आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
इतिहास ही अशी गोष्ट आहे ज्यात काय खरे आणि काय खोटे हे तुम्ही स्वत: ओळखू शकत नाही, जो इतिहास लिहिला आहे त्यावरच तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो. त्यामुळ बऱ्याचदा खऱ्या इतिहासापासून आपण वंचित राहतो. असाच काहीसा आहे मुघलांचा इतिहास.
मुघल हे जरी परदेशी असले तरी सध्या आपण त्यांच्या जो इतिहास वाचतो, त्यात त्यांनी भारतासाठी किती चांगल्या गोष्टी केल्या याचे वर्णन आढळते.
आता तुम्हीच विचार करा, जे मुघल बादशहा येथे राज्य करण्याच्या उद्देशाने आले त्यांना भारताबदल इतकी ओढ कशी काय असेल?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
हे मान्य की त्यांच्या काळात काही चांगल्या गोष्टी घडल्या, पण आपण नीट विचार केला तर लक्षात येतं की, बऱ्याच गोष्टी ज्या चांगल्या म्हणून इतिहासामार्फत आपल्या पुढे मांडल्या आहेत, त्या खोट्या आहेत.
कश्या? चला जाणून घेऊया!
हे ही वाचा –
===
१. सम्राट बाबर याला भारताविषयी नितांत प्रेम होते
बाबरने आपली डायरी तुजुके बाबरीमध्ये भारताविषयी जेवढ्या चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत, तेवढ्याच काही वाईट गोष्टी देखील लिहिल्या आहेत,
भारत हा काहीसा वेगळा प्रांत आहे. येथील लोक सुंदर नाहीत. समाजातील पायाभूत सुविध सुद्धा भक्कम नाहीत. येथील लोकांमध्ये शायरी करण्याची कला नाही. लोकांना बोलण्याची शिस्त नाही आणि दयाळूपणा देखील फार जाणवत नाही. कलेचीही येथे वानवा आहे. उत्तम दर्जाचे घोडे, टरबूज, द्राक्षे येथे आढळत नाहीत. येथील जेवण देखील म्हणावे तितके चविष्ट नाही.
पण बाबरने भारतातील दोन गोष्टींची खूप स्तुती केली आहे. एक म्हणजे सोने आणि दुसरे म्हणजे आंबे! बाबराने आपल्या ग्रंथात जे काही लिहिले आहे ते पाहायला गेले तर काहीसे खरे आहे, कारण तो ज्या भागातून आला त्या भागातील एकंदर परिस्थिती पूर्णत: वेगळी होती.
त्याच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी त्याला भारतात दिसल्या नाहीत, त्यामुळे आपल्याला जे सांगितलं जातं की, बाबराच्या मनात भारताविषयी प्रेम होते, तर ती गोष्ट म्हणावी तितकी खरी वाटत नाही.
२. मुघल नसते तर भारतामध्ये सुंदर इमारती नसत्या.
अनेकदा असे तर्क लावले जातात की, मुघल नसते तर लालकिल्ला नसता, ताजमहल नसता, कलाकुसरीने नटलेल्या सुंदर इमारती नसत्या. हा तर्क काही प्रमाणात जरी खरा असला तरी आताचा जो इतिहास आपल्यापुढे आहे त्यात खऱ्या भारतीय शासकांचे कलेतील योगदान दुर्लक्षित केले गेले आहे हे देखील सत्य आहे.
जर मुघल नसते तर ताजमहल, लालकिल्ला नसता, पण त्याने खरंच काही फरक पडला असता का, आपल्याकडे अजंठा,वेरूळच्या लेण्या, सांचीचा स्तूप, खुजराहोचे मंदिर, दक्षिणेतील कलाकुसरीने नटलेली भव्य मंदिरे, तंजावरच्या मूर्ती कला आहेतच की! अशी अनेक उदाहरणे देता येतील जी मुघल स्थापत्यकलेपेक्षा वरचढ आहेत.
हे ही वाचा –
===
३. बाबर नसता तर बिर्याणी नसती.
बिर्याणी हा शब्द फारसी शब्द ‘बिरींज बिरीया’ पासून उत्पन्न झाला आहे. याचा अर्थ होतो तळलेले तांदूळ. बिर्याणी आजची भारतातील सर्वात प्रसिद्ध डिश आहे. अशी ही बिर्याणी बाबरची देण आहे असे म्हटले जाते, पण ते बिलकुल खरे नाही.
ही गोष्ट तुमच्याही लक्षात आली असेल की भारतामध्ये लखनवी आणि हैदराबादी बिर्याणी खूप प्रसिद्ध आहे, पण आग्रा किंवा फतेहपुर सिकरीची बिर्याणी मात्र अस्तित्वातच नाही.
लक्षात घ्या बाबर तुर्क होता आणि बिर्याणी फारसी पदार्थ आहे. बाबरा नंतरचे काही बादशहा हे पुलावाचे शौकीन होते. पहायला गेलं तर, मुघलांचा बिर्याणीशीच काय तर तांदुळाशी देखील संबंध नाही.
अजून एक उदाहरण म्हणजे मोघलाई स्पेशल कबाब म्हणून जो पदार्थ आपण खातो तो मुघल साम्राज्यानंतर नवाब आणि जमीनदारांच्या घरी बनवला जायचा. मुघल बादशहांनी केवळ त्या त्या अन्नपदार्थाला नावलौकिक मिळवून दिला.
आज आपण मोघलाई पदार्थांच्या नावाखाली भरमसाठ पैसे देऊन जे पदार्थ खातो, त्यापैकी बऱ्याचश्या पदार्थांचे श्रेय मुघलांना फुकटचे मिळाले आहे.
४. गंगा-जमुना संस्कृती आणि उर्दू मुघलांची देणगी आहे
गंगा-जमुना संस्कृती आणि उर्दू याबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येकवेळी मुघल बादशहांचा उल्लेख होतो. पण सुफिवाद, गंगा-जमुनी संस्कृती आणि उर्दू या गोष्टी भारतात बाबर येण्याच्या पूर्वीपासूनच आहेत.
अमीर खुसरो याने बाबरच्या जवळपास २५० – ३०० वर्ष आधीच “जिहाले मिस्कीन मकून तागाफुल दुराए नैना बनाए बतिया” हे वाक्य लिहून उर्दूची सुरुवात केली होती.
निजामुद्दिन औलिया आणि अमीर खुसरो एकाच काळातील होते. या दोघांचे कार्य म्हणजे आजही हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक मानले जाते, म्हणजेच जे हिंदू मुस्लीम ऐक्य वाढवण्याबद्दल अकबराचा उदो उदो होतो, ते ऐक्य मुघलांच्या पूर्वीपासूनच भारतात जोपासत होते.
५. मुघल पहिल्यांदा आले आणि युरोपियन नंतर
वास्को द गामा १४९८ मध्ये भारतात आला होता आणि बाबर १५२६ मध्ये भारतात आला. त्यामुळे हा इतिहास खोटा सिद्ध होतो की, मुघल हे पहिले त्यानंतर युरोपियन भारतात आले. अनेक इतिहासकारांच्या मते तर गुजरात वर विजय मिळवणाऱ्या अकबराने पोर्तुगीजांची बलाढ्य नौसेना पाहून गोव्याकडे जाण्याचा मनसुबा बदलला. तसेच काही ठिकाणी तर खुद्द अकबराने पोर्तुगीजांशी करार केले होते.
या गोष्टी तर काहीच नाहीत, अश्या अनेक गोष्टी खोट्या इतिहासामागे खोट्या इतिहासात दडलेल्या आहेत, ज्या उघड होण्याची खरंच गरज आहे!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.