Site icon InMarathi

राधा आणि कृष्ण यांच्या “अलौकिक” प्रेमकथेचा शेवट कसा झाला?

radha-krishna-featured-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे दशावतार या गोष्टीबद्दल आपल्या देशातल्या बऱ्याच लोकांना खूप कुतूहल आहे! आणि हिंदू धर्मात श्रीकृष्णाचं स्थान हे खूप महत्वाचं आहे!

शिवाय रामायण महाभारतात सुद्धा त्याच्या उल्लेखाशिवाय ते ग्रंथ पूर्ण होत नाही! साऱ्या सृष्टीचा कर्ता-धर्ता अशीच ओळख आहे कृष्णाची!

कृष्णाच्या कथा, चमत्कार आणि बऱ्याच गोष्टी आपण खूप ऐकल्या आहेत वाचल्या आहेत, याबरोबरच कृष्ण आणि राधेची प्रेम कहाणी सुद्धा तितकीच लोकप्रिय आहे!

 

 

प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने या सगळ्या कथा आपल्या पुढच्या पिढीला ऐकवत असते! पण आज आपण या प्रेमकथेचा अंत कसा आणि का झाला याविषयी या लेखातून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भगवान श्रीकृष्ण आणि राधेची प्रेमकथा सगळ्यांनाच माहित आहे. पण त्यांच्या प्रेमाच्या दु:खद अंताबद्दल प्रचलित असलेली कथा मात्र आपल्याला माहित नाही.

 

असे म्हणतात की, देवाधीदेव विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे अतिशय विलोभनीय असे अनेक अवतार आहेत. समयुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगामध्ये त्यांनी वेगवेगळ्या अवतारात जन्म घेतला.

या पैकी त्यांचे जेवढे मर्त्य अवतार (मानवी अवतार) आहेत त्यामध्ये कधीच त्यांची प्रेमकथा पूर्ण झाली नाही. जसे की, राम आणि सीता किंवा भगवान श्रीकृष्ण आणि राधा.

असे म्हणतात की, श्रीकृष्णाला इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा केवळ दोन गोष्टी खूप प्रिय होत्या आणि त्या त्यांच्या मनाशी खोलवर जोडल्या होत्या. त्या दोन गोष्टी म्हणजे- राधा आणि त्यांची प्राणप्रिय बासरी!

 

श्रीकृष्णाच्या बासरीमधून निर्माण होणाऱ्या मंजुळ संगीताने राधा कृष्णावर मोहित झाली होती आणि त्यामुळेच ते एकत्र आले होते. ह्याच कारणामुळे श्रीकृष्ण राधे एवढेच आपल्या बासरीवर देखील प्रेम करत असत.

जरी कृष्ण आणि राधा काही परिस्थितीमुळे एकमेकांपासून दूर असतील, तरी ती बासरी नेहमी त्यांच्या मधील दुवा साधायची. त्या बासरीमधून असे काही मंत्रमुग्ध करणारे गोड संगीत बाहेर पडत असे जे थेट राधे पर्यंत पोचत असे.

 

 

जरी श्रीकृष्णाने राधेशी लग्न केले नव्हते तरीसुद्धा त्यांच्या ८ प्रमुख बायका आणि १६००० सख्यांपेक्षा सर्वात जास्त प्रेम ते राधेवरच करीत असत. असे निस्सीम प्रेम आढळणे कठीण!

ही गोष्ट फारशी कोणाला माहित नसेल, पण हे खरे आहे की, राधेचा ही विवाह झाला होता. जेव्हा राधेने एका सामान्य यादव कुळातील तरुणाशी विवाह केला, तेव्हा श्रीकृष्णाने वृंदावन सोडून मथुरेला परत येण्याचा निर्णय घेतला.

श्रीकृष्णाला कळून चुकले होते की आता राधा कधीच त्यांची होऊ शकणार नाही, म्हणून ते तिच्या आठवणीमध्ये सतत आपली प्रिय बासरी वाजवत बसत असत.

एकीकडे राधा पत्नी म्हणून आपल्या संसारिक जबाबदाऱ्या संभाळत होती आणि दुसरीकडे श्रीकृष्ण आपल्या दैवी जबाबदाऱ्यांची पूर्तता करत होते.

 

 

आपली सगळी कर्तव्ये पार पाडल्यानंतर, शारीरिकदृष्ट्या वृद्ध झालेल्या राधेला आपल्या आवडत्या श्रीकृष्णाची शेवटची भेट घायची होती आणि ज्या बासरीने दोघांना अजूनही जोडून ठेवले होते, त्या बासरीचे, मंत्रमुग्ध करणारे संगीत ऐकायचे होते.

राधा जेव्हा द्वारकेला पोहोचली, तेव्हा तिला कळले की रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यासोबत कृष्णाचा विवाह झाला आहे. पण ती निराश झाली नाही, कारण तसा लोभ कधीही तिच्या मनात नव्हता.

कृष्णाने देखील आपल्या अंतर्मनातून राधा आपल्या भेटीसाठी येत आहे हे जाणले होते. दोघांची भेट झाली आणि राधेने एक दासी म्हणून श्रीकृष्णाच्या पदरी राहून त्याची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली.

 

 

एकदा आपली शेवटची इच्छा म्हणून राधेने आपल्या प्रेमाचे प्रतिक असलेली बासरी श्रीकृष्णाला वाजवायला सांगितली. ते मधूर संगीत ऐकून पुन्हा राधा आपले भान हरपली. श्रीकृष्णाचे अजूनही आपल्यावर पूर्वी इतकेच प्रेम आहे हे पाहून राधा कृतार्थ झाली.

त्या दिव्य बासरीमध्ये अशी काही शक्ती होती की, कितीही आवरले तरी श्रीकृष्णाकडे राधेचे मन पुनश्च धाव घेत होते.

 

 

राधेची शेवटची इच्छा म्हणून कृष्ण राधेसाठी रात्रंदिवस न थांबता बासरी वाजवू लागला. श्रीकृष्णाच्या बासरीमधून तोवर सूर निघत होते, जोवर राधा आपला देह त्यागून श्रीकृष्णात विलीन झाली नाही.

त्यानंतर दुसऱ्याच क्षणी श्रीकृष्णाने आपली प्राणप्रिय बासरी आपल्या प्राणप्रिय सखेच्या विरहाने तोडून फेकून दिली. त्यानंतर त्यांनीही संपूर्ण आयुष्यात आपले अवतार कार्य संपेपर्यंत बासरी किंवा दुसरे कोणतेच वाद्य वाजवले नाही.

असा झाला राधा-कृष्णाची निस्सीम प्रेम कथेचा अंत!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version