Site icon InMarathi

१३०० चीनी विरुद्ध १२० भारतीय- ‘चीनी’ सैन्याला अद्दल घडविणारी एक ऐतिहासिक लढाई!

battle of razang la inmarathi

soldier2ndlife

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारत आणि चीन या दोन देशांचे चांगले संबंध म्हणजे अळवावरचं पाणी आहे, कधी हे चांगले संबध गळून पडून दोन्ही देश एकमेकांना लक्ष्य करतील ते सांगता येत नाही.

ज्या प्रमाणे भारत-पाकमध्ये तणावपूर्ण स्थिती असते, तसेच या दोन देशांमध्ये सारखे काही न काही खटके उडत असतात.

जसे भारत-पाक यांचे संबंध तणावपूर्ण आहेत, तसेच भारत-चीन यांचे संबंध सुद्धा काही चांगले नाहीत. 

भारत-चीनमध्ये काही छोट्या-मोठ्या लढाया सुद्धा झाल्या. त्यामधीलच एक लढाई म्हणजे १९६२ मध्ये भारत-चीन यांच्यादरम्यान झालेले रेजांगला चे युद्ध.

आज या साहसी आणि अद्भुत युद्धाबद्दल आपण जाणून घेऊया.

 

cdn.wittyfeed.com

 

रेजांग ला भारताच्या जम्मू-काश्मीर राज्याच्या लडाख भागातील चुशूल दरीच्या दक्षिण-पूर्व भागातून जाणारा घाटमार्ग आहे.

हा रस्ता २.७ किमी लांब आणि १.८ किमी रुंद असून तो सरासरी १६००० फुट उंचीवर स्थित आहे.

१९६२ च्या भारत-चीन युद्धामध्ये रेजांग ला भागात कुमाऊं रेजिमेंटची १३ वी बटालियन शत्रूच्या चिंधड्या उडवण्यासाठी सज्ज होती आणि या तुकडीचे नेतृत्व करत होते मेजर शैतान सिंह!

१८ नोव्हेंबर १९६२ रोजी कुमाऊं रेजिमेंटच्या १३ व्या बटालियनचे १२० सैनिक रेजांग ला भागात कार्यरत होते.

पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी जवळपास ५००० चीनी सैनिकांनी चुशूल दरीमध्ये तैनात असणाऱ्या सैनिकांवर हल्ला चढवला.

 

images.rajasthanpatrika.com

 

चीनच्या पहिल्या दलाने भारतीय सैनिकांवर हल्ला चढवल्यानंतर लगेचच भारतीय सैनिकांनी या हल्ल्याला धाडसाने प्रत्युतर दिले आणि हा हल्ला अयशस्वी करून दाखवला.

पण चिवट चीनी सैनिकांनी दुसरा हल्ला केला, हा हल्ला सुद्धा भारतीय सैनिकांनी मोडून काढला.

पण अजूनही हार न मानलेल्या चीनी सैनिकांनी शेवटचा तिसरा जोरदार हल्ला भारतीय सैनिकांवर चढवला.

एव्हाना भारतीय सैनिकांचा दारुगोळा संपुष्टात आला होता आणि दारू गोळ्याचा अतिरिक्त साठासुद्धा त्यांच्याकडे नव्हता, परंतु भारतीय सैनिकांनी हार मानली नाही आणि मोठ्या धैर्याने ते शत्रूला सामोरे गेले.

आपल्या हातातील बंदुकाच शत्रूसाठी पुरेश्या आहेत, अश्या गर्जना करीत त्यांनी चीनी सैनिकांना आपल्या बंदुकींनीच टिपायला सुरुवात केली,

आणि याप्रकारे या लढाईमध्ये फक्त १२० भारतीय सैनिकांनी १३०० चीनी सैनिकांना यमसदनी धाडले. पण या लढाईमध्ये भारताचे देखील १२० पैकी ११० सैनिक मारले गेले होते.

१३ व्या कुमाऊं बटालियनमधील बहुतांश सैनिक हे हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यामधील होते. त्यांनी गाजवलेल्या या अतुलनीय शौर्याप्रीत्यर्थ येथे स्मारक देखील उभारण्यात आले आहे.

 

rrgwrites.files.wordpress.com

 

१३ व्या कुमाऊं बटालियनचे नेतृत्व करणारे मेजर शैतान सिंह यांना त्यांच्या शौर्यासाठी त्यांच्या मरणोत्तर परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.

या बटालियनला ४ सेना पदक आणि ५ वीर चक्र सुद्धा प्रदान करण्यात आले होते.

रेजांग ला मध्ये आजही एक युद्ध स्मारक पाहायला मिळते, ज्यावर थॉमस बॅबिंगटन मॅकालेची सुंदर कविता “होरेशियो”तील काही ओळी लिहून, त्या अद्भुत लढाईचे वर्णन केलेले आहे.

 

http://www.himalayandiaries.com

 

रेजांगला ची ही लढाई युनेस्कोने प्रकशित केलेल्या जगातील सर्वोत्तम धाडसी आठ लढायांपैकी एक आहे. या लढाईमध्ये भारतीय सैन्य मोठ्या वीरतेने लढले.

एका सैनिकाने जवळपास १० चीनी सैनिकांना मारले होते. त्यांनी स्वतः मरणाला मिठी मारली,पण मागे हटले नाही. शेवटपर्यंत लढा देत त्यांनी चीनी सैन्याला माघारी धाडले.

कदाचित ह्याच युद्धापासून प्रेरित होऊन “ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख में भरलो पानी” या गाण्यामध्ये “एक-एक ने १० को मारा, फिर अपनी लाश बिछा दी” या ओळी  लिहिल्या गेल्या असाव्यात.

गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गाणं ऐकून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचेही डोळे पाणावले होते.

भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्यगाथांपैकी एक अशी ही शौर्यगाथा, ही भारतीय इतिहासातून कधीही पुसली जाणार नाही….जय हिंद!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version