Site icon InMarathi

सासू सुनांच्या रटाळ कथा सोडा – काटेरी सिंहासनाची ही कथा आवर्जून बघा!

GOT im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेले काही दिवसात तुम्हाला तुमच्या मोबाईल वर ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (GoT) या नावाखाली बरेचसे विनोद,फोटो आले असतील. पण हे प्रकरण नक्की आहे काय? हे उमगत नसेल तर हे वाचा.

moddb.com

सध्या सर्व रसिकांना संमोहित करणारी (वेड लावणारी), TRP ची सगळे विक्रम मोडणारी ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका मुळात ‘जॉर्ज आर आर मार्टिन’ यांच्या ‘अ सॉंग ऑफ आईस अँड फायर’ या काल्पनिक कथासंग्रहातील एका कादंबरीच अनुकूलन आहे .

कथा ‘वेस्टेरोस’ या काल्पनिक उपखंडातील आहे, ज्याला सात सात राज्य आहेत आणि सर्वांनाच सत्तेचा सर्वशक्तिमान असा ‘मुकुट’ डोक्यावर चढवायचा आहे, आणि या मुकुटाला जडलेल्या काटयांची कथा म्हणजे ‘गेम ऑफ थ्रोन्स’.

तर या खंडातील सात घराणी म्हणचे –

1. विंटरफेल चे स्टार्क (उत्तरेचे राजे)
2. हॅरनहल चे हॅरन (नदीकिनारचे राजे)
3. एरीचे एरन (डोंगर खऱयांचे राजे)
4. कास्टरली रॉक चे लॅनिस्टर
5. स्टोर्म्स एन्ड चे डरंडन
6. हायगार्डन चे गार्डनर
7. सन्स्पियरचे मार्टल

आणि या सर्वांवर राज्य करणारे वेस्टरोस चे राजे बॅराथन! वेस्टरोस चा वर्तमान राजा ‘रॉबर्ट बॅराथन’, त्याची राणी ‘सरसि लॅनिस्टर’, या राणीचे दोन भाऊ जेमी आणि टायरन लॅनिस्टर हे राजमहलात स्थायिक आहेत.

पण अचानक या राजाच्या पंतप्रधानाचा मृत्यू होतो, आणि एडर्ड स्टार्क {(नेड) जो त्याचा बालपणीचा मित्र पण आहे} ला आपला नवीन पंतप्रधान बनवण्याच्या मनशेने रॉबर्ट विंटरफेल ला येतो आणि इथे ज्या घटना घडतात इथून सुरुवात होते या रक्तांजित, अनैतिक, खिन्न करणाऱ्या गेम ऑफ थ्रोन्स ला.

वेस्टरोस हा प्रदेश चारी बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे आणि नद्या, डोंगर, समुद्र, जंगल यांचा संगम असलेला सुजलाम सुफलाम असा प्रदेश आहे. दोन हजार वर्षांपूर्वी अँडाल्ससनी नॅरो सी मार्गे वेलमधे घुसखोरी केली आणि आपली मूळं पसरवली. पूर्ण दक्षिण भाग आपल्या ताब्यात घेतल्या नंतर जेंव्हा ते उत्तरेकडे निघाले तेव्हा मात्र त्यांच्या पदरी हारच पडली मग दक्षिणेतच त्यांनी आपलं राज्य प्रस्थापित केल आणि या राज्याचं छोट्या राष्ट्रांमध्ये रूपांतर झालं.

या राज्याच्या उत्तर टोकाला आहे ही ‘भिंत’. अत्यंत जुन्या काळी बांधलेली ही बर्फ़ाची भिंत 700 फूट उंच आणि 300 मैल लांब आहे, ही बनवताना जादू आणि शास्त्र दोन्हीचा वापर केला गेला होता, ही भिंत राज्याच भटक्या लोकांपासून आणि ‘व्हाइट वॉकर्स’ पासून संरक्षण करते, (व्हाइट वॉकर्स म्हणजेच पिशाच्च ही कल्पना लोकांच्या मते काल्पनिक आहे) आणि या भिंतीवर नजर ठेवून असतात ‘नाईट्स वॉच’, भिंतीच्या संरक्षणाची शपथ घेतलेले, अतिशय प्रतिकूल अशा परिस्थिती राहणारे, शुर, समर्पित शिपाई, पाच राजांच्या युद्धापर्यंत गौरवशाली असलेली ही संघटना मनुष्यबळाच्या दृष्टीने सध्या बिकट परिस्थितीत आहे, या संघटनेचं मुख्यालय आहे ‘कास्टल ब्लॅक’ जे भिंतीच्या आडोशाला प्रस्थापित आहे आणि हजारो वर्षांपासून या सैनिकांच्या अन्नधान्याची सोय ही स्टार्क च घराणं करत आणि राज्यामधील गुन्हेगारांना शिक्षा म्हणून सुद्धा भिंतीकडे पाठवलं जात.

wilsonkhoo.files.wordpress.com

वेस्टरोस या खंडाला एसोस या खंडापासून वेगळं करते एक पाण्याची पट्टी ज्याला लोक ‘नॅरो सी’ अस म्हणतात, बहुतेक घटना या वेस्टरोस मधेच घडतात आणि लेखकाच्या मते वेस्टरोस या काल्पनिक खंडाचा आकार या सध्याच्या साऊथ अमेरिके इतका आहे आणि या संपूर्ण खंडाचा राज्यकारभार हा ‘किंगस लँडिंग’ मधून चालवला जातो जिथे ‘आयर्न थ्रोन’ (‘लोखंडी खुर्ची’) प्रस्थापित आहे.

बारा हजार वर्षांपूर्वी ‘चिलड्रन ऑफ फॉरेस्ट’, एक अमानवीय जमात हे वेस्टरोस चे रहवासी होते, जे निसर्गाच्या सानिध्यात शांततेने आणि खेळीमेळीने रहात होते, आणि ‘ओल्ड गॉड ऑफ फॉरेस्ट’ ला आपला देवता समजत होते, पण ‘द फर्स्ट मेन’ या मानव जमातीनी वेस्टरोस वर शस्त्रांसकट हल्ला केला ,पण चिल्डरननी तो जादूचा वापर करून निष्कामी केला, मग या दोन्ही गटांनी मैत्रीचा करार केला आणि ‘युती’ करून एकत्र राहु लागले आणि मेन नी सुद्धा ‘ओल्ड गॉड’ ची पूजा सुरू केली, चार हजार वर्षांनंतर व्हाइट वॉकर्स नी या खंडावर {इथे ऋतू हे महिन्याचा हिशोबाने नाही तर वर्षाच्या हिशोबाने चालतात उदाहरणार्थ 4 वर्ष उन्हाळा, 3 वर्ष हिवाळा} हिवाळ्यात हल्ला चढवला, युद्धात ‘युतीने’ व्हाइट वॉकर चा पराभव केला पण याची खूप मोठी किंमत त्यांना मोजावी लागली, चिल्डन वेस्टरोस मधून गायब झाले , मग ब्रँडन स्टार्क आणि ब्रॅन नी मिळून व्हाइट वॉकर्स पासून संरक्षणासाठी ‘भिंत’ बांधली आणि त्याच्या रक्षणाकरिता ‘नाईट वॉच’ ची स्थापना केली.

cdn.thisiswhyimbroke.com

अनेक कथा या मूळ कथेच्या समांतर चालतात, टार्गेरियन नावाचा आधीचा ‘वेडा’ राजा , त्याने भर सभेत जिवंत पेटवलेली माणस, म्हणून या राजाचा वध केलेला जेमी लॅनिस्टर , जिवंत असलेल्या प्रत्येक टार्गेरियनला संपवलेला रॉबर्ट, तरी ह्यात असलेली टार्गेरियन भाऊ बहीण, भुप्रेतांपासून संरक्षणासाठी बांधलेली ‘भिंत’ आणि त्याचे संरक्षक अशा अगणित कथा मूळ कथेच्या बाजूनी गुंफलेत, तरी खुर्चीला खिळवून ठेवणारी, डोळ्यांना न बघवणारी, काळजाला चिरा पाडणारी पण बुद्धीला पटणारी ही राजकीय खेळी तुम्हाला विश्वरूप दर्शन करवते हे म्हणणं अतिशयोक्ती नक्कीच नाहीये. माणूस हा मुळात कसाही असला तरी ‘खुर्ची’ त्याला काय काय करण्यास भाग पाडते, याचं उत्तम उदाहरण आहे ही मालिका.

सासू सुनांच्या कपट कारस्थाना पासून एखादा ब्रेक घेऊन माणसाचं ‘नैसर्गिक’ रूप आणि वर्तन समजवून घ्यायचं असेल तर नक्की पहा ‘गेम ऑफ थ्रोन्स’.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version