Buy 1 Get 1 Free ऑफर मागील हे धक्कादायक सत्य जाणून घ्या…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कोणताही सण आला की, ऑनलाइन वेबसाईटवर खूप सवलती दिल्या जातात, असेच काहीसे चित्र आपल्याला लोकल बाजारामध्ये देखील दिसते. आपण खूप ठिकाणी सवलती बरोबरच “बाय वन गेट वन फ्री” ही ऑफर सुद्धा बघतो.
डिसेंबर महिना म्हणजे तर खरेदीचा मुहुर्त. लग्नसराई, ख्रिसमस, ३१ डिसेंबर पार्टी अशा अनेक कारणांसाठी तुम्हीही खरेदीची सुरुवात केली असेल. ही खरेदी ऑनलाईन असो वा दुकानांमधील… तुम्ही सर्वात आधी डिस्काऊंट किंवा बाय वन गेट वन फ्री या ऑफर्सचा शोध घेता.
तेव्हा आपल्या मनामध्ये एक प्रश्न नक्की निर्माण होतो की, या लोकांना एकावर एक वस्तू फ्री देणं कसं काय परवडत असेल, एक वस्तू घेऊन दुसरी वस्तू काहीही पैसे न घेता अशीच देणे म्हणजे स्वतःचा व्यवसाय तोट्यामध्ये घालणं नाही का?
मग असं करण्यामागे त्यांचा काय हेतू असतो? चला तर मग आज या बाय वन गेट वन फ्री मागची माहित नसलेली सत्यता जाणून घेऊया!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
बाय वन गेट वन फ्री हा विक्रेत्यांसाठी ग्राहकांना आकर्षित करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, कारण या बाय वन गेट वन फ्री सोबतच विक्रेते इतर वस्तू खरेदी करण्यासाठी देखील ग्राहकांना प्रवृत्त करतात. खाली दिलेल्या या तीन कारणांमुळे हे सिद्ध होतं की, बाय वन गेट वन फ्री ही दिसते तेवढी फायदेशीर डील नाही.
१. बाय वन गेट वन फ्री हे तुम्हाला तुमच्या गरजेपेक्षा जास्त वस्तू विकत घेण्यास प्रवृत्त करते.
बाय वन गेट वन फ्री या स्कीमचा फायदा दुकानदाराला असा होतो की, या स्कीममुळे ग्राहक नेहमीच अतिरिक्त वस्तू खरेदी करतो ज्याचा त्याला बहुधा काहीही उपयोग नसतो.
त्यामुळे एखादी वस्तू जर ग्राहकाला आकर्षक वाटली आणि त्यावर बाय वन गेट वन फ्री ही ऑफर दिली गेली असेल तर तशी वस्तू ग्राहक कोणताही विचार न करता खरेदी करतात.
२. बाय वन गेट वन फ्री असलेल्या वस्तू खराब आणि वापरलेल्या असतात.
ही गोष्ट तुम्हाला धक्का देणारी असेल, पण हे सत्य आहे. बाय वन गेट वन फ्री ऑफर मध्ये देण्यात येणाऱ्या वस्तू या सहसा वापरलेल्या असतात, तसेच कधी कधी या वस्तू खराबसुद्धा असतात.
सदर गोष्ट कपडे, शूज, अॅक्सेसरिजना मोठ्या प्रमाणात लागू होते. अनेक वेळा स्वत: ग्राहकाने देखील आपल्याला बाय वन गेट वन फ्री मध्ये मिळालेले प्रोडक्ट हे ओरिजिनल नसल्याची तक्रार केली आहे.
–
- सर्रास ऑनलाईन शॉपिंग करताय..ह्या ६ गोष्टी ऑनलाईन घ्यायचं शक्यतो टाळा!
- शॉपिंग मॉलमध्ये गरजेपेक्षा जास्त खर्च कसा होतो? या तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर हे नक्की वाचा
–
३. बाय वन गेट वन फ्री ऑफरमध्ये किंमती वाढवलेल्या असतात.
बाय वन गेट वन फ्रीच्या ऑफरमध्ये साधारणपणे वस्तूंच्या किंमती त्याच्या खऱ्या किंमतीपेक्षा जास्त असतात.
उदारणार्थ, एक शर्ट हा गेल्या दोन आठवड्यांपूर्वी ५०० रुपयांना मिळत होता, परंतु आता तोच शर्ट बाय वन गेट वन फ्रीच्या ऑफरमध्ये ७०० रुपयांना मिळतोय आणि सोबत दुसरा शर्ट फ्री मध्ये मिळतोय. तर यामध्ये ग्राहकाचे पैसे वाचत आहेत, असे वाटते.
पण या ऑफर नुसार दुसरा शर्ट हा फुकट मिळाला पाहिजे होता, पण ग्राहक दुसऱ्या शर्टसाठी अतिरिक्त २०० रुपये देतोय, म्हणजेच दुसऱ्या शर्टचे ग्राहकाचे पूर्ण ५०० रुपये वाचायला पाहिजे होते, परंतु शर्टची किंमत वाढवल्याने या खरेदीमध्ये ग्राहकाचे ५०० रुपये वाचण्याऐवजी फक्त ३०० रुपयेच वाचले.
ही अतिशय सामान्य अशी विक्रीची रणनीती आहे.
परंतू बाय वन गेट वन फ्रीच्या ऑफरमध्ये ग्राहकांनी जर किराणामाल खरेदी केला तर ग्राहकांना फायदा होऊ शकतो. कारण त्यांच्या किंमती विक्रेते वाढवू शकत नाही.
पण तेच जर अगोदर सांगितल्याप्रमाणे कपडे, शूज वा अॅक्सेसरिजच्या दुकानामध्ये बाय वन गेट वन फ्रीची ऑफर दिली असेल तर त्यामध्ये ग्राहकांना जास्त फायदा होत नाही. कारण त्यांच्या किंमती विक्रेते मनाप्रमाणे वाढवून सांगतात.
हे लक्षात ठेवा की, बाय वन गेट वन फ्री ऑफर मध्ये ग्राहकाने प्रत्येकवेळी दोन्ही वस्तूच खरेदी करायला हव्यात असा काही नियम नाही. तो अर्ध्या किंमतीमध्ये एकच वस्तू देखील खरेदी करू शकतो.
म्हणजे बाय वन गेट वन फ्रीच्या ऑफरमध्ये दाखवलेल्या एखाद्या बॅगवर दुसरी बॅग फ्री न घेता, ऑफरमध्ये सांगितलेली रक्कम अर्धी करून ग्राहक एक बॅग खरेदी करू शकतो, पण प्रत्येक दुकानदार ही गोष्ट तुम्हाला सांगेलच असं नाही, किंवा असे करण्यास आडकाठीही करेल. कारण ही गोष्ट त्यांच्या बिलकुल फायद्याची नाही.
त्यामुळे यापुढे गरज नसताना बाय वन गेट वन फ्री ऑफरच्या कचाट्यात येऊ नका आणि एकावर एक फ्री वस्तू मिळतेय म्हणून २ वस्तू खरेदी करून दुसरी वस्तू वाया घालवू नका!
कधीही बाय वन गेट वन फ्री ऑफरचा लाभ घेण्यापूर्वी ज्या वस्तूवर ती ऑफर आहे, त्या वस्तूची किंमत बाजारात इतरत्र पहा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.