भारताचं पहिलं “स्वदेशी” अंतराळ यान अवकाशात झेपावलं!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
ISRO ने आणखी एक अभिमानास्पद काम तडीस नेलं आहे.
१००% स्वदेशी असलेल्या Reusable Launch Vehicle चं Technology Demonstration (RLV-TD) यशस्वीपणे पार पाडून !
RLV म्हणजेच पुनर्वापर करता येईल असलं अंतराळ यान “test” मधे पूर्ण गुणांनी पास झालं आहे !
आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा इथे सुमारे २० मिनिटांची चाचणी यशस्वी झाल्यानंतर ISRO ने “mission successful” झाल्याची घोषणा केली.
हे पण वाचा : ISRO चा अजून एक पराक्रम – एकाच वेळी प्रक्षेपित केले २२ उपग्रह!
ह्या अंतराळ यान आणि ह्या संपूर्ण प्रोजेक्टबद्दल थोडक्यात महत्वाचं :
१) ६.५ मीटर लांब आणि १.७५ टन जड असं हे “री-युजेबल” test model विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधे बनवलं गेलंय.
२) हे यान बनवण्यासाठी ६०० वैज्ञानिक ५ वर्ष झटत होते आणि सुमारे ९५ कोटी रुपये लागले आहेत.
३) ही “री-युजेबल” टेक्नोलॉजी वापरल्याने अंतरिक्षात कुठलीही वस्तू पाठवण्याचा खर्च १० पटीने कमी होणार आहे! सध्या एक किलोग्राम वजनाची वस्तू अंतरिक्षात पाठवायला २०,००० डॉलर्स – सुमारे १,४०,००० रुपये लागतात !
४) ISRO अश्याच आणखी २ चाचण्या करणार आहे. अंतिम ध्येय आहे – २०३० मधे साधारण ४० मीटर लांबीचं स्पेस शटल अवकाशात सोडणे !
५) हे स्पेस शटल अवकाशात सोडण्यासाठी ९ टन रॉकेटचा वापर केला गेला. हे रॉकेट “पंख” असलेल्या वस्तूच्या launch साठी खास बनवलं होतं, ज्यात संथ ज्वलन होतं.
ह्या प्रोजेक्टची आणखी माहिती हवी असल्यास पुढील व्हिडीयोमधे मिळेल :
भारताचं भविष्य उज्वल करण्यात ज्या ज्या मजबूत हातांचा आधार आहे – त्यातील एक बळकट बाहू म्हणजे ISRO !
धन्यवाद ISRO !
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi