Site icon InMarathi

होमिओपॅथीच्या गोड गोळ्यांनी माणूस बरा होतो का? वाचा या दुर्लक्षित उपचार पद्धतीबद्दल!

homeopathy-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – सुनील सिंग राजपूत

===

होमिओपॅथी ही जगातील सुरक्षित व स्वस्त एक उपचार पद्धती आहे. होमिओपॅथीचा शोध जर्मनी देशात लागला. डॉ. सॅम्यूअल हॅनामॅन यांना कुलेनस मटेरिआ मेडिका या पुस्तकाचा अनुवाद करताना सींकोना या झाडाच्या फांदी पासून मलेरियासाठी औषध बनते हे वाचनात आले.

मग त्यांनी त्या संदर्भात प्रयोग करावयाचे ठरवले. प्रयोगादरम्यान फांदीचा अर्क दिल्यानंतर अगदी मलेरिया सारखीच थंडी, ताप व सांधेदुखी चालू झाली.

 

awaken.com

 

त्यांच्या लक्षात आले की निरोगी मनूष्याला जर असा अर्क दिला तर तो आजारी पडतो पण तेच आजारी माणसाला दिले तर आजार दूर होतो. म्हणजेच सिमिलिया सिमिलिबस क्यूर्युनट्युर या सुत्राचा वापर होतो.

त्यांनी होमिओपॅथी साठी काही मुलभूत नियम बनवले-

– औषधी व रोग समानता असावी.

– कितीही प्रकारचे आजर असले तरी एकच औषध द्यावे.

– कमीत कमी औषध मात्रा वापरावी.

– व्यक्तिपरत्वे मानसिक व शारिरीक अभ्यास करुन, औषध निवडणे.

– वाइटल फोर्स म्हणजे जीवन शक्ती

– रोग बीज म्हणजे रोगाचे कारण

 

slideplayer.com

 

या सर्व बाबींचा अभ्यास करुन औषध देणे बंधनकारक आहे. त्या काळी औषधोपचार खुप त्रासदायक होता. त्यासाठी होमिओपॅथीक गोळ्या शाबुदानाच्या आकारच्या बनवल्या. त्या मेंढी वा बकरीचे दुधापासून पावडर बनवतात व त्यात औषधीचे अर्क टाकले जाते.

होमिओपॅथीक औषधे चवीला गोड असतात.

 

होमिओपॅथीक औषधीचे फायदे-

होमिओपॅथीक औषधी पासुन कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्टस नाही.

आजच्या घडीला सर्वात स्वस्त औषधी

गर्भधारणा दरम्यानही वापरता येते.

लहान बालकांसाठी चवीला गोड.

 

डोकेदुखीला तापेसाठी वेगळी अशी गोळी नसते, कितीही आजार असले तरी एकच औषध असते. भारतात आज होमिओपॅथीक औषधीनंतर होमिओपॅथी कडे समाज वळत आहे. तरी लोकांमध्ये जागरुकता नसल्याने त्यांना होमिओपॅथी माहित नाही.

भारत सरकारने होमिओपॅथीचा विकास करण्यासाठी केंद्रीय होमिओपॅथीक परिषद स्थापन केली आहे. देशातील सर्व होमिओपॅथीक महाविद्यालये तसेच व्यवसायिक यांचे नियमन या परिषदेद्वारे केले जाते. राज्य पातळीवर राज्य परिषद काम पहाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version