' प्रो कब्बडी पाहण्यापूर्वी ५ व्या हंगामाबद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहित असल्याच पाहिजेत! – InMarathi

प्रो कब्बडी पाहण्यापूर्वी ५ व्या हंगामाबद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहित असल्याच पाहिजेत!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

आयपीएल प्रमाणेच अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणाऱ्या प्रो कबड्डी लीगचा नवीन सीजन २८ जुलै पासून सुरु झाला आणि पुन्हा एकदा कबड्डी प्रेमी क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या सामन्यांचा आनंद घ्यायला सज्ज झाले आहेत. केवळ तीन वर्षांचा प्रवास, पण या लीगला जगभरातील चाहत्यांनी भरभरून पसंती दिली. भारताचे जागतिक, राष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावर प्रतिनिधित्व करणारे पण आपल्याच देशवासीयांच्या प्रेमापासून दूर असलेले कबड्डी खेळाडू रातोरात स्टार झाले. आता ही स्पर्धा पाचव्या पर्वत येऊन पोहोचली आहे. चला जाणून घेऊया विद्यमान पाचव्या हंगामाबद्दल काही रंजक गोष्टी!

pro-kabbadi-5-marathipizza01
i1.wp.com

या नवीन हंगामात चार नवीन टीम्सचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजे या हंगामात ११ राज्यांमधील एकूण १२ टीम्स १३८ मॅचेस मध्ये लढत देऊन स्वत:चं नशीब आजमावतील.

pro-kabbadi-5-marathipizza02
indianexpress.com

हरयाणा स्टीलर्स, गुजरात फोर्च्युन जायंट्स, युपी योद्धा आणि तमिळ थायलवाज या चार नवीन टीम स्पर्धेची रंगत अजून वाढवणार आहेत.

pro-kabbadi-5-marathipizza03
indianexpress.com

 

या हंगामात एकूण तब्बल ८ करोड रुपयांची बक्षीसं जाहीर करण्यात आली आहेत, जिंकणाऱ्या टीम ला ३ करोड, उपविजेत्यांना १.८ करोड आणि तिसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या टीमला १.२ करोड रुपयांची रक्कम प्रदान करण्यात येईल.

pro-kabbadi-5-marathipizza04
indianexpress.com

मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ठरणाऱ्या खेळाडूला स्वतंत्र १५ लाखांचे बक्षीस देऊन गौरवण्यात येईल.

pro-kabbadi-5-marathipizza05
deccanchronicle.com

लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला नितीन तोमार, ज्याला युपी योद्धा टीमने तब्बल ९३ लाख रुपये देऊन आपल्या गोटात सामील केले.

pro-kabbadi-5-marathipizza06
punjabnewsexpress.com

पटना पायरेट्स हि एकमेव टीम अशी आहे ज्यांनी सलग दोनदा विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे, आता या हंगामात देखील विजेते पदाला गवसणी घालून ते विजेतेपदाची हॅट्रिक मारणार का हे पाहणे औस्त्युक्याचे ठरणार आहे.

pro-kabbadi-5-marathipizza07
sportskeeda.com

यंदाच्या पाचव्या हंगामात गुजरात कडून खेळणारा रोहित गुलीया हा सर्वात तरुण खेळाडू ठरणार आहे.

pro-kabbadi-5-marathipizza08
i1.wp.com

 

पाचव्या हंगामात अखाती देशांमधील २७ खेळाडू विविध टीम्ससाठी खेळतील. तसेच इंग्लड, केनिया, जपान, बांगलादेश, थायलँड, साउथ कोरिया या देशांतील खेळाडू देखील आपल खेळ दाखवण्यास सज्ज आहेत.

pro-kabbadi-5-marathipizza09
sportskeeda.com

तर मग मंडळी तयार राहा, आणि या आगळ्या वेगळ्या खेळाचा पुरेपूर आनंद घ्या!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?