Site icon InMarathi

चीनची भिंत म्हणजे ‘जगातील सर्वात मोठे कब्रस्तान’ असं का म्हणतात?

kabristan great wall of china im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चीनची भिंत म्हणजे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य! अर्थात आपल्याला चीनची ही भिंत जगातील एक आश्चर्य म्हणूनच माहित आहे. पण याव्यतिरिक्त काही आश्चर्य या भिंतीशी जोडलेली आहेत. या भिंतीमागचा इतिहास जेवढा रंजक आहे तेवढ्याच काही रंजक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आम्हाला माहिती नाहीत.

चीनच्या या अजस्र भिंतीविषयीची ही रहस्यं जाणून घेणं तुम्हाला नक्कीच फार आवडेल…

चला तर मग जाणून घेऊया काय आहेत त्या रंजक गोष्टी!

 

 

१. चीनची ही विशाल भिंत ७ व्या शतकामध्ये म्हणजेच २८०० वर्षापूर्वी बनवण्यास सुरुवात झाली होती आणि या भिंतीला पूर्ण करण्यासाठी जवळपास २००० वर्ष लागली होती.

या प्रसिद्ध भिंतीच्या निर्मितीची सुरुवात राजा किन शिहुआंगने केली होती.

२. एकेकाळी या भिंतीला अनेक नावे देण्यात आली होती. जसे की, रमपंत, पर्पल फ्रॉट्रीयर, अर्थ ड्रॅगन वगैरे वगैरे!

मात्र १९ व्या शतकामध्ये या भिंतीला द ग्रेट वॉल ऑफ चायना हे नाव देण्यात आले, जे अखेर अजरामर झाले.

 

३. या भिंतीचे काही भाग एकमेकांशी जोडलेले नाहीत. जर या भिंतीचे सर्व भाग एकमेकांना जोडले तर या भिंतीची एकूण लांबी ८८४८ किलोमीटर एवढी असेल.

४. एका दाव्यानुसार ही भिंत बनवताना तब्बल  २० ते ३० लाख लोकांनी आपले संपूर्ण जीवन खर्ची घातले होते.

५. चीनची भिंत एवढी रुंद आहे की त्यावर एकाचवेळी ५ घोडे आणि १० लोक पायी जाऊ शकतात.

 

 

६. खरं तर चीनची भिंत शत्रूंपासून संरक्षण मिळवण्यासाठी बनवण्यात आली होती. पण तिचा उपयोग कित्येक शतकांपर्यंत व्यापारासाठी केला गेला होता.

७. जेव्हा भिंतीची निर्मिती करण्यात येत होती, तेव्हा कोणाच्याही हातून चूक झाली तर त्या व्यक्तिला/कामगाराला त्याच भिंतीच्या खाली गाडले जात असे.

म्हणून या भिंतीला जगातील सर्वात मोठे कब्रस्तान देखील म्हटले जाते.

 

८. १२११ मध्ये ज्या प्रकारे चंगेज खानने ही भिंत तोडून चीनवर आक्रमण केले होते. त्याच प्रकारचा प्रयत्न अनेक आक्रमणकाऱ्यांनी केला आणि चीनवर हल्ला केला होता.

 

 

९. शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी या भिंतीमध्ये असंख्य निरीक्षण मिनारे बनवण्यात आली आहेत.

१०. चीनची भिंत बनवताना, या भिंतीच्या दगडांना जोडण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर केला गेला होता.

११. भारतातील कुंभलगढची भिंत जगातील दुसरी सर्वात लांब भिंत आहे, पण चीनच्या भिंतीपेक्षा ही भिंत कित्येक पटीने छोटी आहे. या भिंतीची एकूण लांबी ३६ किलोमीटर एवढी आहे.

१२. चीनी भाषेमध्ये या भिंतीला ‘वान ली छांग छंग’ म्हणतात.

१३. जवळपास १ कोटी पर्यटक दरवर्षी या भिंतीला भेट देण्यासाठी येतात.

 

१४. चीनची भिंत ही एकच अशी मानवनिर्मित वास्तू आहे, जी अवकाशातून देखील स्पष्टपणे पाहता येते.

१५. चीनच्या भिंतीची कमाल उंची १४ मीटर म्हणजेच ४६ फुट इतकी आहे.

 

 

केवळ वाचण्यापेक्षा अशा महाकाय वास्तूला स्वत: अनुभवण्यात देखील अवर्णनीय आनंद आहे. त्यामुळे संधी मिळाल्यास चीनच्या या भिंतीवर फेरफटका मारण्यास विसरू नका!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version