Site icon InMarathi

हार-जीत पेक्षाही, ‘पानिपतच्या’ युद्धाने मराठा साम्राज्याला दिलेला हा ठेवा अनेकांना ठाऊक नाही

panipat featured inmarathi

quora.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : शंतनू परांजपे

===

पानिपताने मराठा साम्राज्याला काय दिले यावर अनेक जणांमध्ये मतभेद आहेत. काही जण म्हणतात फायदा झाला आणि काही जण म्हणतात तोटा झाला.

ते काहीही असो पण पानिपतने मराठी भाषेला खुप फायदा झाला. कसा म्हणताय? अहो अनेक वाक्प्रचार जनमानसात रूढ झाले आणि ते रोजच्या वापरत सुद्धा वापरले जाऊ लागले.

त्यातील काही ‘सदाशिवराव भाऊ’ यांच्याबद्दल असणारे वाक्प्रचार हे पानिपत येथे राहणाऱ्या लोकांनीच वापरायला सुरुवात केली.

 

quora.com

 

पानिपत झाले/पानिपत होणे:

हा वाक्प्रचार तर पानिपत झाल्यानंतर खूपच प्रचलीत झाला. पानिपतात झालेला मराठ्यांचा संहार आणि पराभव यांमुळे ‘पानिपत होणे’ म्हणजे पराभव होणे किंवा नष्ट होणे अशा प्रकारचा शब्दप्रयोग रूढ झाला.

विश्वास तर गेला पानिपतात :

पानिपतात विश्वासरावांचा दुर्दैवी अंत झाला. तर त्यासंदर्भात या वाक्यप्रयोग केला जातो.

समजा एखाद्याने म्हटले की, तुझा माझ्यावर अजिबात विश्वास नाही तेव्हा “विश्वास तर गेला पानिपतात” असा शब्दप्रयोग सुरु झाला.

 

en.wikipedia.org

 

भाऊ की लूट:

हा वाक्प्रयोग तेव्हा वापरण्यात येतो जेव्हा एखादा माणूस दुसऱ्या मनुष्याकडे एखादी वस्तू फुकट मागू लागतो.

ज्या व्यक्तीकडे ही वस्तू मागण्यात येते तो माणूस जो दुसऱ्या माणसास ‘क्या भाऊ की लूट है क्या?’ असे म्हणतो.

याचा संदर्भ शोधायला गेलं तर कदाचित दोन घटनांमुळे हा वाक्यप्रयोग वापरत असावेत असे कळून येते. या दोन्ही घटनांचा उल्लेख शंकर नारायण जोशी यांची ‘पानिपत कुरुक्षेत्र वर्णन’ या आपल्या पुस्तकात केले आहे.

पहिली घटना अशी की, १५ ऑगस्ट १७६० च्या सुमारास जेव्हा भाऊ सैन्यासह दिल्लीत येऊन पोहोचले आणि साधारण १० ऑक्टोबरला ‘कुंजपुरा’ हे ठिकाण घेतले, त्यावेळेला मुघलांचा पराभव करून मराठ्यांनी बरीच लूट केली.

आता हा मुद्दा राहतो की, यातील प्रत्यक्ष किती लूट पेशव्यांकडे आली?

कारण एवढ्या मोठ्या सैन्याचा खर्च भागवून किती रक्कम राहणार! दुसरी घटना म्हणजे पानिपतनंतर अब्दालीच्या सैन्याने केलेली लूट जोशी यांच्यामते या दुसऱ्या घटनेमुळे हा वाक्प्रचार रूढ झाला असावा कारण ही लूट सहज मिळालेली होती.

 

wikimedia.org

 

क्या भाऊ का घोडा लगा है!

हा अजून एक वाक्प्रचार वापरला जातो तो भाऊंच्या घोड्याच्या बाबतीत आहे. हा घोडा फारच उत्तम होता असे म्हटले जात असे. विशेष प्रसंग असले की या घोड्याचा वापर भाऊ करत असत.

तिथल्या लोकांच्या मते ज्यावेळेला कुंजीपुरावर मराठ्यांनी हल्ला केला तेव्हा गावाच्या बाहेर असणाऱ्या तटावरून आत या घोड्याने उडी मारली होती.

त्यामुळे या घोड्याची किंमत ही भरपूर होती.

जर एखादा शेतकरी बैलांच्या बाजारात बैल विकत घ्यायला जात असे तेव्हा समजा समोरच्या शेतकऱ्याने जर अवास्तव किंमत सांगितली तर विकत घेणारा, ‘ तुम्हारा बैल क्या भाऊका घोडा लगता है?” असा वाक्यप्रयोग करायचे.

 

shamsher.in

 

याचा अर्थ तुझा बैल इतका चांगला आहे का की तू त्याची इतकी किंमत मागतो आहेस.

भाऊ का बन्या:

हा एक मजेशीर शब्दप्रयोग वापरला जातो. भाऊंनी उत्तरेत येताना बरेसचे द्रव्य आणले होते आणि लढाईनंतर बरीच लुटालूट झाली त्यात बरेसचे स्थानिक लोक अचानक श्रीमंत झाले.

तेव्हापासून कुणी मनुष्य अचानक श्रीमंत झाला तर त्याला “भाऊका बन्या” असे म्हणले जाऊ लागले.

भाऊ का प्रताप है:

ही सुद्धा एक मजेशीर गोष्ट आहे. भाऊंनी पानिपतवर इतका पराक्रम गाजवला की त्याचे पोवाडे तिथल्या भागात गायले जाऊ लागले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version