Site icon InMarathi

नसिरुद्दिन शहा साहेब, भारतात “मुस्लिम” असुरक्षित आहेत, की इतर कुणी?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर| इंस्टाग्राम

===

अभिनेते नसिरुद्दिन शहा यांनी नुकतेच माध्यमांसमोर एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यात ते म्हणतात,

“मला भीती वाटते की जर माझ्या मुलाला जमावाने घेरून विचारले, की तू हिंदू की मुसलमान, तर त्यावर त्याच्याकडे उत्तर नसेल. कारण त्याला आम्ही धार्मिक शिक्षण दिलेले नाही. मला याचा संताप वाटतो आणि प्रत्येक विचारी माणसाला तो वाटला पाहिजे.

काही महिन्यांपूर्वी, उपराष्ट्र्पती पदावरून पायउतार झालेल्या हमीद अन्सारी ह्यांनी त्यांचं मन मोकळं केलं होतं. ते म्हणाले होते –

मुस्लिमांच्या मनात बेचैनी आहे. त्यांच्या मनात असुरक्षितता घर करून बसतीये.

तसं हे फार वेगळं नाही.

भारतातील पुरोगामी सेक्युलर लोकांना भारतात मुस्लिम नेहेमीच असुरक्षित वाटत आले आहेत.

त्यांच्या दृष्टीने, सत्तेत अमुक अमुक प्रकारचे लोक असले की एका रात्रीत सुरक्षित चं असुरक्षित अन असुरक्षित चं सुरक्षित होतं असतं.

त्याच धर्तीवरनसिरुद्दिन शहा याचं मत होतं. त्यांचं हे मत वाचताच काही भयावह प्रसंग डोळ्यासमोरून तरळून गेले…

औरंगाबाद विमानतळावरून तस्लिमा नसरीनना हुसकून लावण्यात आलं…

 

 

तारिक फतेहना दिल्ली उर्दू फेस्टिवलमध्ये धक्का बुक्की झाली…आणि JNU मध्ये जीवे मारण्याची धमकी दिली गेली…!

 

wikimedia.org

धर्माची प्रतीकं वापरली म्हणून लोकमत कार्यालयाची तोडफोड केली गेली…

“फेसबुकवर पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या” अशी मागणी करत, ट्रॉम्बे पोलीस चौकीची तोडफोड आणि जाळपोळ केली गेली…

 

भारताशी संबंध नसलेल्या प्रकरणावरून आझाद मैदानावर यथेच्छ हिंसाचार केला गेला…तिथल्या शहिद स्मारकाची विटंबना केली गेली…

 

पैगंबरांवर चित्रित चित्रपटाला संगीत दिलं म्हणून ए आर रहमानवर फतवा निघाला…!

 

न घाबरता, उच्चारवात भारत माता की जय/वंदे मातरमला उघड विरोध केला गेला…अजूनही बिनधास्त विरोध केला जातो…

 

मालदामध्ये “कमलेश तिवारीचा शिरच्छेद करा” म्हणून लाखो लोकांनी तोडफोड आणि हिंसा केली…

 

 

बसिरहाटमध्ये एका साध्या सोशल मीडिया पोस्टवरून दंगे सुरू झाले…

“तुम १०० करोड है ना? हम २५ करोड है ना? १५ मिनट के लिए पुलीस हटा दो…” असं अकबरुद्दीन ओवैसी म्हणू शकले…त्या म्हणण्यावर जमलेल्या श्रोता समुदाय कडाडून टाळ्या वाजवू शकला…

 

 

“नरेंद्र मोदींची दाढी कापा…केस छाटा आणि तोंड काळे करा…” अशी सुपारी कम फतवा मौलाना नुरूर रहमान बरकती उघड उघड बोलू शकले…

“आमची संख्या वाढू द्या…तुमच्या घरात घुसून आम्ही नमाज पढू” असं मौलाना अश्रफ जीलानी म्हणू शकले…

वरील सर्व उदाहरणांमध्ये काश्मीरमधील उदाहरणे मोजली नाहीयेत…अन्यथा ही यादी अनंत होऊ शकते.

हे सर्व वाचून…नसिरुद्दीन शहा ह्यांना आणि तमाम पुरोगामी सेक्युलरांना प्रश्न विचारावासा वाटतो…

भारतात खरे भयभीत कोण आहेत हो?

मुसलमान?

की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य मानणारे तस्लिमा नसरीन, तारिक फतेह आणि ए आर रेहमान?

असुरक्षित कोण आहेत हो?

मुसलमान?

की लोकमत सारखी माध्यमं, शाहिद स्मारकासारखी आपली मानचिन्ह की खुद्द पोलीस?

चिंताक्रांत कोण असतील?

मुसलमान?

की सोशल मीडियावर आपल्या मनातील भावना व्यक्त करणारा कोणताही भारतीय?

खरंच…

खरंच भयभीत आणि असुरक्षित कोण आहे? मुस्लिम की इतर कुणी?

 

इथे सरसकट “सर्व मुस्लिम” वाईट, हिंसक, अतिरेकी आहेत असं म्हटल्याचा भास निर्माण होत असेल – तर तसा हेतू अर्थातच नाही. परंतु देशात मुस्लिमांविरुद्ध जनमत तयार होत असेल, वातावरण गरम होत असेल तर मुस्लिमांनी अंतर्मुख होऊन आपल्यातील हे अनिष्ट अंग काढून टाकायला हवेत.

जबाबदार अभिनेते म्हणून नसिरुद्दीन शहा यांनी हे बदल घडवून आणण्यात पुढाकार घ्यायला हवा. विचारवंतांनी आपली जबाबदारी म्हणून प्रबोधन घडवून आणायला हवं.

परंतु ते नं करता शहा चक्क उलट काहीतरी बोलत आहेत. म्हणून आज ह्या घटनांची, उदाहरणांची उजळणी करावीशी वाटली.

तथाकथित विचारवंतांनी “विचार” करायला हवा. त्यांनी चिंतनात आणि चिंतेत असायला हवं. खरे चिंतीत मुस्लिमांना व्होटबँक समजणारे आहेत. मुस्लिम समाज पुढारला तर व्हॉटबँकेचे राजकारण केल्याशिवाय सत्तेत येता यायचे नाही म्हणून भयभीत आहेत.

ह्या समस्यांचा गांभीर्याने विचार करायला हवाय – अन्यथा मुस्लिमेतरांमधील रोष वाढत जाईल…जे भारतासाठी घातक ठरेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version