Site icon InMarathi

ज्यामुळे नवाज शरीफांना पदावरून डच्चू मिळाला, ते पनामा पेपर्स प्रकरण आहे तरी काय?

panama-papers-marathipiza00

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पदावरून हटवण्यात आले आणि पुन्हा एकदा पनामा पेपर्स प्रकरण चर्चेत आले आहे. मध्यंतरी भारतात देखील हे प्रकरण भरपूर गाजले होते, कारण भारतातील बड्या बड्या हस्तींचा या प्रकरणात उल्लेख केला गेला होता. तर मंडळी आज आपण जाणून घेऊया काय आहे हे पनामा प्रकरण? आणि का जगभरातील बड्या हस्तींवर याची टांगती तलवार आहे.

i.ytimg.com

पनामा हा मध्य अमेरिकेमधील एक लहानगा देश आहे. हा देश जरी स्वतंत्र असला तरी येथे चलन म्हणून अमेरिकन डॉलरचाच वापर होतो. पनामा देशामध्ये दोन प्रकारच्या टॅक्स सिस्टम आहेत. एक आहे टेरेट्रियल टॅक्स सिस्टम, ज्यात रेसिडेंट आणि नॉन-रेसिडेंट कंपन्यांकडून तेव्हाच टॅक्स वसूल केला जातो, जेव्हा त्या कंपन्यांचे इन्कम पनामा देशात जनरेट झाले असेल आणि दुसरी सिस्टम आहे कॉर्पोरेशान टॅक्स सिस्टम, ज्यात ज्या कंपन्यांची इन्कम १.५ मिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे, त्यावर २५ टक्के टॅक्स लावला जातो.

i.infopls.com

या देशाचे अजून वैशिष्ट्य म्हणजे येथे परदेशी गुंतवणुकीवर कोणताच टॅक्स लावला जात नाही आणि हेच कारण आहे की या देशामध्ये तब्बल ३.५ लाख कंपन्या गुप्तपणे कार्यरत आहेत आणि त्यामध्ये जगभरातील बड्या हस्तींचा पैसा गुंतलेला आहे.

पनामा देशामध्ये मोसेक फॉन्सेका नामक एक फर्म आहे. हि फर्म परदेशातील लोकांना पनामा मध्ये गुप्त कंपनी (शेल कंपनी) स्थापन करण्यात मदत करते. ज्या माध्यमातून जगभरातील कोणताही व्यक्ती आपले नाव उघड होउ न देता या कंपनीचा मालक वा भागीदार होऊ शकतो आणि आपला साठवलेला पैसा या कंपनीमार्फत कोणताही टॅक्स भरल्या शिवाय पनामा देशामध्ये साठवून ठेवू शकतो.

newyorker.com

याच सेक फॉन्सेका कंपनीची उघड झालेले काही गोपनीय कागदपत्रे म्हणजेच आहेत पनामा पेपर्स! या पेपर्स मध्ये जगभरातील अश्या काही लोकांची नावे आहेत ज्यांनी आपला अरबो डॉलर्सचा पैसा गुप्त कंपन्यांच्या नावाखाली पनामा देशामध्ये लपवून ठेवला आहे. असा पैसा लपवून ठेवणे म्हणजे आपल्या देशाचा टॅक्स चुकवणे असा अर्थ होता, जो कायदेशीर गुन्हा मनाला जातो आणि ज्याची जबर शिक्षा होऊ शकते.

अश्याच व्यक्तींमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे नाव पुढे आले आणि बेनामी संपत्ती आणि टॅक्स चुकवण्याच्या आरोपाखाली दोषी ठरवल्यामुळे त्यांना आपले पंतप्रधान पद गमवावे लागले.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version