' फिजेट स्पिनर वापरत असाल तर सावध व्हा, कारण ही निव्वळ दिशाभूल आहे! – InMarathi

फिजेट स्पिनर वापरत असाल तर सावध व्हा, कारण ही निव्वळ दिशाभूल आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मध्यंतरी पोकीमॉन गो सारखा धमाकेदार गेम मार्केटमध्ये आला होता. सामान्य माणसांपासून सेलिब्रिटींपर्यंत या गेमने एवढे वेडे लावले होते की, पोकीमॉन पकडण्यासाठी ते कुठेही घुसत असत. काही काळाने लोकांना असेच वेड लावले होते एका चक्रीने! या चक्रीला फिजेट स्पिनर असे म्हणतात.

 

Fidget-spinner 5 InMarathi

 

ही चक्री प्लास्टिकची असते. काहींमध्ये मेटल सुद्धा वापरलेले असते. चक्रीच्या मधील बेरिंगवाला भाग एक अंगठा आणि मधल्या बोटाने गोलगोल फिरवला जातो. लहान मुलांमध्ये तर याची भयंकर क्रेझ पाहायला मिळत होती.

तुम्हाला देखील या फिजेट स्पिनरने वेड लावले होते का? बरं तर याचा उपयोग काय असं विचारलं, तर प्रत्येकजण सांगत असे की, यामुळे स्ट्रेस कमी होतो. मन एकाग्र होते वगैरे वगैरे! पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की फिजेट स्पिनर यासाठी बनवले गेलेले नाहीच आहे मुळी! अहो ही फिजेट स्पिनर बनवणाऱ्या कंपनीची सेल्स स्ट्रेटजी होती जी उत्तमरित्या यशस्वी झाली आहे.

या चक्रीने चिंतेवर उपचार होतो हे अजूनही वैज्ञानिक संशोधामध्ये सिद्ध झाले नाही आहे आणि कोणत्याही डॉक्टरने हा मानसिक समस्येवरचा उपचार आहे हे कबुल केलेलं नाही. कोणत्याही मानसिक आजारासाठी ही चक्री किती उपयुक्त आहे, हे आजही कोणालाही सिद्ध करता आलेले नाही.

याचा स्पष्ट अर्थ असा की चिंता दूर करण्याच्या नावाखाली एक खोटे प्रोडक्ट ग्राहकांच्या गळी उतरवले गेले.

 

Fidget-spinner 1 InMarathi

 

या खेळण्याचा वाढता अतिरेक पाहून पाश्चिमात्य देशातील शाळांनी यावर बंदी घातली. त्यांचे म्हणणे होते की, हे खेळणे मुलांची एकाग्रता वाढवण्याऐवजी त्यांची एकाग्रता नष्ट करत आहे. त्यांची एकाग्रता अभ्यासावरून बाजूला होऊन या खेळण्यावर येऊन थांबली आहे. विद्यार्थ्यांचे आई – वडील सुद्धा खूप नाराज होते, कारण मुले सगळी कामे सोडून फक्त चक्री फिरवत बसलेली असत.

 

Fidget-spinner 3 InMarathi

 

मेडिकल रिसर्च जे सांगते ते खरे आहे की, मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी फिजिकल मुव्हमेंट गरजेची असते, परंतु ही एवढीशी वस्तू फिजिकल मुव्हमेंटचा स्त्रोत असूच शकत नाही. हे खेळणे फिरवण्यासाठी फक्त एका बोटाचा वापर होतो. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक स्थितीमध्ये म्हणावा तितका प्रभाव पडत नाही, उलट त्यात मन गुंतले जाते.

फ्लोरिडाचा एक सायकॉलॉजिस्ट मार्क रपोर्टच्या मते,

आतापर्यंत फिजेट स्पिनरवर कोणतेच संशोधन करण्यात आले नाही आहे आणि याच्या प्रभावाविषयी शास्त्रज्ञ अजूनही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचू शकलेले नाहीत. त्यांचे म्हणणे होते की, याचा वापर फायद्यापेक्षा मानसिक नुकसान जास्त करू शकते.

 

Fidget-spinner-marathipizza03
yimg.com

 

या चक्रीचा अनधिकृत शोध लावणारी व्यक्ती आहे- कॅथरीन हेटिंगर! अनधिकृत यासाठी की, त्यांच्याकडे याचे पेटंट नाही आहे. हेटिंगरने १९९३ मध्ये या डिवाइसच्या पेटंटसाठी अर्ज दिला होता. पेटंट मिळाले सुद्धा पण २००५ मध्ये ते रद्द करण्यात आले, कारण त्यांना कोणताच कमर्शियल पार्टनर मिळाला नव्हता.

हेटिंगरने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की,

फिजेट स्पिनरची कल्पना मुलांना त्यांचे बालपण आनंदाने जगू द्यावे यासाठी होती. कोणत्याही प्रकारची चिंता किंवा मेंटल हेल्थची समस्या सोडवणे हे फिजेट स्पिनरचे उद्दिष्ट बिलकुल नव्हते.

 

Fidget-spinner 4 InMarathi

 

कॅथरीन हेटिंगर एकदा इस्राइलला गेल्या होत्या आणि तिथे त्यांनी लहान मुलांना पोलिसांवर दगडफेक करताना पाहिले. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की, यांच्या हातून दगड काढून काहीतरी वेगळे द्यावे, जेणेकरून त्यात त्यांचे मन रमेल आणि वाईट गोष्टींच्या हरी ते जाणार नाहीत.

पण मानसिक शांतीसाठी हे डिव्हाइस रामबाण उपाय असल्याचे सांगून कंपनीने लोकांची दिशाभूल केली. याचा परिणाम म्हणून कित्येक जणांना या खेळण्याची नशा चढली होती असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

लहान मुलेच नाही तर मोठी माणसे सुद्धा यात वेड्यासारखी गुंतली होती. ज्या प्रमाणे लोक २-२ मिनिटांनी आपला फोन चेक करत असायचे, तसे सतत फिजेट स्पिनर फिरवत असत.

तर मंडळी, तुम्हीही जर मन एकाग्र होण्यासाठी वगैरे हे खरेदी केले असेल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा याचा उलटा परिणाम दिसून येईल.

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?