Site icon InMarathi

रामायणाचा शेवट झाला कसा? वाचा, प्रभू श्रीराम- लक्ष्मण यांच्या अवतार कार्याच्या शेवटाची कथा

ramayan im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रामायण आणि महाभारत ही दोन आपल्याकडे अतिशय प्राचीन आणि महत्त्वाची काव्ये मानली जातात. एक काव्य म्हणूनच नाही तर जगण्याचा नैतिक मार्ग दाखवणारी काव्ये म्हणून यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.

आतापर्यंत आपण अनेक टीव्ही मालिका, नाटकांमधून रामायणाची कथा बघितली आहे. अगदी लहान मुलाला सुध्दा ही कथा माहीत असते, पण आतापर्यंत आपण ही कथा अर्धीच ऐकत होतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

रामायण कथेचा खरा शेवट आपण ऐकलेलाच नसतो.

राम हा आपल्यासाठी आदर्श राजा, पित्याची आज्ञा मानून वनवासासाठी जाणारा आदर्श पुत्र, वनात असतानासुद्धा आपल्या बंधूंची काळही घेऊन त्यांना मार्गदर्शन करणारा आदर्श बंधु, आपल्या पत्नीची काळजी घेणारा आदर्श पती आहे.

सगळ्याच दृष्टीने त्याचे गुण हे वंदनीय आहेत.

 

 

म्हणूनच, आपल्याकडे लहानपणापासूनच, “रामासारखे वागावे, रावणसारखे नाही” असं सांगितलं जातं. 

रामायण आपण लहानपणापासून वाचत आणि ऐकत आलोय, त्यातील गोष्टी आजही आपल्या स्मरणात आहे.

हे ही वाचा

 

रामाचा जन्म, त्यानंतर राम, लक्ष्मण आणि सीतेचा वनवास, त्या वनवासात असताना सीतेचे रावणाने केलेले हरण, प्रभू हनुमानाची भेट, रामसेतूची उभारणी आणि नंतर प्रभू रामांनी रावणावर मिळवलेला विजय…

आपल्यासाठी रामायणाची कथा इथेच संपते.

पण तुम्हाला माहित आहे का त्यानंतर काय झाले? प्रभू रामांनी आपले अवतार कार्य कसे संपवले? रामायणाचा शेवट कसा झाला?

चला जाणून घेऊया तुम्हाला आजवर कोणीही न सांगितलेली उर्वरित रामायण कथा…!

लोकापवाद, प्रभू श्रीरामांनी आदर्श राजा म्हणून प्रजेसाठी केलेला सीता त्याग, लव कुश यांची भेट या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत.

 

 

प्रभू रामाचा शेवट कसा झाला याबद्दलचे वर्णन वाल्मिकीरचित रामायणामध्ये नाही, तर पद्म पुराणामध्ये मिळते.

लव-कुश राज्यकारभार सांभाळण्यासाठी सक्षम होई पर्यंत काही वर्ष रामाने राज्य केले. त्या काळातही एक आदर्श राजा म्हणून त्यांनी अयोध्येचा कारभार पाहिला.

एके दिवशी एक ऋषी मुनी रामाला भेटायला आले आणि त्यांनी प्रभू रामांना एकांतात भेटण्याची विनंती केली. रामाने ही अतिशय नम्रपणे ही विनंती मान्य केली. ऋषी मुनीच्या सांगण्यावरून रामाने लक्ष्मणाला सांगितले की,

 ‘आमचे बोलणे सुरु असताना कोणालाही आत पाठवू नकोस. तू स्वत: द्वारावर उभा राहून लक्ष ठेव. जो कोणी आमचे संभाषण सुरु असताना आत येईल त्याला मी मृत्युदंड देईन.’

 

 

हे ही वाचा

 

आपल्या जेष्ठ बंधूंची आज्ञा शिरसावंद्य मानून लक्ष्मण द्वाराबाहेर उभा राहिला. ते ऋषी मुनी दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द्द कालदेव होते, त्यांनी रामाला सांगितले की,

‘आता तुमचे पृथ्वीवरचे अवतार कार्य संपुष्टात येण्याची वेळ समीप आली आहे. तुम्ही स्वत: पुनश्च वैकुंठाला प्रस्थान करण्याची योजना आखावी.’

इकडे द्वारावर महर्षी दुर्वास रामाची भेट घेण्यासाठी लक्ष्मणाशी हुज्जत घालत असतात. त्यांच्या तापट स्वभावामुळे सर्वजण त्यांना वचकून असत.

लक्ष्मण महर्षी दुर्वास यांना आपली परिस्थिती समजावण्याचा प्रयत्न करतो. पण हट्टी महर्षी दुर्वास त्याचे काहीही ऐकण्यास तयार नसतात. जाऊ न दिल्यास शाप देण्याची धमकी महर्षी दुर्वास देतात.

 

 

लक्ष्मणाला जाणीव होते की, महर्षी दुर्वास आता गेले तर प्रभू राम त्यांना मृत्युदंड देतील, म्हणून महर्षी दुर्वास यांचे प्राण वाचवण्याच्या उद्देशाने लक्ष्मण रामाचा आदेश मोडून कालदेवाबरोबरच्या त्यांच्या संभाषणात बाधा आणतो.

कालदेव या कृतीमुळे क्रोधीत होतात आणि रामाला आपला शब्द पाळायला सांगतात.

दिलेल्या वचनानुसार जो कोणी संभाषण सुरु असताना आत येईल त्याला  मृत्युदंड देण्याची प्रतिज्ञा घेतल्याने, प्रभू राम लक्ष्मणाला आपले शरीर त्याग करण्यास सांगतात.

रामाच्या आदेशानुसार लक्ष्मण सरयू नदीच्या पात्रात खोलवर जातो आणि आपले मानवी रूप त्यागून भगवान विष्णूच्या अनंत शेषनागाचे मूळ रूप धारण करतो.

प्रभू राम म्हणजे भगवान विष्णूचा अवतार. लक्ष्मणाच्या अवतार त्यागानंतर अयोध्या आपल्या पुत्रांच्या हवाली करून प्रभू राम देखील शरयू नदीच्या पात्रता खोलवर जातात.

स्वत:चे मानवी रूप त्यागून मूळ भगवान विष्णूचे रूप धारण करतात आणि आपल्या अनंत शेषनागावर जाऊन पहुडतात.

 

 

तुम्ही विचार करत असाल की प्रथम लक्ष्मणाने देह का त्यागला? त्याचे कारण म्हणजे ज्यावर भगवान विष्णू पहुडतात त्या आदी अनंत शेष नागानेच लक्ष्मणाच्या रुपात अवतार घेतला होता.

त्याचा अवतार पहिला संपला आणि तो आपल्या जागी जाऊन विराजमान झाला.

आपले अवतार कार्य संपविल्यानंतर भगवान विष्णूंना त्यांच्या जागी प्रथम अनंत शेष नाग दिसणे अपेक्षित होते, ज्यावर निद्रावस्थेत पहुडून ते विश्वाचे मंथन करतील.

अशाप्रकारे प्रभू राम आणि लक्ष्मणासोबत रामायणाचा देखील अंत झाला.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version