Site icon InMarathi

रेल्वेने प्रवास करणार असाल तर हे नियम तुम्हाला ठाऊक असायलाच हवेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

लहानपणी ‘झुक झुक अगीनगाडी’ हे गाणं गाताना आणि ऐकताना खूप आनंद वाटत असे. त्या गाडीत बसल्यावर किती मज्जा येईल याची कल्पना करूनच अंगावर रोमांच उमटतं. अशी ही रेल्वे मोठे झाल्यावर मात्र आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते. कोणत्याही ठिकाणी प्रवास करायचा झाल्यास, पहिल्यांदा रेल्वेचाच विचार मनामध्ये येतो.

रेल्वे ही जनसामन्यांसाठी बीएमडब्लू किंवा मर्सिडीजचं आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. कमी खर्चामध्ये आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी योग्य वेळेमध्ये पोहचवण्याचे काम रेल्वे करते. रेल्वेचा प्रवास हा कधीही न विसरता येण्यासारखा असतो.

 

 

गावाला जायचे असो किंवा फिरायला जायचे असो, नेहमी प्रवासासाठी पहिला पर्याय हा रेल्वेच असतो आणि तो आपल्याला आवडतो सुद्धा. याच रेल्वेचे काही असे नियम आहेत, जे कदाचित तुम्हाला माहित नसतील.

चला मग त्या माहित नसलेल्या नियमांविषयी काही माहिती जाणून घेऊया.

 

media2.intoday.in

१. तुम्हीही असा अनुभव घेतला असेल की, कधी कधी टीसी रात्रीचे तिकीट चेक करण्यासाठी येतात, त्यामुळे आपली झोप मोड होते. पण तुम्हाला माहित आहे का रेल्वेचा असा नियम आहे की,  रिझर्वेशन डब्यामधील प्रवाश्यांचे तिकीट प्रवास सुरू होण्याच्या आधीच तपासले गेले पाहिजेत.

 

 

एकदा तिकीट तपासल्यानंतर कोणतेही कारण नसताना परत प्रवाश्यांकडे तिकीटाची विचारणा करू शकत नाही. पण नव्या बदलण्यात आलेल्या नियमामध्ये काही अश्या तरतूदी करण्यात आल्या आहेत की, ज्यामुळे टीसी रात्री तिकीट तपासण्यासाठी येऊ शकतो.

– जर प्रवाश्याने रात्री १० वाजता प्रवास सुरू केला असेल तर, टीसी रात्री तिकीट तपासण्यासाठी येऊ शकतो किंवा जर प्रवास सकाळी ६ वाजेपर्यंत संपणार असेल तरी देखील टीसी रात्री तिकीट तपासण्यासाठी येऊ शकतो.

 

 

– जर प्रवाश्यांचे तिकीट प्रवास सुरू होण्या अगोदर तपासले नसेल, तर अश्या परिस्थितीमध्ये टीसी रात्रीच्या वेळेस तिकीट तपासण्यासाठी येऊ शकतो.

२. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, जर एखाद्या रिझर्वेशन असलेल्या व्यक्तीचं सामान प्रवासादरम्यान चोरी झाले, तर तो व्यक्ती रेल्वे बोर्डाकडून आपल्या सामानाची भरपाई मागू शकतो. त्यासाठी प्रवास करणाऱ्या व्यक्तीला रेल्वे पोलिसांना एफआयआरच्या बरोबर एक फॉर्म पण भरून द्यावा लागतो.

 

 

ज्यामध्ये असा उल्लेख असतो की, जर प्रवाश्याला सहा महिन्यांच्या आत जर त्याचे सामान परत मिळाले नाही, तर तो त्या सामानाची नुकसान भरपाई मागण्यासाठी ग्राहक मंचाकडे सुद्धा जाऊ शकतो.

सामानाच्या किंमतीचे मुल्यांकन करून ग्राहक मंच रेल्वेला भरपाई देण्याचे आदेश देते. यामध्ये महत्त्वाचे हे आहे की, एफआयआर दिल्यानंतर लगेच जीआरपीने प्रवाश्याकडून ग्राहक मंचाचा फॉर्म भरून घेणे गरजेचे आहे.

 

 

३. प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे वेटिंग तिकीट असल्यास तो व्यक्ती रिझर्वेशनच्या डब्यामधून प्रवास करू शकत नाही. जर तो त्या डब्यामधून प्रवास करत असेल, तर त्याला कमीत कमी २५० रुपये दंड भरावा लागेल आणि नंतर त्याला पुढच्या स्थानाकापासून जनरल डब्यामधून प्रवास करावा लागेल.

पण जर चारपैकी दोन जणांची तिकिटे कन्फर्म झाली असतील, तर टीसीकडून परवानगी घेऊन बाकी दोघे त्यांच्या सीटवर जाऊन बसू शकतात.

 

i.ytimg.com

४. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, जर रेल्वेमध्ये कोणत्याही १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाला विना तिकीट प्रवास करताना पकडल्यास, त्याच्याकडून तिकीट तपासणारा स्टाफ दंड आकारणार नाही, त्याच्याकडून केवळ प्रवासी तिकिटाचे भाडे घेण्यात येईल.

 

 

या नियमामध्ये असे सुद्धा सांगितले आहे की, जर अश्या मुलाविरुद्ध काही कारवाई करायची असेल तर पहिल्यांदा रिपोर्ट बनवावा लागेल आणि त्यानंतरच कारवाई केली जाईल.

अजून काही नवीन नियम खालीलप्रमाणे आहेत-

– जर तुम्ही तात्काळ तिकीट रद्द केलेत, तर त्याच्या एकूण भाड्याच्या ५० % पैसे परत केले जातील, १ जुलै पासून तात्काळ तिकीट बुकिंग करण्याच्या वेळत सुद्धा बदलण्यात करण्यात आला आहे.

– तात्काळ विंडो १ जुलैपासून एसी कोचसाठी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत आणि स्लीपर कोचसाठी ११ ते १२ वाजेपर्यंत चालू असते.

– राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसमध्ये १ जुलैपासून फक्त मोबाईल तिकीटच ग्राह्य मानले जात आहे.

– आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त प्रादेशिक भाषांमध्ये देखील तिकीट दिले जाणार आहे.

– आतापासून रेल्वेमध्ये वेकअप कॉल-डेस्टिनेशन अलर्ट सुविधा सुद्धा दिली जाणार आहे.

तर मंडळी असे आहेत हे रेल्वेचे काही नवीन नियम, तुमच्या मित्र मंडळींसोबत हा लेख शेअर करा आणि त्यांना देखील हीमाहिती पुरावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version