‘फेरारी’ कंपनीने कर्मचाऱ्यांवर घातलेलं ‘विचित्र’ बंधन तुम्हाला बुचकळ्यात पाडणारं आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लहान असो का मोठा, प्रत्येक व्यक्तीला कार म्हणजेच चार चाकी मोटर कारचे कौतुक असतेच असते! प्रत्येकाला आपल्याकडे कार असावी असं वाटतच!
खूप आधी कार, फ्रीज, टेलिव्हिजन, फोन या सगळ्या चैनीच्या गोष्टींमध्ये मोडल्या जायच्या, पण आता लोकं सर्रास कपडे बदलावे तशा त्यांच्या गाड्या मोबाइल बदलत असतात!

माणसांच राहणीमान सुधारलं आणि त्यातूनच या सगळ्या गोष्टींचा उगम झाला!
लोकांना कारच फारच कौतुक असतं, आणि सध्या तर जुन्या म्हणजेच विंटेज कार मॉडेल्सना तर काहीच्या काही भाव आला आहे, त्यातून कारचं मॉडेल जितकं जुनं, इंजिन जितकं चांगला तितकी किंमत आणखीन वाढते!
जुनी फियाट, प्रीमियर पद्मिनी, अगदी मारुती ८०० या गाड्या तर सध्या फार क्वचित बघायला मिळतात!

सध्या चलती आहे ती म्हणजे ऑटो गाड्यांची आणि त्यातूनही होंडा, निसान, बीएमडब्लू, ऑडी अशा चकाचक गाड्यांची सध्या रेलचेल आहे! त्यांच्या किंमती पण अर्थात तोंडाला फेस आणणाऱ्या आहेत!
पण हौसेला मोल नसतं तसंच सध्या माणसांच झालेलं आहे!
पण एका कंपनीची गाडी आहे जी फार म्हणजे फार क्वचित बघायला मिळते, अगदी भारतात सुद्धा हातावर मोजता येतील इतक्या लोकांकडेच ती गाडी आहे!
तिचं नाव म्हणजे फेरारी!
आपल्या क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याच्याकडे सुद्धा फेरारी ही गाडी होती पण नंतर त्यानं ती विकली!

करोडपती बिझनेसमन मुकेश अंबानी यांच्याकडे सुद्धा फेरारी चं मॉडेल आहे असं म्हंटल जातं!
फेरारी हा ब्रॅंड हा सामान्य लोकांसाठी नसून, त्याचा क्लास वेगळा आहे!
आणि या ब्रॅंडच्या गाड्यांची जाहिरात सुद्धा होत नाही कारण ज्यांची ही गाडी विकत घ्यायची कुवत आहे ती लोक टिव्हिसामोर बसून ही जाहिरात बघत नाही, असं सुद्धा मध्ये कित्येक जोक्स मधून समोर आलं आहे!

१९३९ मध्ये स्थापन झालेल्या ‘फेरारी’ कंपनीला कधीही वाटले नव्हते की भविष्यात जगातील सर्वात मोठा कार ब्रँड म्हणून ते ओळखले जातील.
आज जगातील अतिशय महागड्या गाड्यांमध्ये फेरारीचा समावेश होतो. सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची फेरारी कार, गर्भश्रीमंताला मात्र त्याने भरलेल्या प्रत्येक पैश्याची किंमत वसूल करून देते.
त्याचमुळे आजही फेरारी हा ब्रँड टिकून आहे आणि श्रीमंतांकडून त्याला मागणी आहे.

२०१३ च्या मे महिन्यात Ferrari 250 GTO या मॉडेलची फेरारी कार विकली गेली आणि इतिहास घडला. आजवरची आगत सर्वात महागडी खरेदी केलेली कार म्हणून या फेरारीचे नाव नोंदवले गेले.
अमेरिकेच्या क्रेग मॅकेव या व्यावसायिकाने तब्बल ३५ मिलियन यु.एस. डॉलर ओतून ही कार आपल्या नावावर करून घेतली आजही खास ही कार पाहण्यासाठी लोक त्याच्या घराला भेट देतात असे ऐकिवात आहे.
अश्या या करोडोंच्या कार्स विकणाऱ्या फेरारी कंपनीबद्दल तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का? अहो फेरारी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कोणीही कर्मचारी स्वत: फेरारी कार खरेदी करू शकत नाही.
विचित्र वाटतं ना? पण खरंय.

चला जाणून घेऊया काय आहे या मागचं कारण.
ज्या प्रमाणे इतर कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना स्पेशल ट्रिटमेंट देतात, त्या प्रमाणे फेरारी मात्र आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष असं काही करत नाही.
आपल्याच कर्मचाऱ्यांना कार न विकण्यामागचं कारण सांगताना फेरारीचे चीफ मार्केटिंग आणि कमर्शियल ऑफिसर इन्रीको गॅलेरिया म्हणतात की,
आमच्या कंपनीचं कार्स प्रोडक्शन हे मर्यादित आहे आणि क्लायंट्सना त्यांची कार मिळेपर्यंत खूप काळ वाट पहावी लागते.
अश्या वेळेस आमच्याच कंपनीमधील कर्मचाऱ्याला मग तो कोणीही का असेना त्याला कार उपलब्ध करून देणे हे आमच्या कंपनीच्या इमेज साठी योग्य नाही!
यामुळे क्लायंट्सला त्याची फसवणूक केली जात आहे असं वाटू शकतं.
सध्या कंपनीशी संबंधित केवळ दोनच कर्मचाऱ्यांना फेरारी कार्स उपलब्ध करून देण्यात येतात आणि त्या दोन व्यक्ती आहेत फेरारीचे फॉर्म्युला वन ड्रायव्हर्स – सेबेस्टियन व्हेटेल आणि किमी रेक्कोनेन.
पण तरीही ह्या दोघांसाठी काही विशेष सूट दिली जात नाही.

तुम्हाला हे ऐकून देखील आश्चर्य वाटेल की, फेरारी कंपनी असंच कोणालाही आपली कार विकत नाही.
ज्या व्यक्तीने कारची मागणी केली आहे, तिची संपूर्ण पार्श्वभूमी तपासली जाते आणि त्यानंतरच त्या व्यक्तीला कार द्यायची की नाही त्याचा निर्णय घेतला जातो.
फेरारी कंपनी वर्षाला केवळ ८००० कार्स तयार करते. त्यापैकी काही नवीनतम सर्वोत्तम कार्स या त्याच व्यक्तींना दिल्या जातात, ज्यांना फेरारी कंपनी स्वत: खरेदीचे आमंत्रण पाठवते.

मध्यंतरी LaFerrari Aperta हि लेटेस्ट फेरारी कार कंपनीने सादर केली आणि ती कार खरेदी करू शकणाऱ्या जगभरातील २०० श्रीमंतांची यादी तयार केली, ज्यापैकी सर्वानीच ती कार खरेदी करण्यात रस दाखवला.
तुम्हाला माहित आहे का त्या कारची किंमत काय होती?- तब्बल ९ करोड रुपये!
हे सर्व पाहून तुमच्याही मनात आलेच असेल की – सगळा पैश्याचा खेळ आहे बाबा….पैश्याचा!!!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.