Site icon InMarathi

पिझ्झाच्या मध्यभागी असणारं ‘हे’ प्लास्टिक टेबल असतं अत्यंत उपयोगी, पण नेमकं कसं?

pizza im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पिझ्झा हा तुमच्यापैकी बहुतेकांचा आवडता पदार्थ असेल. झटपट तयार होणारा आणि खाल्ल्यावर पोटाला शांती देणाऱ्या अश्या या पिझ्झाबद्द्दल एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का?

आपण जेव्हा एखाद्या रेस्टॉरंटमधून पिझ्झा मागवतो, त्यावेळी त्याच्या मध्यभागी एक छोटेसे प्लास्टिक टेबल असते. तुम्हाला माहित आहे का ते तेथे का ठेवलेले असते? काय आहे त्यामागचे लॉजिक!

thesun.co.uk

बऱ्याच जणांना वाटत असेल की, पिझ्झाचे तुकडे एकमेकांशी जोडून ठेवण्यासाठी किंवा पिझ्झाच्या सजावटीसाठी किंवा पिझ्झा आकर्षक दिसावा म्हणून ते टेबल तेथे ठेवलेले असते, पण मंडळी हा तर्क चुकीचा आहे, कारण या टेबलमागचं कारण काहीतरी वेगळंच आहे, चला तर जाणून घेऊया या मागचा खरा अर्थ!

या प्लास्टिक टेबल्सना ‘पिझ्झा सेव्हर’ असे म्हटले जाते. हे टेबल प्लास्टिक गोलाकार वा त्रिकोणी असते. याचे खरे काम तुमचा पिझ्झा वाचवणे हे असते.

myplasticfreelife.com

जेव्हापासून कार्डबोर्ड बॉक्समध्ये पिझ्झाची डिलेव्हरी करण्याची कल्पना अस्तित्वात आली, तेव्हापासून हे टेबल पिझ्झाच्या वरचा भाग आणि त्यामधील मौल्यवान टॉपिंग्स पडू नयेत, म्हणून ठेवलेले असते.

पिझ्झा सेव्हर व्यतिरिक्त पॅकेज सेव्हर, बॉक्स टेंट, पिझ्झा स्टॅक, पिझ्झा टेबल आणि पिझ्झा निप्पल  आणि अश्या अनेक नावांनी हे प्लास्टिक टेबल ओळखले जाते. ज्या माणसांना पिझ्झा आणि त्यावरील टॉपिंग्स भयंकर आवडतात, अश्या लोकांसाठी हे टेबल एखाद्या देवदूतापेक्षा कमी नाही.या पिझ्झा सेव्हरमुळेच पिझ्झा प्रेमींना नेहमीच त्यांच्या आवडत्या टॉपिंग्सचा आस्वाद घेता येतो.

पिझ्झा सेव्हरचा शोध १९८३ साली न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या कार्मेला विटाले या स्त्रीने लावला होता. विटाले यांनी १९८५ साली या शोधाचे पेटंट रजिस्टर केले होते.

huffingtonpost.com

बॉक्समधील पिझ्झा गरम असल्याने त्यामुळे तो बॉक्सच्या वरच्या भागाला लागण्याची भीती असते. परंतु मध्यभागी पिझ्झा सेव्हर ठेवल्यामुळे टोपिंग्स बॉक्सला चिकटत नाहीत. त्यामुळे अखंड पिझ्झा सुरक्षितपणे ग्राहकापर्यंत पोचवला जातो.

तर मंडळी या पुढे जेव्हा कधी ऑर्डर केलेला पिझ्झा तुमच्या हातात पडेल तेव्हा पिझ्झाचा बॉक्स उघडा आणि त्यावरील पिझ्झा सेव्हर पाहून त्याचा शोध लावणाऱ्या कार्मेला यांना धन्यवाद द्यायला विसरू नका, कारण पिझ्झा सेव्हर मुळेच तर टॉपिंग्ससह पिझ्झाची पूर्ण मज्जा तुम्हाला घेता येतेय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version