवा की, कोणतीही गोष्टी खूप मेहनत घेतल्यानेच प्राप्त होते, तसेच बॉडीचे सुद्धा आहे.

खूप मेहनत घेऊन हार न मानता, जोमाने प्रयत्न चालू ठेवलात तर तुम्ही सुद्धा नक्की सॅम्युअल सारखी मजबूत बॉडी बनवू शकता.

अर्थात यातील सर्वात महत्वाची बाब ही की, फिटनेसच्या वेडापायी भलते साहस करु नका,

फिटनेस महत्वाचा असला, तरी तुमच्या जीवापेक्षा तो महत्वाचा नाही हे लक्षात ठेवा.

फिटनेस तज्ञ आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही चुकीचं धाडस करु नका.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?