आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
२० वर्षाचा झाल्यावर मनुष्य हा तरुणपणात पाउल ठेवतो. शिक्षण वगैरे सर्व काही संपलेलं असतं, मजा करायचे दिवस निघून गेलेले असतात, हा असा काळ असतो जेथे तुम्हाला ‘जबाबदारी’ शी सामना करायचा असतो.
या वयात तुम्ही जे काही निर्णय घ्याल त्याचा थेट परिणाम तुमच्या भविष्यावर होत असतो. तुम्हाला ठरवायचं असतं की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे –
त्यावरून पुढे वयाच्या तिशीत लक्षात येतं की तुम्ही तुमचं भविष्य घडवलं आहे की मातीत घातलं आहे!
चला तर आज अश्या काही चुका जाणून घेऊया ज्या बहुतांश लोक आपल्या विशी मध्ये करतात आणि त्याचे परिणाम वयाच्या तिशी मध्ये दिसून आपल्यावर पश्चाताप करत बसण्याशिवाय त्यांच्या हातात काहीही उरत नाही.
१) ऐपत नसताना नको त्या गोष्टींवर पैसा उडवणे
हा जीवनाचा असा काळ असतो, ज्यात खुप काही करायचं मनात असतं. त्यात भर म्हणून आधुनिक लाइफस्टाइल आपल्याला आवडत असते. अश्या गोष्टींसाठी भरपूर पैसा आपण खर्च करतो. जो करण्याची तशी काहीही गरज नसते.
जेव्हा तुम्ही स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सक्षम समजाल तेव्हाच अधिकचा पैसा खर्च करा, तोवर जास्तीत जास्त बचत करण्यावर भर द्या. कारण कधी कोणता प्रसंग ओढवेल आणि पैश्याची चणचण भासेल हे सांगता येत नाही.
२) व्यसनाच्या आहारी जाणे
माझे मित्र दारू पितात, सिगारेट ओढतात, म्हणून मी देखील तसंच केलं पाहिजे असा काही नियम नाही. अगदी क्वचितच ड्रिंक घेणे वा सिगरेटचा झुरका मारण्याने तुम्ही काही पाप करत नाही, पण हीच जर सवय बनली तर ती आयुष्यभर पिच्छा सोडत नाही हे लक्षात ठेवा.
त्याचे पुढे तुम्हाला किती वाईट परिणाम भोगावे लागू शकतात हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही.
३) ईएमआय वर गोष्टी विकत घेऊ नका
होतं काय की आपल्याला एक गोष्ट हवी असते, पण ती घ्यायला आपल्याकडे पैसे नसतात, मग आपण ईएमआयचा पर्याय निवडतो.
पण लक्षात ठेवा हाच ईएमआय पुढे भरता न आल्यास ती गोष्ट तुमच्याकडून हिरावून घेतली जाऊ शकते. विशी मध्ये असताना खरंच एखादी महागडी गोष्ट ईएमआय वर घेण्याची गरज नाही. कारण या वयात एखादी चांगली नोकरी आपल्या हाताशी नसते, ती आपण कधी पर्यंत टिकवून ठेवू हे आपणच खुद्द सांगू शकत नाही.
अश्या स्थितीमध्ये लाख-दोन लाखाच्या गोष्टी ईएमआय वर घेणे म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. कधी कधी तर हा ईएमआय भरता भरता वयाची तिशी कधी उगवेल हे देखील तुम्हाला कळणार नाही. म्हणजे वयाची तब्बल १० वर्षे तुम्ही केवळ ईएमआय भरण्यातच घालवालं.
४) तयारी नसताना वयाच्या विशीत लग्न करणे
आजकाल जणू फॅशन आली आहे वयाच्या विशी मध्ये लव्ह मॅरेज करण्याची.
हातात न नोकरी असते, ना बाहेरील जगाचा पुरेपूर अनुभव घेतलेला असतो. ज्या वयात करियर घडवायचं त्या वयात संसाराची न पेलवणारी जबाबदारी अंगी पडते. वयाच्या विशी मध्ये लग्न केलेल्यांना देखील वर्षभरात त्याची प्रचीती येऊ लागते.
त्यातल्या त्यात मुल वगैरे झालं की आपण लग्न करून चूक तर नाही केली ना, असा मुलगा आणि मुलगी दोन्हींना प्रश्न पडतो. त्यामुळे सहसा वयाच्या २५ व्या वर्षानंतरच आपली आर्थिक परिस्थिती पाहून आणि मनाची तयारी करूनच बोहल्यावर चढावे.
५) सारासार विचार न करता व्यवसाय सुरु करणे
हे वय व्यवसाय सुरु करण्यासाठी तसे अनुकूल असते, कारण घरच्यांचा हातभार असतो आणि जरी व्यवसाय अयशस्वी ठरला तरी तुम्ही स्वत:ला सावरून नव्याने सुरुवात करू करता.
पण बऱ्याचदा केवळ नफा होईल या आशेने किंवा कोणाच्या हाताखाली नोकरी करणार नाही वगैरे विचाराने नको त्या व्यवसायात अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाशिवाय आपण सामील होतो आणि मग नको ते होऊन बसतं.
त्यामुळे अगदी सारासार विचार करूनच, घरच्यांना विश्वासात घेऊनच व्यवसायात उतरावे.
तर मित्रहो सोळावं तर आहेच पण विसावं वरीस देखील धोक्याचचं आहे हे लक्षात ठेवा!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.