Site icon InMarathi

फेसबुकवरची छोटीशी पोस्ट तुमच्या लाडक्या व्यक्तींचं आयुष्य उध्वस्त करू शकते!

child trafficking im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शीला ताईंचा त्यांच्या ४ वर्षाच्या गोंडस परीवर खूप जीव होता. गोड होती पोर त्यांची. तिला नुकतंच नर्सरीमध्ये घातलं होतं त्यांनी. रोज सकाळी तिला छान सजवायच्या आणि सोडून यायच्या. कधी कधी तिच्या बाललीलांचे फोटोज त्या फेसबुकवर टाकायच्या.

एक दिवस, संध्याकाळी फेसबुकवर टाईमपास करत असताना एका अनोळखी व्यक्तीची फ्रेन्डशिप रिक्वेस्ट आली त्यांना. त्या व्यक्तीने कुठला मेसेज केला नाही. परीचे काही फोटो लाईक केले, बस. शीलाताई कधीच असल्या रिक्वेस्ट accept करत नाहीत. पण ह्या व्यक्तीच्या प्रोफाईल फोटोमध्ये खूप गोंडस बाळ होतं. टाईमलाइनवर बाल संगोपनाचे अनेक लेख, लिंक्स शेअर केलेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी रिक्वेस्ट accept केली. थोड्याच दिवसात शीलाताई ही प्रोफाईल, ती व्यक्ती विसरून गेल्या.

 

स्त्रोत

त्या दिवशी परीचा वाढदिवस होता. झकास पांढराशुभ्र फ्रॉक, गुलाबी रंगाचा बो…मस्त दिसत होती परी. ताईंनी परीला नर्सरीमध्ये सोडताना तिच्या नकळत तिची लोभस मुद्रा टिपली आणि फेसबुकवर caption सोबत फोटो टाकला –

“Doesn’t she look cute? I have just left her at her nursery and I’m already missing her! Happy birthday sweetheart! <3 ”
– at XYZ Nursery, Location — (फेसबुक चेक इन !)

नर्सरी सुटायची वेळ झाली, ताई मुलीला घ्यायला गेल्या तर ती नर्सरीत नव्हती. सगळीकडे शोधलं…नाही सापडली. नर्सरीतील लोकांच्या गलथान कारभारावर सर्वांनी प्रचंड राग काढला. शीलाताईंची शुद्धच हरपली. खूप शोधाशोध केली, पोलिस केस केली पण काही उपयोग झाला नाही.
कुणालाही कळालं नाही की परीवर संकटाच्या मालिकेची सुरुवात काही दिवसांपूर्वीच – त्या फेसबुक रिक्वेस्टपासुन झाली होती.

===

ती फेक अकाउंटधारी व्यक्ती शीला ताईंच्या पोस्ट्सवर बारीक नजर ठेऊन होती. रिक्वेस्ट accept व्हावी म्हणून सुरुवातीला फोटो लाईक केले आणि नंतर विस्मरणात जाण्यासाठी चुकूनही कुठली कृती केली नाही. परीच्या वाढदिवसाच्या दिवशी शीलाताईंनी ती पोस्ट टाकताच ती व्यक्ती नर्सरीमध्ये पोहोचली. संधी मिळताच परीला उचललं आणि पसार झाली. ज्यावेळी शीला ताई नर्सरीमध्ये शोधाशोध करत होत्या, त्यावेळी ती व्यक्ती दूर, आपल्या मानवी तस्करी करणाऱ्या जगात, शीला ताईंनी सकाळी अपलोड केलेल्या फोटोसोबत एक मेसेज पसरवत होती –
A 4 years old Indian female. Fair and Healthy. Start bidding.

त्यावेळी एका मोठ्या sack मध्ये परी गोंधळून गेलेल्या अवस्थेत होती. काळ्याकुट्ट अंधारात आईला शोधत होती. त्या गोंडस मुलीचा नराधमांच्या जगात लीलाव होणार होता. परीसाठी आता बोली लागणार होती.

===

अर्थात, कथा काल्पनिक आहे. कथेमधला संदेश कळाला असेलच…!

पावला पावलावर आपला ठाव ठिकाणा फेसबुकवर सांगण्याचं वेड पसरत जातंय. त्याचे संभाव्य धोके नं कळण्याइतके निर्बुद्ध आपण नक्कीच नाही. पण कधी कधी योग्य perspective सहज लक्षात येत नाही. म्हणून ही पोस्ट.

विचार करा – वाट्टेल ते फेसबुकवर पोस्ट करून आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता धाब्यावर बसवू नका…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version