जेव्हा मार्क झुकरबर्ग फेसबुकच्या यशासाठी भारतीय मंदिरात नतमस्तक होतो!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
फेसबुक आज आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. आज असा कोणीही माणूस सापडणे कठीण ज्याला फेसबुक माहित नसेल. खऱ्या आयुष्यात कमी पण फेसबुकवर मनुष्य जास्त आयुष्य जगतो असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
तर अश्या या फेसबुकच्या साम्राज्याच्या संस्थापाकची एक माहित नसलेली गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हि गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा फेसबुक आतासारखे प्रसिद्ध नव्हते. तेव्हा सोशल मिडिया हे काय असते ते देखील लोकांना माहित नव्हते. खुद्द मार्क झुकरबर्ग याने नरेंद्र मोदी यांच्या बरोबर झालेल्या एका चर्चा सत्रात कबुल केले होते की,
मी फेसबुकच्या यशासाठी स्टीव जॉब्सच्या आग्रहावरून भारतातील मंदिराची यात्रा केली होती.
स्टीव जॉब्सच्या सांगण्यावरून मार्क झुकरबर्ग पूर्ण एक महिना भारतात प्रवास करत होता. स्टीव जॉब्सने मार्क झुकरबर्गला विश्वास दिला होता की,
भारतातील मंदिरांचा आशीर्वाद तुला मिळाला, तर तुझे फेसबुक नक्कीच यश मिळवले.
मार्क झुकरबर्गने सांगितले की,
फेसबुक तयार केल्यानंतर सुरुवातीचा काळा काही चांगला नव्हता. बरेच जण फेसबुकला विकत घेण्यासाठी टपलेलेच होते. तेव्हा मी स्टीव जॉब्सकडे गेलो आणि त्याला सगळी परिस्थिती सांगितली. त्यावेळी स्टीव जॉब्सने सांगितले की, ज्यावेळी मी अॅपल तयार करण्याचा विचार करत होतो आणि अशी परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा मी भारताच्या मंदिरांमध्ये गेलो आणि अॅपलची भरभराट झाली. तू सुद्धा भारताच्या मंदिरांमध्ये जा, तुला नक्की यश मिळेल.
मार्क झुकरबर्ग विमानाने पंतनगर येथे उतरला, जे नैनीतालपासून ६५ किलोमीटर अंतरावर आहे आणि नंतर तो नैनीतालच्या नेब करोरी बाबाच्या (ज्याला हनुमानाचा अवतार म्हणूनही ओळखले जाते) आश्रमामध्ये पोहोचला. तिथे त्याने आध्यात्मिकतेचे धडे घेतले. १९७३ मध्ये त्या बाबाचा मृत्यू झाला तरीही त्याने तेथे राहून शिक्षा घेणे सुरु ठेवले. त्या काळात मार्क सोबत काही हाई प्रोफाइल अमेरीकन्स आणि अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट सुद्धा होती. स्टीव जॉब्सच्या अॅपलच्या यशाची सुरवात देखील इथूनच झाली होती हे विशेष!
मार्क झुकरबर्गने पुढे सांगितले की,
मी जवळपास एक महिना भारतामध्ये फिरत होतो. मी लोकांना पाहिलं, ते एकमेकांशी जोडले गेले होते, पण मी त्यांना असा प्लॅटफॉर्म देणार होतो जो त्यांना एका ठिकाणी बसून जोडणार होता. त्याच भावनेने मला प्रेरित केलं आणि त्यातून फेसबुकवर मी नव्याने काम सुरु केलं, त्या मंदिराची यात्रा केल्या पासून, आज पहा गेल्या १० वर्षात आम्ही उत्तम प्रगती केली आहे आणि संपूर्ण जगातील लोकांना एकत्र आणले आहे.
हा प्रसंग ऐकून मोदींना देखील आनंद झाला होता, ते मार्कला उद्देशून म्हणाले,
पहा तुम्ही फक्त आशा ठेवून मंदिरात गेला होता आणि तेव्हापासून तुम्ही किती यश मिळवले आहे.
हा संपूर्ण संवाद तुम्ही येथे पाहू शकता.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi