Site icon InMarathi

कोब्रा चावला तरी ती गात राहिली आणि मरण पावली

cobra-bites-singer-marathipizza00

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

“बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना…!”

धर्मेंद्रचा हा प्रसिद्ध डायलॉग. शोले चित्रपटात गब्बरसिंग हेमा मालिनी सामोर काचा फोडतो आणि धर्मेंद्र ला वाचवण्याकरिता पायात काचा रुचत असतानाही ती त्यावर नाचते, तेव्हाचा.

ह्याहून जास्त टोकाचा एक प्रसंग इंडोनेशियात वेस्ट जावा इथे घडला. इथे वाटेवर काचा नव्हत्या – हातात एक जिवंत आणि जहाल विषारी असा किंग कोब्रा साप होता.

 

स्त्रोत

इंडोनेशियात 6 एप्रिल रोजी येथील एक डैंगडट गायिका आणि नृत्यांगना इर्मा ब्लू हिला या नृत्य प्रकारावेळी स्टेजवर किंग कोब्रा ला घेवून नृत्य करणं इतकं महागात पडलं, की तिला शेवटी प्राण गमवावे लागले.

आश्चर्य म्हणजे कोब्रा चावला आहे हे ठावूक असूनही ती ४५ मिनिटे नाचत राहिली.

शेवटी उलटी झाल्यावर तिने नाच सोडून दिला. परंतु तो पर्यंत किंग कोब्राचं जहाल विष तिच्या शरीरात संपूर्ण पसरलं होतं.

“डैंगडट” हा नृत्य प्रकार कॅब्रे सारखाच असतो. फक्त फरक हाच, की ह्यात एकीकडे गात, नाचत असताना, अंगावर विषारी साप खेळवले जातात.

इंडोनेशियात हा प्रमाणा बाहेर प्रसिद्ध असून बहुतेक लोक लग्न आणि इतर प्रसंगात ह्याचं आयोजन करतात. ह्या प्रकारचे डैंगडट डान्स आता कोट्यावाधीच्या इंडस्ट्रीचं रूप घेत आहेत. आयोजकांचा पैसा आणि प्रेक्षकांकडून मिळणारी टीप यामुळे जिवंत आणि विषारी सापांबरोबर भडक कपडे घालणाऱ्या डैंगडट नृत्यांगना आपला जीव धोक्यात घालून काम करतात.

विशेषतः निवडणुकांच्या काळात गर्दी जमवण्यासाठी अश्या कार्यक्रमांचं आयोजन होत असतं. गरीब घरातील मुली थोड्याश्या पैश्यासाठी आपला जीव धोक्यात घालून अशी कामं करत आहेत.

खालील व्हिडीओ लिंक मध्ये तिला कोब्रा चावल्याचे आणि नंतरही ती उठून नाचत असल्याचे चित्रीकरण आहे :

 

 

काही पैश्यांसाठी ऐन उमेदीतील तरुणीला असा जीव गमवावं लागणं मानवतेला मान खाली घालणारं आहे.

: अजित तांबे

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarath

Exit mobile version