Site icon InMarathi

शब्दांनी नव्हे तर कृतीतून अपमानाची परतफेड कशी करावी हे सांगणारी टाटांची ही कथा

ratan tata feature InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय उद्योगक्षेत्रामधील अग्रगण्य नाव म्हणजे रतन टाटा!

रतन टाटांनी आपल्या जीवनामध्ये खूप अडीअडचणींचा सामना करून एक मोठा व्यवसाय निर्माण केला. रतन टाटांनी जेव्हा पहिल्यांदा प्रवासी कारच्या (Passenger Cars) व्यवसायामध्ये पाऊल ठेवले, तेव्हा त्यांना खूप संघर्ष करावा लागला.

या संघर्षा दरम्यान त्यांना अनेक लोकांची बोलणी खावी लागली, अनेकांनी त्यांचा अपमान केला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्यापैकी एका अपमानाचा बदला म्हणून त्यांनी जॅग्वार कार्सची मालकी विकत घेतली, चला मग जाणून घेऊया नक्की काय आहे हा प्रसंग…!

 

 

रतन टाटांनी बिल फोर्ड याच्याकडून झालेल्या आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी जॅग्वार-लँड रोवर कंपनी विकत घेतली.

१९९८ मध्ये रतन टाटांनी प्रवासी कारच्या व्यवसायामध्ये उतरण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी योग्य त्या योजना देखील बनवल्या.

टाटा समूहाने आपली पहिली प्रवासी कार इंडिका १९९८ ला लाँच केली. पण टाटा इंडिकामुळे टाटा समूहाला पहिल्या वर्षामध्ये काही जास्त फायदा झाला नाही. त्याउलट ते खूप तोट्यात गेले.

 

खूप लोकांनी रतन टाटांना सल्ला दिला की, त्यांनी प्रवासी कारचा व्यवसाय बंद करावा. टाटांना त्या लोकांचे म्हणणे पटले.

त्यानंतर त्यांनी फोर्ड कंपनीला याबद्दलचा प्रस्ताव पाठवला. फोर्डने टाटा मोटर्स खरेदी करण्यामध्ये रस दाखवला.

रतन टाटा आपल्या सहकाऱ्यांना घेऊन डेट्रोइटला फोर्ड कंपनीच्या मालकांशी चर्चा करण्यासाठी गेले. डेट्रोइटला फोर्डचे मुख्य कार्यालय आहे.

त्या तीन तासाच्या बैठकीमध्ये रतन टाटांच्या असे लक्षात आले की, फोर्डचे अधिकारी खुद्द रतन टाटांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत.

 

 

या बैठकीमध्ये फोर्डचे मालक बिल फोर्ड यांनी रतन टाटांचा अपमान करताना म्हटले की,

तुम्हाला जर प्रवासी कारच्या व्यवसायाबद्दल काही माहित नव्हते तर, तुम्ही या व्यवसायामध्ये आलातच का? ही कंपनी विकत घेतली, तर मी तुमच्यावर एक प्रकारे उपकारच करेन.

 

 

झालेल्या अपमानामुळे संतापलेल्या रतन टाटांनी डील रद्द करून घरी परतण्याचे ठरवले. संपूर्ण प्रवासामध्ये त्या झालेल्या अपमानामुळे ते खूप चिंतेत होते.

ती एकच गोष्ट सारखी त्यांच्या मनामध्ये सलत होती. या अपमानाचा बदला घ्यायचा असे जणू तेव्हाच त्यांनी ठरवले होते.

मिळालेल्या अपयशाने खचून न जाता, रतन टाटा यांनी आपला प्रवासी कारचा व्यवसाय सुरूच ठेवला.

टाटा मोटर्सने त्या पुढील काळामध्ये खूप प्रगती केली. २००८ साली उलट परिस्थिती होती. टाटा मोटर्स यशाच्या शिखरावर पोचली होती, तर दुसरीकडे फोर्ड कंपनी खूप तोट्यामध्ये होती.

 

फोर्डवर बँकेचे खूप कर्ज झाले होते. याच क्षणाचा फायदा घेऊन रतन टाटांनी झालेल्या अपमानाची परतफेड करण्याचे ठरवले आणि टाटा मोटर्सने फोर्डचा लक्झरी ब्रँड जग्वार-लँड रोवर विकत घेण्याबद्दल प्रस्ताव दिला.

बिल फोर्डने लगेचच हा प्रस्ताव स्वीकारला आणि ते डील करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसमवेत “बॉम्बे हाउस” येथे  पोहचले. “बॉम्बे हाउस” हे टाटाचे मुख्यालय आहे.

 

 

२.३ बिलियन अमेरिकेन डॉलर म्हणजेच त्यावेळचे ९३०० कोटी रुपयांना हा करार झाला. या बैठकी दरम्यान, बिल फोर्ड रतन टाटांना म्हणाला की,तुम्ही जग्वार – लँड रोवर विकत घेऊन माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत.

 

ही तोच व्यक्ती होती जिने रतन टाटांचा अपमान करताना म्हटले होते की, टाटा मोटर्स खरेदी करून मी तुमच्यावर उपकार करत आहे.

रतन टाटांनी अगदी जशास तसे उत्तर देत बिल फोर्डची चांगलीच जिरवली.

जग्वार – लँड रोवर ही आता टाटा समूहाच्या मालकीची आहे आणि सध्या हा ब्रँड खूप नफ्यामध्ये आहे.

 

 

ही घटना सर्वप्रथम प्रवीण काडले यांनी जगासमोर आणली.

प्रवीण काडले हे टाटा कॅपिटलचे प्रमुख आहेत आणि ते फोर्डच्या मुख्यालयाला भेट देणाऱ्या रतन टाटा यांच्याबरोबर गेलेल्या टीममध्ये देखील होते.

 

 

१५ मार्च २०१५ मध्ये जेव्हा रतन टाटा यांना वाय. बी. चव्हाण हा पुरस्कार मिळाला, त्यावेळी त्यांच्यावतीने प्रवीण काडले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वीकारतेवळी त्यांनी वरील घटनेचा खुलासा केला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version