‘इन्कलाब झिंदाबाद’ : करोडो लोकांच्या मनात स्फुलिंग पेटवणाऱ्या घोषणेचा जाज्वल्य इतिहास!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय स्वातंत्र्यलढा म्हणजे जागतिक इतिहासातील नावाजलेल्या क्रांतींपैकी एक म्हणून ओळखला जातो.
परकीयांचे शासन उलथून टाकण्यासाठी ज्या काही सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी दिवसरात्र एक करून झुंज दिली त्याचेच फळ म्हणून आपला भारत स्वतंत्र झाला. या स्वातंत्र्यलढ्यामध्ये ब्रिटीश सरकार विरोधी आणि स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ अनेक घोषणा देण्यात आल्या.
या केवळ घोषणा नव्हत्या तर ती एक डरकाळी होती, जी ऐकून साता समुद्रापार बसलेल्या ब्रिटीश सत्ताधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले.
या घोषणांपैकी गाजलेली घोषणा म्हणजे- ‘इन्कलाब झिंदाबाद’!
‘इन्कलाब झिंदाबाद’ हा नारा दिल्यावर एक वेगळाच जोश क्रांतिकारकांमध्ये निर्माण होत असे.
याच घोषणा देत भगत सिंग आणि राजगुरू आनंदाने फासावर चढले. चंद्रशेखर आझादांनी सुद्धा इंग्रजांनी वेढलेले असताना याच घोषणेचा अखेरचा उच्चार करून आपले प्राण त्यागले होते.
तर मित्रांनो, या घोषणेमागचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?
बरेच जण म्हणतील की, ही घोषणा शहीद भगत सिंगांनी भारताला दिली होती, पण मंडळी तुम्हाला सांगावेसे वाटते की भगत सिंगांच्या जन्माच्या अगोदरच या घोषणेचा जन्म झाला होता.
पहिल्यांदा ही घोषणा Mexican Revolution च्या वेळी विवा ला रेवोलुशन (Viva la Revolución) या नावाने जन्मास आली. या घोषणेचा उद्देश लोकांच्या मनामध्ये स्फूर्ती निर्माण करून सरकारच्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवण्यास त्यांना प्रेरित करणे असा होता.
मेक्सिकन क्रांतीमध्ये या घोषणेने खूप महत्त्वाची भूमिका बजावली. मेक्सिकन क्रांतीमध्ये या घोषणेचा एवढा परिणाम झाला की, इतर देशांमध्ये सुद्धा आपापल्या हिशोबाने या घोषणेचे भाषांतर करून तिचा वापर करण्यास सुरुवात झाली.
हीच घोषणा भारतामध्ये ‘इन्कलाब झिंदाबाद’ या नावाने उदयास आली.
‘विवा ला रेवोलुशन’ या घोषणेचे ‘इन्कलाब झिंदाबाद’मध्ये रुपांतर करण्याचे श्रेय जातं- प्रसिद्ध उर्दू शायर मौलाना हसरत मोहानी यांना. ते एक क्रांतिकारी साहित्यकार, शायर, पत्रकार, इस्लामिक विद्वान आणि समाजसेवक होते.
मौलाना हसरत मोहानी यांचा जन्म १ जानेवारी १८७५ मध्ये उन्नाव जिल्ह्यातील कस्बा मोहान या गावामध्ये झाला होता. मौलाना हसरत मोहानी यांचे पूर्ण नाव सय्यद फ़ज़ल-उल-हसन तख़ल्लुस हसरत हे होते.
त्यांनी दिलेल्या ‘इन्कलाब झिंदाबाद’ या घोषवाक्याने भारतीयांच्या मनात देशप्रेम जागृत केले आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक नवीन उमेद लोकांमध्ये निर्माण केली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांचे हे घोषवाक्य प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये खोलवर कोरले गेले आहे.
या घोषणेचा अर्थ ‘क्रांती अमर रहे’ असा होतो. या घोषणेचा प्रभाव लक्षात घेता, चंद्रशेखर आझाद आणि भगत सिंग यांच्या ‘हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ने या घोषणेचा प्रसार केला. त्यांनी आपल्या संघटनेचे ते अधिकृत घोषवाक्य बनवले.
भारतामध्ये त्या वेळी ही घोषणा जनमाणसाचा आवाज बनली होती. भगत सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ८ एप्रिल १९२९ मध्ये दिल्लीच्या विधानसभेमध्ये बॉम्ब फोडून याच घोषणेचा जयघोष केला आणि तेव्हा खऱ्या अर्थानं प्रत्येक भारतीयाच्या मनात ही घोषणा घुमत राहिली, जीचा आवाज आजही आपल्या प्रत्येकाच्या मनात कोठे न कोठे घुमतो आहे.
जेव्हा-जेव्हा अन्यायाचे घडे भरतील तेव्हा-तेव्हा भारतीय एकजूट होतील, क्रांती घडवतील आणि पुन्हा एकदा मोठ्याने गर्जतील – ‘इन्कलाब झिंदाबाद’!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.