Site icon InMarathi

नेहमीच कुतूहल जागवणाऱ्या दक्षिण कोरिया देशाशी निगडीत रंजक गोष्टी!

south-korea-marathipizza00

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्हाला हे माहीतच आहे की, कोरिया देशाचे दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया अश्या दोन भागांमध्ये विभाजन झालेले आहे. एकीकडे उत्तर कोरिया आपल्या कठोर शासनासाठी ओळखला जातो, तर दुसरीकडे दक्षिण कोरिया काही मजेशीर बाबींसाठी ओळखला जातो. आज आपण याच मजेशीर गोष्टींबद्दल म्हणजे दक्षिण कोरिया बद्दल जाणून घेऊया!

 

१. ४ या अंकाला घाबरतात लोक

pa1.narvii.com

दक्षिण कोरिया मध्ये जेव्हाही ४ या अंकाचा उल्लेख केला जातो तेव्हा त्याचा अर्थ मृत्यूशी जोडला जातो. म्हणून येथील लोक ४  हा अंक अपशकुनी मानतात. दक्षिण कोरियन नागरिक सहसा ४ या अंकाचा वापर कोठेही करत नाहीत.

 

२.जन्म घेतल्यानंतर लगेच १ वर्षाचा होतो मनुष्य


दक्षिण कोरियामधील हा खूप मजेशीर कायदा आहे. दक्षिण कोरियामध्ये जन्म घेताच बाळाचे वय १ वर्ष मानले जाते, म्हणून या देशातील सर्व लोक आपल्या खऱ्या वयापेक्षा १ वर्षांनी मोठे आहेत.

 

३. लोक लाल शाईचा वापर करण्यास घाबरतात

savethesemicolon.com

दक्षिण कोरियातील लोक लाल शाईचा वापर करण्यास सुद्धा घाबरतात. या देशातील लोकांच्या म्हणण्यानुसार, लाल रंग हा मृत्यूचे प्रतीक आहे. त्यामुळे ते याचा वापर करत नाहीत.

 

४. कुठेही पिऊ शकता दारू

aljazeera.com

दक्षिण कोरियामध्ये दारू कुठेही पिण्यास परवानगी आहे. बार, दुकान अगदी रेल्वेमध्ये सुद्धा दारू पिण्याची परवानगी आहे. येथे मशीनने सुद्धा दारू विकली जाते. त्यामुळे या देशात हलणारे-डुलणारे लोक रस्त्यावर मिळणे सामान्य गोष्ट आहे.

 

५. प्रत्येक महिन्यातील १४ वा दिवस रोमँटिक दिवस म्हणून ओळखला जातो.

photos.sacurrent.com

दक्षिण कोरियातील लोक महिन्यातील १४ दिवस हा रोमँटिक दिवस म्हणून साजरा करतात. या देशात १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हेलेंटाईन डेच्या दिवशी मुली मुलांना आणि बायको नवऱ्याला गिफ्ट देते आणि १४ मार्चला या दिलेल्या गिफ्टच्या तीनपट जास्तचे गिफ्ट किंवा पैसे मुले मुलीवर किंवा नवरा बायकोवर खर्च करतो.

 

६.रक्त गटाने होते ओळख

2.bp.blogspot.com

दक्षिण कोरियामध्ये रक्त गट मौल्यवान मानला जातो. रक्त गटाने माणूस कसा आहे ते ओळखले जाते. कोण चांगला आहे, कोण वाईट आहे, कोण फसवणूक करणारा आहे याचा निर्णय रक्त गटाने केला जातो.

 

७. प्लास्टिक सर्जरी करणाऱ्याची प्रशंसा केली जाते.

i.dailymail.co.uk

दक्षिण कोरियामध्ये प्लास्टिक सर्जरी करणे खूप सामान्य गोष्ट आहे. प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या लोकांची खूप प्रशंसा केली जाते. या देशातील लोक मोठे डोळे, मोठे नाक आणि चांगल्या हनुवटीसाठी प्लास्टिक सर्जरी करतात. या देशामध्ये या प्रकारची सर्जरी स्वस्तात केली जाते.

 

८. पुरुष करतात हजारोंचा मेकअप

schemamag.ca

दक्षिण कोरियामधील पुरुष मेकअपवर हजारो रुपये खर्च करतात. बीबी क्रीम फाउंडेशन त्यांचा आवडता ब्युटी ब्रँड आहे. येथील कित्येक टीव्ही चॅनेल शो केवळ पुरुषांच्या ब्युटी टिप्सवर फोकस करतात.

९. एकच आडनाव असणारे लग्न करू शकत नाहीत.

www.lolwot.com

दक्षिण कोरियामध्ये एकच आडनाव असणारे तरुण-तरुणी एकमेकांशी लग्न करू शकत नाहीत. या देशात ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरु आहे. या मागे असा समज आहे की, एकसारखे आडनाव असलेल्या व्यक्तींनी एकमेकांशी लग्न केल्यास रक्त अशुद्ध होते.

 

१०. देवाची पूजा ,मोठ्या प्रमाणावर केली जाते

economist.com

दक्षिण कोरियातील लोक खूप पूजा पाठ करतात, खासकरून रात्रीच्या वेळी चर्च, बुद्ध मंदिरांमध्ये लोक देवाची आराधन करता दिसून येतील.

 

११. इंटरनेटचा वेग सर्वात जास्त 

i.ytimg.com

इंटरनेटच्या वेगामध्ये दक्षिण कोरियाचा जगामध्ये पहिला क्रमांक लागतो. दक्षिण कोरियाची ९३ टक्के लोकसंख्या इंटरनेटचा वापर करतात

 

११. आत्महत्या करण्यामध्ये आहे दुसरा क्रमांक

i.dailymail.co.uk

दक्षिण कोरियाचा आत्महत्या करण्यामध्ये जगात दुसरा क्रमांक लागतो. येथील जीवनशैली या गोष्टीला कारणीभूत असल्याचे म्हटले जाते

 

१३. लोक  भयंकर अंधश्रद्धाळू आहेत

imgur.com

दक्षिण कोरियातील लोक मानतात की, जर इलेक्ट्रिक पंखा रात्रभर चालू ठेवल्यास त्याच्या जवळ झोपणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

 

१४. १५ ऑगस्टला झाला होता स्वतंत्र

korcan50years.files.wordpress.com

भारताचा स्वतंत्रता दिवस आणि दक्षिण कोरियाचा मुक्ती दिवस योगायोगाने एकच आहे. हे दोन्ही देश १५ ऑगस्ट रोजीच स्वतंत्रता दिवस साजरा करतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version