या पदार्थाचे आरोग्यदायी लाभ एवढे आहेत की कर्ज काढून खायला हवा हा पदार्थ!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखिका – डॉ. प्राजक्ता कुलकर्णी
===
खाईन तर तुपाशी… नाही तर ऊपाशी
अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे.
भारतीय आहारात तुपाला किती महत्व आहे ना?? आज आपण तुपाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
तूप कसे बनवावे???
तूप हा भारतात बनवला जाणारा दुगधजन्य पदार्थ असून तो पाश्चिमात्य खाद्य संस्कृतितील Clarified butter या संज्ञेशी बराच मिळता जुळता आहे.
आपण घरातील रोजच्या वापरासाठी जे दूध घेतो ते प्रथम जाड बुडाच्या स्वच्छ भांङ्यामधे तापवावे. नंतर मंद गॅसवर किंवा खाली जाळी ठेवून पाच मिनिट उकळावे व नंतर थंड होऊ द्यावे.
नंतर थंड दूधावरची साय चमच्याने कडेने खरडून, खालच्या थोड्या दूधासोबत (साका) एका वेगळ्या भांड्यात काढून फ्रिजमधे ठेवावी. अशी सलग ३-४ दिवसाची साय साठली की, भांडे फ्रिजमधून काढून साय कोमट करावी व विरजण म्हणजे लहान चमचाभर दही घालून विरजावी.
म्हणजे विरजण संस्कार झाला.
दुसऱ्या दिवशी या विरजलेल्या सायीच्या दह्याला रवीने अथवा मिक्सरमधे घुसळावे व लोणी काढावे. खालचे ताक जेवणात पिणयासाठी वापरावे. (रवीने घुसळलेले असेल तर ताकही जास्त चवदार लागते) ही झाली मंथन प्रक्रिया!
शेवटी मंथन करून काढलेले लोणी १०-१५ वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व जाड बुडाच्या भांड्यात कढायला तापत ठेवावे. सुरवातीला ते दूधासारखे वर येते तेव्हा गॅस बारीक ठेवावा व चमच्याने ढवळत रहावे.
नंतर काही वेळाने ढवळायची गरज रहात नाही. तूप उकळत रहाते. फक्त लक्ष ठेवायचे. कडेने तांबूस दिसायला लागले व उकळताना येणारा कडकड असा आवाज थांबला, उकळी कमी झाली की तुप कढले, तयार झाले समजावे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
—
गॅस बंद करावा व त्यामधे विड्याचे पान हाताने चुरगळून टाकावे व तूप थंड होऊ द्यावे.
आता असे थंड झालेले खमंग वासाचे “घरगुती साजुक तूप” गाळून स्वच्छ काचेच्या बाटलीमधे भरून ठेवावे व दररोजच्या जेवणात थोडे -थोडे खावे.
सर्वप्रथम आपण आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने तुपाचा विचार करू.
तुपाचे पोषकांश
• Energy – 112kcal
• स्निग्धांश(fats) – 12.7gm
• monosaturated fat – 3.6gm
• Poly saturated fat – 0.4739gm
• प्रथिने – 0.4gm
• Vit E – 15.7 mg
• Vit A -0.4gm
• Cholesterol – 256mg
आता आपण ऐकेक घटकाची ऊपयुक्तता पाहू.
तुपातील monosaturated fat हे poysaturated fat पेक्षा अधिक असते. जे ldl ची(badcholesterol) निर्मीती कमी करून हृदय व धमन्या संबंधित व्याधींची शक्यता कमी करते.
Vit. E चे प्रमाण अधिक असून ते anti aging आहे. तसेच कर्करोग, स्मृतीभ्रंश, हृदयरोग या व्याधीपासून बचाव करते. Vit. A हे सर्व नेत्र रोगांवर हितकर असून रोगप्रतिकार क्षमता वाढवते.
तुपामधील cholesterol हे बहुतांशी HDL (Good cholesterol) असते. जे LDL व ईतर स्निग्धांशाचे यकृतातील पचन सुखकर करते. तुपामध्ये Vit. K आढळते, जे हाडांना मजबुत करते व रक्त साकाळण्याच्या प्रक्रियेत मदत करते.
तुपाचा smoke point (जेथे अणुंचे विघटन होण्यास सुरूवात होते) हा सर्वात अधिक आहे (250celcius) त्यामुळे इतर सर्व तेलांपेक्षा (coconut oil सोडून) ते आरोग्यदायक आहे.
तूप हा एकमेव दुग्धजन्य पदार्थ आहे ज्यात lactose व caesine हे allergy करणारे दोन्ही घटक नसतात. तुपामध्ये buteric acid हा अत्यंत महत्वाचा घटक आढळतो. हे एक Short chain fatty acid आहे.
आपण जेव्हा fiber खातो तेव्हा पचन होऊन शरीरात buteric acid ची निर्मिती होते. ते आतड्याची पुर्ण शुद्धी करून मल बाहेर टाकण्यास मदत करते.
तसेच शरीरातील चरबी जाळण्याचे ही कार्य Buteric acid करते. असा शरीराद्वारे निर्माण होणारा उपयुक्त घटक तुपामुळे आयताच मिळतो.
तुपातील दुसरा महत्वाचा घटक म्हणजे – Conjugated linolic acid! हे शरीराचे lean body mass वाढवून fitness वाढवते. तसेच स्तना संबंधित कर्करोगांची शक्यता कमी करते.
आता आयुर्वेदाचे मत बघुया.
आयुर्वदकालीन, चार्वाकांचा सिद्धांत फार प्रसिद्ध आहे.
ऋणंकृत्वाघृतंपिबेत। – (शब्दशः अर्थ – कर्ज काढावे पण तुप प्यावे)
अर्थातच त्याचा संबंधित अर्थ वेगळा आहे. मात्र तुपाचे आहारातील अनन्यसाधारण स्थान इथे समजते.
आयुर्वेदानुसार, तूप हे सत्वगुण प्रधान असुन ते 8 प्रकारचे असते. मात्र गोघृतवस्तन दुग्धघृत सर्वात औषधी सांगितले आहे.
• तुप हे 4 महा स्नेहांपैकी एकअसुन स्नेहन (internal cleansing) हे त्याचे महत्वाचे कार्य सांगितले आहे.
• रसायन चिकित्सेतही (Anti aging) तूप उपयुक्त आहे.
• तुप बुद्धीवर्धक सांगितले आहे.
• पचनसंस्थेचे विकार, बद्धकोष्ठता, आंत्रविद्रधी (deodinal ulcer) यामध्ये तूप उपयुक्त ठरते.
• नेत्ररोगांमध्येही तूप उत्तम सांगितले आहे.
• तसेच अस्थी संधी रोगांमध्येही वापरण्यास सांगितले आहे.
• स्मृती, अग्नी (जाठराग्नी), शुक्र (वीर्य), ओजयांचे वर्धन करणारे आहे.
• तसेच पित्त व वातविकारांचे शमन करून कफाचे वर्धन करणारे सांगितले आहे.
• मद, अपस्मार, उन्मादया मानसिक व्याधींमध्ये तूप उपयुक्त ठरते.
• योनी (female genital tract), शीर(डोके), कान यातील वेदना जुने तूप वापरल्यास थांबतात.
• एकशे अकरा वर्ष जुने तूप असल्यास त्याला “कुंभसर्पी” म्हणतात. हे तूप आंधळेपणा, योनी शुल यासाठी उपयुक्त आहे.
• एकशे अकरा वर्षापुर्वीचे तूप हे “महाघृत” म्हणुन ओळखले जाते. वात विकारांमध्ये हे उपयुक्त ठरते. ते तिमीर (काचबिंदू) या व्याधीत ऊपयुक्त ठरते.
दोन्ही शास्त्रांचा विचार करता शुद्ध देशी तुप हे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. तेव्हाआहारात तुप अवश्य समाविष्ट करावे.
—
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.