Site icon InMarathi

या अंकामागे लपलेलं गुपित या लेखात तुम्हाला नक्कीच सापडेल!

108 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

=== 

आपल्या इथे अंकशास्त्र, अंकगणिती या गोष्टी प्रचंड मानल्या जातात आणि त्यांच तितकंच काटेकोर पालन देखील केलं जातं! एखादा शुभमुहूर्त ठरवण्यापासून कोणत्या तारखेला मूल जन्माला यायला हवं इथपर्यंत कित्येक गोष्टी ठरवण्यासाठी या अंकशास्त्राचा वापर केला जातो!

या गोष्टी कितपत खऱ्या असतात किंवा त्यात काही तथ्य आहे का नाही हा वादाचा विषय झाला पण हे अंकशास्त्र कधी चुकलंय असं कधीच कुणी ऐकलेल नाही! त्यामुळे त्यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे!

 

 

जसं ज्योतिषशास्त्र तसेच हे अंकशास्त्र, अगदी अचूक असं यापैकी काहीच नसतं, पण तरीही याचा अभ्यास करणारी व्यक्ति शक्य तितकं अचूक उत्तर द्यायचा प्रयत्न करते!

इस्लाम मध्ये जसे ७८६ हा आकडा खूप शुभ मानला जातो, कोणतीही मुस्लिम व्यक्ति जर ७८६ या आकड्याला फार मानते, जसं त्यामागे काही कारण आहे तसंच हिंदू आणि बौद्ध धर्मात १०८ या अकड्याला फार महत्व आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

१०८ हा अंक धार्मिक जीवनामध्ये खूप महत्त्वाचा अंक म्हणून ओळखला जातो. १०८ हा अंक खूप धार्मिक गोष्टींशी निगडीत आहे. बंगाली संस्कृतीमध्ये १०८ कमळ आणि १०८ दिवे हे दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गापूजा करण्यासाठी वापरले जातात.

हिंदू आणि बौद्ध धर्मांमध्ये जप करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जपमाळेमध्ये देखील १०८ मणी असतात. त्यामुळे अश्या अनेक मार्गांनी १०८ हा अंक आंतरिक रूपाने आपल्या संस्कृतीशी आणि जीवनाशी निगडीत आहे.

 

 

पण तुम्ही असा कधी विचार केला आहात का – की नेहमी १०८ हाच अंक का वापरला जातो?

धर्म शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांनुसार, हा अंक प्राचीन आणि आधुनिक जीवनाशी निगडीत आहे. अर्थात, ह्या गोष्टी “मानल्या” जाणाऱ्या आहेत…आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर ह्या मान्यता उत्तीर्ण होतात का, हा मोठाच प्रश्न आहे.

असो. जाणून घेऊया या अंका विषयी काही वैशिष्ट्यपूर्ण समज.

१. वैदिक विश्वाच्या मते, १०८ हा सर्व निर्मितीचा पाया आहे.

१०८ या नंबरच्या आधारे असे मानले जाते की, एक हा देवाच्या चेतनेला सूचित करते, तसेच शून्य हे निरर्थक याबद्दल संबोधित करते आणि आठ हा अंक गणिताच्या संदर्भात आहे. म्हणून १०८ हा अंक आपण काय आहोत याबद्दल सर्वकाही सांगतो.

 

 

२. वेगवेगळ्या धर्मांमध्ये १०८ अंकाचे महत्त्व वेगवेगळे आहे. तिबेटीन भिक्षूंच्या प्राचीन काळातील जपमाळेमध्ये देखील १०८ मणी असल्याचे निदर्शनास आले आहे.

तिबेटन संस्कृतीमध्ये भिक्षूंच्या चिंतन करण्याचे १०८ वेगवेगळे आहेत. तसेच प्रसिद्ध Gandjour मध्ये सुद्धा १०८ ध्यान करण्याच्या १०८ पद्धती आहेत.

 

३.जगातील फक्त प्रमुख धर्मच नव्हे तर चीनमधील गूढ आणि पुरातन समाजही या अंकाला शुभ मानतात.

हंग लीग यामध्ये  सुद्धा १०८ हा क्रमांक शुभ असल्याचे सांगितले गेले आहे.

४. विविध धर्मीयांसाठी महत्वाचा आकडा!

 

 

भारतात हिंदू धर्मातच नाही तर जैन, शीख आणि बौध्द धर्मांमधील बहुतेक धार्मिक विधी या संख्येशी जोडलेल्या आहेत, हे लोक सुद्धा या संख्येला शुभ मानतात.

 

५. हिंदू ज्योतिष शास्त्रामध्ये देखील १०८ या संख्येचे विशेष महत्त्व आहे.

 

 

६. बौद्धस्तूपावर १०८ चित्रं

 

 

काठमांडू हे शहर तुम्हाला माहित असेलच, या भागात सर्वात जास्त बौध्द धर्माचे लोक राहतात. तेथील बोधनाथ (बौधनाथ) या मंदिराच्या स्तूपावर बुद्धांची १०८ चित्रे काढण्यात आली आहेत.

७. माणसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या १०८ भावना असतात असेही गृहीत धरले जाते.

 

 

८. देवावर विश्वास असणाऱ्या व्यक्ती मानतात की, देवाला प्रसन्न करण्याचे १०८ मार्ग असतात.

 

blog.onlineprasad.com

 

९.  हिंदू मान्यतेनुसार महादेवाच्या पिंडीवर १०८ बेलपत्रे वाहिल्याने महादेव प्रसन्न होत असल्याचा समज आहे. 

 

 

१०. जगातील सर्वात प्रसिद्ध प्रागैतिहासिक स्मारकांपैकी एक असलेला सार्सेन सर्कल स्टोनहेंजचा व्यास १०८ मीटर आहे.

 

 

थोडक्यात, १०८ हा आकडा अनेक धर्म, संस्कृतींमध्ये महत्वाचा मानला जातो. असं का – ह्याची सर्वसंमत उत्तरं मात्र अजून कळायची आहेत. कारण – आधी म्हटल्याप्रमाणे – विज्ञान अजूनही ह्या श्रद्धांना “सत्य” मानायला तयार नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version