' मद्यप्रेमी असाल किंवा नसाल पण जगातल्या या महागड्या Whiskies विषयी जाणून घ्याच! – InMarathi

मद्यप्रेमी असाल किंवा नसाल पण जगातल्या या महागड्या Whiskies विषयी जाणून घ्याच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दारू आणि तिच्यापासून मिळणारा महसूल आणि त्याचं महत्व हे आपण कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन मध्ये समजून घेतले! आपल्या देशात कशाप्रकारे दारू विक्रीमधून कोट्यावधी महसूल सरकारला मिळतो ते सुद्धा पाहिलं!

यापुर्वी लॉकडाऊन मध्ये जेंव्हा प्रथम दारूची दुकानं  उघडी झाली तेंव्हा उडलेली एकच झुंबड पाहून तर आपल्याला समजलंच की दारूसाठी आपली लोकं काहीही करतील!

आता तर अनलॉक चालू झालं असल्याने दारू ही सुद्धा घरपोच मिळते आहे!

 

liquor sale inmarathi

 

दारू वगैरेचं नाव काढलं रे काढलं की आसपासच्या लोकांची नाक मुरडलीच बघा! पण मंडळी आपल्यालाही माहित आहे की, सत्य परिस्थिती काय आहे.

अगदीच कमी लोक अशी असतील ज्यांनी दारूला कधीच हात लावला नसेल, पण बाकीचे मात्र छुपे रुस्तम असतात. वरकरणी दारूचा विरोध मात्र मैफिलीत तिच्या स्तुतीशिवाय दुसरं काही सुचत नाही यांना!

असो, येथे दारू पिण्याऱ्यांच किंवा खुद्द दारूचं समर्थन वगैरे आम्ही काही करत नाही आहोत, पण विषयच तसा आहे म्हटल्यावर गाडी गेलीच की हो त्या दिशेला.

तर या दारूमधला सर्वच मद्यप्रेमींचा सर्वात आवडता प्रकार म्हणजे व्हिस्की! आता असं का… ते तुम्हाला आम्ही सांगत नाही, नसेल माहित तर तुमच्या जवळच्या एखाद्या मद्यप्रेमीला नक्की विचारा.

असो, तर आज आपण जाणून घेतोय जगातील सर्वात महागड्या व्हिस्कींविषयी! या अश्या व्हिस्की आहेत, ज्या ‘एकमेवाद्वितीय’ आहेत! आणि ते सिद्ध करायला त्यांची किंमत देखील पुरेशी आहे.

चला तर जाणून घेऊया जगातील सर्वात महागड्या व्हिस्कींमध्ये एवढं काय खास आहे ते!

Dalmore 62 Single Highland Malt Scotch Matheson – 37,16,930 रुपये

 

damore 62 years inmarathi

 

१९४२ मध्ये १२ बॉटल व्हिस्की तयार करण्यात आली होती. यातील प्रत्येक बॉटलला वेगवेगळे नाव देण्यात आले होते. परंतु, सर्व नावांमध्ये Dalmore Estate चा उल्लेख होता.

यातील सर्वांत महागडी Matheson व्हिस्की होती. या कंपनीचे मालक अॅलेक्झांडर मॅथेसन यांच्या नावावर तिचे नाव ठेवण्यात आले होते.

 

Macallan 1926 – ४८,०६,२७५ रुपये

 

macallan 1926 inmarathi

 

Macallan च्या जुन्या आणि दुर्मिळ व्हिस्कीचे मोठे कलेक्शन आहे. १९२६ मध्ये ही व्हिस्की तयार करण्यात आली होती. १९८६ मध्ये केवळ ४० बॉटलमध्ये भरण्यात आली.

ही व्हिस्की घेताना पाणी टाकावे लागत नाही.

 

Chivas Regal Royal Salute 50-Year-Old – 6,40,850 रुपये

 

chivas regel inmarathi

 

२००२ मध्ये राणी एलिझाबेथ द्वितिय यांची गोल्डन ज्युबिली साजरी करण्यासाठी Chivas Regal ने Chivas Regal Royal Salut नावाची व्हिस्की सादर केली.

ही व्हिस्की १९५२ मध्ये तयार करण्यात आली होती. तेव्हापासून ती जपून ठेवली होती. अखेर गोल्डन ज्युबिली कार्यक्रमात हीचा आस्वाद घेण्यात आला.

 

Glenfiddich 1937 – १२,८१,७०० रुपये

 

glendiddich inmarathi
eng.winestyle.ru

 

स्कॉटलंडमध्ये १९३७ मध्ये हिची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर ती तशीच बॅरलमध्ये भरून ठेवण्यात आली. २००१ मध्ये हे बॅरल उघडण्यात आले. त्यातून ६१ बॉटल व्हिस्की भरण्यात आली.

 

Macallan 1946 – 2,94,79,100 रुपये

२०१० मध्ये या व्हिस्कीची एक बॉटल लिलाव आयोजित करुन विकण्यात आली. समाजसेवेसाठी निधी गोळा करणे हा या लिलावामागचा उद्देश होता.

 

macallan whisky inmarathi

 

दुसऱ्या महायुद्धामुळे कोळशाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. त्यावेळी peated malt वर ही व्हिस्की तयार करण्यात आली होती

 

Dalmore 50-Year-Old – 7,04,935 रुपये

 

dalmore 50 year old inmarathi

 

५० वर्षांपूर्वी तयार केलेली आणि सर्वांत जास्त मागणीत राहिलेली ही व्हिस्की आहे. १९२० मध्ये हिची निर्मिती करण्यात आली. १९७८ मध्ये केवळ ६० बॉटलमध्ये ही भरण्यात आली.

यासाठी बॉटलला खुप आकर्षक बनवण्यात आले होते.

 

Glenfiddich Janet Sheed Roberts Reserve 1955 – 60,23,990 रुपये

 

gelnfiddich 2 inmarathhi

 

Glenfiddich कंपनीकडे स्कॉच व्हिस्कीचे १९५५ च्या बनावटीचे एक बॅरल होते. Glenfiddich चे संस्थापक विल्यम ग्रांट यांची मोठी मुलगी जानेट शिड रॉबर्ट यांचे ११० व्या वर्षी निधन झाले.

त्यावेळी या कंपनीने या बॅरलपासून १५ बॉटल व्हिस्की बाहेर काढली. त्यातील चार बॉटल रॉबर्ट कुंटुबाला देण्यात आल्या तर उर्वरित बॉटलची विक्री करण्यात आली.

एका व्हिस्कीप्रेमीने याची एक बॉटल अटलांटा येथून ६०,२३,९९० रुपयांना विकत घेतली होती.

 

Macallan 55-Year-Old – 8,01,062 रुपये

macallan 55 year old inmarathi

 

गेल्या ५५ वर्षांपूर्वी शेरी ओक बॅरलमध्ये हिची निर्मिती करण्यात आली. रिनी लॅलिकी यांनी तयार केलेल्या Lalique Crystal Decanter मध्ये ती भरण्यात आली. १९१० मध्ये त्यांनी अशाच एक सुगंधाच्या बॉटलची निर्मिती केली होती.

अश्या या सर्वात महागड्या व्हिस्की मार्केटमध्ये काही उपलब्ध होत नाहीत. त्या एकदाच बनवल्या गेल्या आणि एकदाच त्यांची विक्री केली गेली, आता या व्हिस्की कोण्यातरी गर्भश्रीमंतांच्या कलेक्शनमध्ये थाटात विराजमान असतील!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?