Site icon InMarathi

इंग्रजी भाषेच्या तज्ज्ञांमध्ये ‘झी’ कि ‘झेड’ यावर अजूनही एकमत का झालेले नाही? वाचा

zee vs zed inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भाषा आणि त्याचे उच्चार हा मोठा गमतीचा विषय आहे. काही काळापर्यंत आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा असलेली हिंदी एवढ्याच भाषा येत असल्या तरी काम व्हायचं.

 

university of oxford

 

मात्र जसा इंग्रजीचा पगडा वाढला, तसं मातृभाषेपेक्षाही इंग्रजी भाषेचं महत्व वाढलं. सुरवातीला इंग्रजीचा वापर कामापुरता केला जायचा, मात्र त्यावेळी इंग्रजी शिकण्यापासून सुरुवात व्हायची.

ही अडचण लक्षात घेत, पालकांनी आता आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण देण्याचा आग्रह धरला आहे. मात्र याचं मुख्य कारण म्हणजे इंग्रजीबाबतचा न्युनगंड अर्थात कॉम्प्लेक्स.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मराठी शाळेमध्ये जशी अ, आ, इ शिकवतात तसे इंग्रजी माध्यमात सुरुवात ABCD पासून होते.

 

 

पुढे मराठी माध्यमातून शिकलेली मुले देखील इंग्रजी शाळांचा आधार न घेता मस्तपैकी इंग्रजी बोलायला शिकतात,

पण आपल्या मराठी माध्यमातून शिकलेल्यांमध्ये आणि इंग्रजी माध्यमातून शिकलेल्यांच्या बोलण्यामध्ये एक फरक मात्र प्रकर्षाने जाणवतो, तो म्हणजे काही शब्दांचा उच्चार.

इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये शिक्षण घेतलेली मुलं ही इंग्रजीतील काही शब्दांचा उच्चार वेगळा करतात, हा आरोप केला जातो. यामुळे अनेकदा त्यांना सर्वांसमोर मान खाली घालावी लागते.

cinema chat

 

उदाहारणार्थ Z या अक्षराचा वेगवेगळा उच्चार! इंग्रजी माध्यमातून शिकलेले Z चा उच्चार ‘झी’ असा करतात, तर उर्वरित सगळे आपण त्याच Z चा उच्चार ‘झेड’ असा करतो.

यांसारखे इतरही अनेक शब्द, अक्षरं आहेत, ज्याचा उच्चार प्रत्येकजण वेगळा करतो. यावरून अनेकदा चर्चा होतो, विनोद होतात, टिकाही होते.

आता इथे प्रश्न उद्भवतो चूक कोण? आणि बरोबर कोण?

कारण आपले मराठी शाळेतील शिक्षक  ‘झेड’  म्हणायला शिकवतात आणि इंग्रजी माध्यमाचे शिक्षक ‘झी’ म्हणायला शिकवतात.

म्हणजे यात चूक कोण्या एका शिक्षकांची आहे का? चला जाणून घेऊया काय आहे हे बुचकळ्यात टाकणारं प्रकरण!

 

i.ytimg.com

 

खरतरं ब्रिटीश इंग्रजी आणि कॉमनवेल्थ इंग्रजी (जसे ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण अफ्रिका इत्यादी देश) मध्ये Z चा उच्चार झेड होतो. फक्त ब्रिटिशच नाहीत, तर जगातील बहुतेक देशातील लोकांमध्ये Z चा उच्चार झेडच आहे.

याचं प्रमुख कारण म्हणजे इंग्रजी अल्फाबेट Z ची उत्पत्ती ग्रीक शब्द  ‘Zeta’ मधून झाली आहे असं मानलं जातं.

त्यापासून प्राचीन फ्रेंच ‘zede’ चा उदय झाला आणि त्याच्या परिणामाच्या स्वरुपात १५ व्या शतकाच्या जवळपास इंग्रजी मधील शेवटचा झेड हा शब्द समोर आला.

असं सांगितलं जाते की, अल्फाबेट Z आणि Y हे असे दोन इंग्रजी शब्द आहेत, ज्यांचा समावेश थेट ग्रीक भाषेतून लॅटीनमध्ये करण्यात आला आहे.

मात्र Z चा ‘झी’ रुपात उच्चार अमेरिकन इंग्रजी आणि न्यू फाऊंडलँडच्या इंग्रजी मध्ये केला जातो. तर दुसरीकडे स्कॉटिश इंग्रजी मध्ये Z चा उच्चार ‘Izzard’ असा केला जातो.

 

i.ytimg.com

 

अमेरिकेत जवळपास सगळीकडेच मुद्दाम Z चा उच्चार हा झी म्हणून केला जातो. तेथील शाळेतील मुलांना Z चा उच्चार ‘झी’ असाच शिकवला जातो.

अमेरिकन इंग्रजी शो आणि चित्रपट, यूएस शिफ्टमध्ये काम करणारे कॉलसेंटरचे कर्मचारी आणि अमेरिकेशी संबंधित काम करणारे लोकदेखील ‘झी’ चा उच्चार करतात. पण काही देशांमध्ये लोक ‘झी’ चा अर्थ Z  या इंग्रजीच्या अक्षराचा उच्चार म्हणून नाही तर एखाद्या वस्तूच्या उच्चारासाठी करतात.

म्हणजेच हे दोन्ही उच्चार आपआपल्या जागेवर अगदी बरोबर आहेत, फक्त भाषेनुसार यांमध्ये बदल होतो.

 

catch hindi

इंग्रजी भाषेच्या तज्ज्ञांमध्ये ‘झी’ कि ‘झेड’ यावर अजूनही एकमत झालेले नाही.

आपल्या भारतात Z चा उच्चार ‘झेड’ असा बरोबर आहे, पण बहुधा इंग्रजी भाषेतील शाळांमध्ये अमेरिकन जीवनशैलीचा वाढता प्रभाव लक्षात घेता तेथील शिक्षक हे मुलांना Z चा उच्चार ‘झी’ असा करण्यास सांगत असावेत.

मात्र याचा अर्थ असा नाही, की वेगळा उच्चार करणारे किंवा मातृभाषेत शिक्षण घेणारे लोक चुकीचे आहेत. शालेय वयात आपल्याला जे काही शिकवलं जातं ते कायमच लक्षात राहतं.

तसंच इंग्रजीतच नव्हे, तर इतरही अनेक भाषांमध्ये असे अनेक शब्द, अक्षरं आहेत, ज्यांच्या उच्चारांबाबत अजून एकवाक्यता नाही. त्यामुळे कोणतीही भाषा, किंवा त्यातील शब्दांच्या उच्चारांपेक्षा समोरच्या माणसाच्या भावना अधिक महत्वाच्या आहेत.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version