Site icon InMarathi

महाभारतातले हे ५ अज्ञात प्रसंग आपल्याला ‘मानवी मूल्यांची’ शिकवण देतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाभारत म्हणजे रंजक गोष्टींचा खजिना आहे जणू!

त्या गोष्टी किती खऱ्या किती खोट्या या वादातच न पडता एक हौशी वाचक म्हणून जर या सर्व गोष्टींचा आस्वाद घेतला तर मनाला आणि मेंदूला काहीतरी रंजक खाद्य पुरवल्यास भास होतो.

 

 

कौरव-पांडवांचे युद्ध वगळता महाभारत कितीतरी खोल आहे, ज्यात प्रत्येक व्यक्तीमत्वाला वेगळी किनार आहे.

प्रत्येक व्यक्ती प्रत्येक प्रसंगातून आपल्याला काहीतरी शिकवण देतो.

आज आपण महाभारतातील तुम्हा-आम्हाला नाहीत नसलेले काही अज्ञात प्रसंग आणि त्यातून मिळणारा बोध जाणून घेऊया.

१. पाच स्वर्ण बाण

 

 

महाभारताचे युद्ध लढले जात होते. कौरवांकडे पांडवांच्या तुलनेमध्ये सैन्यबळ आणि एकापेक्षा एक महारथी होते. तरीसुद्धा पांडव युद्धामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करत होते.

यामुळे दुर्योधन खूप अस्वस्थ झाला आणि भीष्मांकडे गेला. त्याने आपला सगळा राग भीष्मांवर काढला. तो अतिशय क्रोधाने त्यांना म्हणाला,

तुम्ही पांडवांवर जास्त प्रेम करता आणि छुप्या पद्धतीने कौरवांविरुद्ध लढत आहात.

त्याच्या या खोट्या आरोपांमुळे, भीष्म क्रोधीत झाले आणि त्यांनी आपल्या भात्यातून सोन्याचे पाच बाण काढले आणि त्यांना मंत्रोच्चाराने अभिमंत्रित केले आणि दुर्योधनाला सांगितले की,

या पाच बाणांनी उद्या मी पाच पांडवांचा वध करणार.

पण दुर्योधनाला त्यांच्यावर विश्वास नव्हता. म्हणून त्याने भीष्मांना सांगितले की,

हे बाण तुम्ही मला द्या. मी यांची आज रात्री सुरक्षा करेन आणि उद्या तुम्ही जेव्हा युद्धासाठी निघाल तेव्हा तुम्हाला हे पाच बाण पांडवांचा वध करण्यासाठी देईन.

सदर प्रसंगातून भीष्मांची आपल्या कर्तव्या प्रती असलेली निष्ठा आणि प्रेम, नाती, संबंध सर्व काही बाजूला सारून ते कर्तव्य पूर्ण करण्यासाठी असलेली तत्परता दिसून येते.

हे ही वाचा –

===

 

२. दुर्योधनद्वारे अर्जुनला वरदान मिळणे

 

 

महाभारताचे युद्ध सुरू होण्याआधी सर्व पांडव द्यूतात हरल्यामुळे वनामध्ये राहत होते, पांडवांच्या निवासस्थानाच्या येथे एक सरोवर होते.

एके दिवशी अचानक दुर्योधन त्या वनात हजर झाला आणि त्या सरोवरात स्नान करण्याची इच्छा त्याच्या मनी आली.

त्या सरोवरामध्ये चित्रसेन गंधर्व आपल्या लवाजम्यासह स्नानासाठी येत असे. आपल्या उपस्थितीत एक मनुष्य सरोवरात स्नान करण्यासाठी उतरत आहे हे पाहून चित्रसेनास राग आला आणि त्याने दुर्योधनाला मज्जाव केला,

त्याचे पर्यावसान पुढे युद्धात झाले, पण या युद्धात चित्रसेनाने दुर्योधनास पराभूत केले आणि बंदी बनवले.

ही वार्ता कानी येताच आपल्या चुलत बंधूला सोडविण्यासाठी अर्जुन तेथे आला आणि त्याने आपल्या युद्धकौशल्याने चित्रसेनाला पराभूत करून दुर्योधनाला मुक्त केले.

पांडवांना नेहमी दुय्यम वागणूक देऊन देखील, ऐन प्रसंगी तेच आपल्या मदतीला धावून आल्याचे पाहून दुर्योधन ओशाळला.

त्याने अर्जुनास इच्छित वर मागण्यास सांगितले. त्यावर अर्जुन त्याला म्हणाला की,

मी वेळ आल्यावर तुझ्याकडून वरदान नक्की मागेन.

या प्रसंगातून अर्जुन हे पात्र  आपल्याला शिकवण देते की, आपल्या सग्या सोयऱ्यांशी कितीही शत्रुत्व असले तरी वेळे प्रसंगी त्यांना मदत करणे हे आपले धर्म कर्तव्य मानावे.

 

३. अर्जुनद्वारे दुर्योधनाकडे वरदानाची मागणी

 

wikimedia.org

 

ही घटना त्यावेळची जेव्हा भीष्म दुर्योधनाला अभिमंत्रित केलेले पाच  सुवर्ण बाण देतो. ही गोष्ट श्रीकृष्णाला आपल्या गुप्तहेरांकडून समजते आणि श्रीकृष्ण अर्जुनाला दुर्योधनावर उधार असलेले वरदान मागण्यास सांगतो.

अर्जुन तडक दुर्योधनाकडे जातो. दुर्योधनाला त्या वरदानाची आठवण करून देतो आणि त्याच्याकडून  ते पाच सुवर्ण बाण मागतो.

दुर्योधन, हतबल होऊन, क्षत्रिय धर्माचे पालन व्हावे म्हणून ते बाण त्याला देतो आणि अर्जुन पांडवांच्या जीवावर बेतलेल्या संकटापासून रक्षण करतो.

इकडे दुर्योधन पुन्हा भिष्मांकडे जातो आणि त्यांच्याकडे तश्याच पाच सुवर्ण बाणांची मागणी करतो.

पण यावेळी भीष्म त्याची मागणी फेटाळततात. कारण ते केवळ एकदाच ते बाण अभिमंत्रित करण्यास समर्थ असतात.

या प्रसंगात अचूक प्रसंगी चातुर्याने शत्रूचा सामना करण्याचे कसब अंगी बाणवावे आणि श्री कृष्णा सारख्या गुरुचे मार्गदर्शन सदा सोबत बाळगावे अशी शिकवण मिळते.

 

४. महाराज उडुपीद्वारे कुरुक्षेत्राच्या योद्ध्यांना भोजन घालणे

 

indianrestaurantsindenmark.com

 

जेव्हा महाभारताचे युद्ध लढले गेले तेव्हा सर्व राजांनी युद्धामध्ये भाग घेतला होता. काही राजा कौरवांच्या तर काही राजा पांडवांच्या बाजूने होते.

पण राजा उडुपीने या युद्धामध्ये भाग घेतला नव्हता. कारण दोन्ही पक्ष त्याला जवळचे होते. तेव्हा या युद्धात वेगळ्या पद्धतीने सक्रीय राहावे या इराद्याने त्यांनी श्रीकृष्णाला विनंती केली  की,

जे योद्धा लढतील त्यांना भोजनाची आवश्यकता पडेलच, तर मी त्या योद्ध्यांना भोजन घालेन.

त्याची अनोखी विनंती ऐकून श्रीकृष्ण देखील प्रसन्न झाले.

महाभारताचे युद्ध १८ दिवस चालले. या संपूर्ण १८ दिवस उभय पक्षांच्या योद्ध्यांच्या भोजनाची सर्व जबाबदारी राजा उडुपीने यथासांग पार पडली आणि या युद्धात आपले योगदान दिले.

महाभारतातील राजा उडुपीचे हे पात्र आपल्याला संदेश देते की, तुम्ही  धर्म किंवा अधर्माच्या बाजूने उभे राहिलात नाही तरी चालेल, पण मानवतेचा धर्म मात्र विसरू नका!

हे ही वाचा –

===

 

५. जीवनाच्या अंतिम क्षणी सुद्धा कर्णाच्या दानवीरपणाचे आणि महानतेचे दर्शन

महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा अर्जुन कर्णाचा वध करतो तेव्हा कर्ण जमिनीवर कोसळतो आणि शेवटच्या घटका मोजत असतो. त्यावेळी श्रीकृष्ण महारथी कर्णाची अंतिम परीक्षा घेण्याचे ठरवतात.

श्रीकृष्ण ब्राम्हणाचा वेश धारण करतात आणि कर्णाच्या जवळ जातात. ते त्याच्याकडून सोन्याचे दान मागतात. तेव्हा ब्राम्हणाला काय द्यावे असा प्रश्न कर्णाला पडतो.

अचानक त्याला काहीतरी आठवते आणि तो दानशूर कर्ण आपले मुख खोलतो आणि ब्राम्हणाला सोन्याचे दात तोडून घेण्यास सांगतो.

 

quoracdn.net

 

ब्राम्हण हे कृत्य पाप असल्याचे सांगतो आणि दान स्वीकारण्यास मनाई करतो. जीवनाच्या अंतिम क्षणी ब्राम्हणाला रिकाम्या हाताने परत पाठवणे इष्ट नाही हे जाणून कर्ण स्वत: दगडाने आपले दात तोडून त्याला देतो.

त्यावर ब्राम्हण-धारी श्रीकृष्ण म्हणतात,

हे दात रक्ताने माखलेले आहेत, अशुद्ध आहेत मी यांचा स्वीकार करू शकत नाही.

त्यावेळी त्या जखमी अवस्थेमध्येच कर्ण आपल्या धनुष्याने एक बाण आकाशात मारतो आणि वर्षा सुरू होते. वर्षाच्या पाण्याने ते दात धुतले जातात आणि शुद्ध होतात.

कर्ण सुवर्ण दंताच्या रुपात सोन्याचे दान ब्राम्हणाच्या हवाली करतो. याप्रकारे दानशूर कर्ण आपल्या जीवनाच्या अंतिम  क्षणी सुद्धा दान करणे सोडत नाहीत आणि त्याचे पालन करतो.

सदर प्रसंगातून कर्णाचे पात्र आपल्याला शिकवण देते की मरेपर्यंत आपली मुल्ये आणि तत्वे यांचा त्याग करू नये.

महाभारतात अश्या अनेक कथा आहेत. किंबहुना महाभारताच्या प्रत्येक प्रसंगातून आपल्याला काही न काहीतरी शिकवण मिळतच असते. फक्त त्या दृष्टीने महाभारताचे वाचन करणे गरजेचे आहे!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version