Site icon InMarathi

पंजाब खरंच ड्रग्ज मुळे हवेत उडतोय – पंजाबचं भयावह वास्तव

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

शाहीद-करीना-आलिया आणि नवोदित दिलजित ह्या चौकडीचा “उडता पंजाब” वादाच्या भोवऱ्यात अडकला असताना, पंजाबमधील अंमली पदार्थांची समस्या चर्चेत आली आहे.

 

स्त्रोत

ही समस्या “मोठी” आहे हे आपल्याला ठाऊक आहेच. पण ह्या समस्येचं स्वरूप नेमकं किती मोठं आहे, हे अजूनही नीट माहित नाहीये.

पुढे आहेत पंजाबमधील ड्रग्जच्या विळख्याची माहिती देणारे काही भयावह आकडे. वाचून दंग व्हाल.

 

१ – २०१३ च्या रिपोर्टनुसार, पंजाबमधे तब्बल ५१.६% तरुण ड्रग्ज घेतात. हा आकडा भारताच्या राष्ट्रीय आकड्याच्या – २.८% – चक्क १८ पट आहे.

 

 

२ – पंजाबमधे दरवर्षी ७५०० कोटी रुपयांचे ड्रग्ज विकत घेतल्या जातात, ज्यातील ६५०० कोटी हेरोईनवर खर्च होतात. हे सर्व ड्रग्ज पाकिस्तानहून अवैध मार्गाने भारतात येतात.

 

३ – ड्रग्ज घेणाऱ्यांपैकी ७६% तरुण १८ ते ३५ वयोगटातील असतात ! 🙁

 

 

४ – इंजेक्शनद्वारे ड्रग्ज घेणाऱ्या २१.१० % तरुणांना AIDS ची लागण झाली आहे !

 

५ – ८.६ लाख लोकांना अफिमचं व्यसन लागलंय आणि सुमारे सव्वा लाख हेरोईनच्या आधीन झालेत.

 

 

६ – पंजाब मधील प्रत्येक ३ विद्यार्थ्यांपैकी एकाने आणि १० विद्यार्थिनींपैकी एकीने ड्रग्ज घेतलेलेच असतात. १० कॉलेजपैकी ७ कॉलेजमधील विद्यार्थी ड्रग्ज घेतात.

 

हे सर्व वाचून पंजाबमधील तरुणांची काळजी वाटल्याशिवाय रहात नाही.

 

आपण आता चित्रपटावरील चर्चा कमी करून “ह्या” समस्येकडे लक्ष वळवू या का? 🙁

इमेज सोर्स: बझफीड

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Exit mobile version