' आमीरने सुपरहिट केलेल्या फुंगसुक वांगडुचा खराखुरा जीवनपट पाहून अधिकच भारावून जाल – InMarathi

आमीरने सुपरहिट केलेल्या फुंगसुक वांगडुचा खराखुरा जीवनपट पाहून अधिकच भारावून जाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – केदार गोगरकर 

बॉलीवुडने बनविलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘थ्री इडियट’. ह्यातील आधीचा रँचो व नंतर शांततेत कश्मीरमधील विद्यार्थी मित्रांसाठी,अत्याधुनिक प्रयोगशाळेपेक्षा जराही कमी नसलेली शाळा चालवणाऱ्या फुंगसुक वांगडुची सारी दुनीया फॅन झाली.

सर्वांनाच प्रश्न पड़त होता की असे अजब व्यक्तिमत्व खरच असेल का? की ते कल्पनेचा एक उत्कृष्ट नमुना असेल? चला तर ओळख करून घेऊयात real life फुंगसुक वांगडु अर्थात सोनम वांगचुक ह्यांची.

 

sonam-wangchuk-and-aamir-khan-marathipizza
india.com

लेह जिल्ह्यात जन्मलेल्या वांगचुक यांना वयाच्या 9 व्या वर्षापर्यंत शाळेची सोय नसल्याने शिक्षण घेता आले नव्हते. पुढे रिजनल कॉलेज, श्रीनगरमधुन मॅकेनिकल इंजिनीरिंग पदवी घेतली व शिक्षणाची अवस्था व दर्जा बघुन शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी स्थानीक मुलांना शिकवणे सुरु केले.

Student’s Educational and Cultural Movement of Ladakh (SECMOL)ही परकिय शिक्षणपद्धतीच्या आक्रमणाचे बळी ठरलेल्या त्यांच्या मित्रांनी व त्यांनी मिळून एक संघटना काढली.

शिक्षणक्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याकरीता लेहपासून 13 km वर फेय ला मुलांसाठी शाळा सुरु केली. आज येथे बोर्ड परीक्षा नापास झालेल्या 60-100 मुलांना शिकवले जाते.

 

sonam-wangchuk-InMarathi

ह्या शाळेत स्वत:चे डोके चालवा आणि शक्य तेवढे नवीन शोध लावा ह्या मानसिकतेसह इथे मार्गदर्शन केले जाते. ही शाळा पूर्णपणे सौर उर्जेवर चालत असून स्वयंपाक, विद्युत इत्यादी कोणत्याही कार्यासाठी जीवाश्म इंधनाचा वापर केला जात नाही.

उणे 30 डिग्री तापमानातही ही वास्तु सौर उर्जेवर गरम राहते. मुलांना अभ्यासासोबत पशुपालन, शेती, अन्न पदार्थ बनवणे तसेच अतीतीव्र वातावरणात जगण्याचे धड़े दिले जातात.

 

Sonam-Wangchuk-school-marathipizza
indiapages.in

शिक्षण क्षेत्रात सुधारणा करत असतानाच पाण्याच्या समस्येकडे ह्या वैज्ञानिकाचे वेधले गेले. उन्हाळ्यात वितळलेले सरोवरातील पाणी हे हिवाळ्यात कालवे, नदी, ओढ़े यांमधुन वाहत राहते.

जमिनही गोठुन टणक होते व तापमानही जास्त नसल्याने शेती होऊ शकत नाही. ग्रीष्म लागल्यावर मात्र लगेच पाण्याचा वापर वाढुन टंचाई जाणवायला लागते; ह्या दोहोंतच ग्रामीण लोक त्रस्त आणि व्यस्त झालेले असतात.

ह्या समस्येवर त्यांनी शोधलेला उपाय म्हणजे कोनच्या आकारात पाणी गोठवुन ठेवणे, ज्यामुळे कोेनच्या वरच्या भागातच फक्त थेट सुर्यकिरणे पडतील व बर्फ पायथ्याला गोठत राहील.

 

sonam-wangchuk-1 InMarathi

 

2013 मध्ये सोनम आणि विद्यार्थी ह्यांनी कुठलीही मशीन किंवा इलेक्ट्रिसिटी न वापरता जवळपास 3 किमी पाणी फक्त गुरुत्वाकर्षण सिद्धांत वापरून वाहून आणले, ज्यातुन 6 फूट उंचीच्या कोनमधून दिड लाख लीटर पाणी जमा झाले.

पूर्ण सूर्यप्रकाश पडत असतांनाही पाणी वाहुन जात नव्हते तर कोन आता वितळणाऱ्या मेणबत्तिसारखा दिसत होता. ह्या यशस्वी प्रयोगाने ख़ुश होउन वांगचुक ह्यांनी 75 लाख रुपयांची वर्गणी गोळा केली, ज्यातुन 20 लाख लीटर पाणी 2014 च्या जून मध्ये लोकांना मिळाले.

 

Sonam-Wangchuk-marathipizza01
hindustantimes.com

सर्वाधिक खर्च पाणी वाहुन आणणाऱ्या पाईप्सचा होता. तरीही 1 लीटर पाणी मिलवण्याचा खर्च केवळ 0.025 रु. झाला होता. ह्या कोनाचा आकार बौद्धस्तूपा प्रमाणे असल्याने नाव ice stoop देण्यात आले.

30 मीटर उंचीचा हिमस्तुप हा दिड करोड़ लीटर पाणी देऊ शकतो ज्यातुन 50 हेक्टर जमिनीवर सिंचनाची सोय केली जाउ शकते. जागोजागी असे मोठाले स्तुप तयार करण्याचे काम लेहमध्ये सुरु झाले आहे.

उंचीवरून वाहुन आणलेले पाणी पाइप मध्ये दबाव तयार करते जे आणखी उंच जाऊंन फवाऱ्या सारखे उड़ते व वजा 20 डिग्री तापमानामुळे गोठले जाते.

 

sonam-wangchuk-2 InMarathi

स्तूपचा आतील भाग हा इग्लूप्रमाणे दिसतो ज्यात आतुन प्लास्टिक कोटिंग असते. हा भाग म्हणजे नियंत्रण कक्ष असतो जिथुन पाण्याचा प्रवाह व पाईपची ऊंची ठरवता येते.

एकदा कोन तयार झाला की हे स्तुप पर्यटकांना भाड्यानेही दिले जातात ज्याने आर्थिक पाठबळ स्थानिकांना मिळते. अनेक पुरस्कार, सत्कार, बक्षिसे मिळूनही त्यांची प्रसिद्धिपासुन दूर असणाऱ्या डोंगराळ भागात काम करण्याची इच्छा जराही घटली नाही किंबहुना ती नवीन योजना अंमलात आणुन आणखी वाढतच आहे.

 

Sonam-Wangchuk-marathipizza02
intoday.in

Himalayin institute of alternatives(HIAL) विद्यापीठ जे वांगचुक तयार करीत आहेत, त्यांच्या सर्वेक्षणानुसार 1996 ला 10 वीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 95% होती जी दोन दशकानंतर 25% पर्यंत खाली आणली आहे.

त्यांची योजना एक असे विद्यापीठ तयार करण्याची आहे जे बर्फाळ- पहाड़ी भागासाठी ‘ice स्तूप’ सारखे पर्याय शोधून कृषी, पर्यटन, शिक्षण व व्यापार ह्यांना मिळेल. भारतातच नव्हे तर परदेशातील अनेक समाजसेवक, वैज्ञानिक व शिक्षण क्षेत्रातील गणमान्य व्यक्तिंकरीता सोनम हे आदर्श बनले आहेत.

शिक्षण,संशोधन व समाजकार्य ह्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या ह्या अवलियाला थ्री इडियट मधील वाक्य तंतोतंत लागू पड़ते.

Success के नही, excellence के पीछे भागो; कामीयाबी खुद तुम्हारे पीछे आयेगी

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?