Site icon InMarathi

“कॅशलेस व्यवहार करा” हे मोदींचं वाक्य अमलात आणणारं “१०० % डिजिटल” गाव! वाचा या आधुनिक गावाची गोष्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘डिजिटल इंडिया’… घाबरू नका, हे डिजिटल इंडियावरचं लेक्चर नाही… तर डिजिटल इंडियाच्या त्याच त्या रटाळ बातम्या सोडून आज आपण काहीतरी वेगळं बघणारं आहोत. आज आपण जाणार आहोत एका गावात… माफ करा , एका डिजिटल गावात…

thehindubusinessline.com

देशाचं पहिलं वहिलं डिजिटल गाव “अकोदरा”… गुजरातची राजधानी अहमदाबाद पासून ९० किलोमीटरच्या अंतरावर वसलेल्या या गावात कुणीच “पैसे” वापरत नाही. हे पचवायला थोडं जड आहे पण सत्य आहे. एकीकडे आपण कितीही टेकनॉलॉजी वापरत असलो तरी बाहेर जाताना पाकीट नेणं मात्र विसरत नाही…कारण पैश्यांची गरज तर कुठेही पडत असते ना…! पण विचार करा जरा –

तुम्हाला पैश्यांची गरजच नाही पडली तर…?

अकोदरा या गावात कुणीच पैसे वापरत नाही, हे गाव पूर्णपणे डिजिटल झालेलं आहे. या गावाची लोकसंख्या १,१९१ आहे, इथे २५० कुटुंब राहतात. आईसीआईसीआई बँकेने २०१५ मध्ये या गावाला दत्तक घेतलं होतं.

नोट बंदीच्या निर्णयानंतर देशातील जनतेला मोठ्या आर्थिक तुटवड्याचा सामना करावा लागला होता, मात्र त्याही परिस्थितीत या गावात सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते. कारण या गावात पैश्यांचा वापरच होत नाही, सर्व डिजिटली चालतं, मग कसला “चलन तुटवडा” ?

१ जुलै २०१५ ला देशात “डिजिटल इंडिया” ही मोहीम सुरु करण्यात आली. याचा उद्देश देशातील प्रत्येक गावाला इंटरनेटशी जोडून देशाच्या प्रत्येक नागरिकाला डिजिटली साक्षर बनवणे होता. या मोहिमेत भाग घेत आईसीआईसीआई बँकेने नागरिकांत आर्थिक साक्षरता वाढविण्याचं काम केलं.  मोठ-मोठ्या शहरांत मोठ्या प्रमाणात लोक डिजिटली साक्षर आहेत, पण आईसीआईसीआई बँक मात्र – गावांना १०० टक्के डिजिटल बनविण्याचं धोरणं  घेऊन आली. त्यामुळे आईसीआईसीआई या गावाला दत्तक घेतलं. आकोदरा  हे गाव आईसीआईसीआई बँकेचं ड्रीम प्रोजेक्ट आहे.

thehindubusinessline.com

आकोदरा गावात ऍनिमल होस्टेल देखील आहे. हे आशियातील पहिलं ऍनिमल होस्टेल आहे. गावातील सर्व जनावर इथे ठेवले जातात. धान्य आणि दूध विक्री देखील इथे कॅशलेस पद्धतीने होते. ५ रुपयावरील खरेदी-विक्रीसाठी येथील लोक कार्ड किंवा मोबाईल ट्रँजॅक्शनचा वापर करतात.

या गावात प्रायमरी, सेकंडरी आणि हायस्कुल आहे, जिथे सर्व सोयी-सुविधा आहेत. इथे विद्यार्धी स्मार्ट-बोर्ड, कंप्यूटर आणि टॅबलेट वर शिकतात, तर त्यांची उपस्थिती कार्ड स्वाईप करून घेतली जाते. तसेच या गावात ई-हेल्थ सेंटर देखील आहे, जिथे एका बटनवर मेडिकल रेकॉर्ड मिळतात.

आकोदरा  या गावाला निवडण्यामगचं  कारण म्हणजे इथली साक्षरता. या गावातील १०० टक्के लोक साक्षर आहेत. आईसीआईसीआई बँकेने चार महिन्यातच या गावाला डिजिटल बनविण्यास सुरवात केली होती. सुरुवातीला या बँकेत केवळ १०० खाते होते पण आता इथे १२०० खाते आहेत. इथल्या प्रत्येक गावात एक बँकी खात आहे. एवढंच नाही तर बँकेने इथल्या महिला, पुरुष आणि वृद्धांना मोबाईल बँकिंगची ट्रेनिंग दिली आहे.

thehindubusinessline.com

२ जानेवारी २०१५ पर्यंत हे गाव पूर्णपणे डिजिटल झाल होतं. या गावात वाय-फाय कनेक्शन आहे सोबतच या गावाची स्वतःची एक वेबसाईट देखील आहे. इथे मोबाईल बँकिंग हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेत उपलब्ध आहे. इथे तीन मायक्रो एटीएम आहेत. तसेच ग्राम पंचायत स्तरावर को-ऑपरेटिव्ह सोसायटी देखील आहे. इथे एक पाणीशुद्धीकरणाचा RO प्लांट देखील आहे.

स्वप्नातलं वाटणारं हे गाव डिजिटल इंडिया कसा असायला हवा याचं उत्तम उदाहरणं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आकोदरा या गावाला देशातील पहिलं डिजिटल गाव म्हणून पुरस्कृत केलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version