Site icon InMarathi

लग्न मोडलं, पण तिने गरिबांना १९ लाख रुपयांचे जेवण खाऊ घातले…वाचा काय आहे हे प्रकरण!

sarah-cumins-marathipizza00

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणुसकी दाखवायची फक्त इच्छा पाहिजे, मग ती कशातूनही प्रकट होते…अगदी नकळत…! या स्वार्थी जगात कोणी कोणाच नाही, प्रत्येकजण आपल्यापुरता विचार करतो असं म्हणणाऱ्यांसाठी हि खास कहाणी..एका तरुणीची, जी लग्न मोडलं म्हणून रडत बसली नाही, तर त्याच लग्नाचं ऑर्डर केलेलं जेवण तिने घरदार नसलेल्यांना खाऊ घातलं….माणुसकी दाखवली आणि पुण्य कमावलं…!

twitter.com

सारा कॅमिन्स हिने आपल्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी हॉल बुक केला होता, सोबत जेवणाची उत्तम बडदास्त होती, खास वेगवेगळ्या प्रकारच्या मेनूसाठी तिने ३०,००० डॉलर्स अर्थात १९ लाख रुपये एवढी मोठी किंमत मोजली होती. मेनूमध्ये बर्बोन-ग्लेझड मिटबॉल, रोस्टेड गार्लिक बृस्चेत्ता आणि कैक महागड्या पदार्थां सोबत लग्नाचा स्वादिष्ट केक देखील होता. सोहळ्याला मोठ मोठ्या मंडळींना आमंत्रण होते. पण अचानक काहीतरी बिनसले आणि लग्नाला आठवडा उरला असताना तिच्या भावी नवऱ्याने लग्न मोडलं. झालं..लग्न मोडल्याच दु:ख होतच, पण सोबत जेवणासाठी वगैरे मोजलेला पैसा देखील वाया जाणार होता. कारण ऑर्डर घेतलेली कंपनी कॅन्सल ऑर्डरसाठी रिफंड देणार नव्हती. १७० लोकांच्या जेवणाची कंपनीला दिलेला ऑर्डर वाया जाऊ द्यायची नाही हे साराने ठरवले.

तेव्हा तिच्या डोक्यात सुज्ञ कल्पना आली. आयुष्यात कधीतरी चांगले कार्य हातून घडण्याचा योग येतो आणि तो योग जणू आता आलाय हि भावना मनात ठेवून आणि अन्न फुकट जाऊन फेकून देण्याऐवजी याचा काहीतरी उपयोग होईल या हेतूने, तिने आपल्या विभागातील गरीब आणि बेघर लोकांच्या आश्रमाशी संपर्क साधून त्यांना जेवणाचे आमंत्रण दिले आणि लग्नाचाच दिवशी १७० लोकांची पंगत उठली.

atlanticbb.net

तिच्या या उमद्या उपक्रमाकडे पाहून बऱ्याच स्थानिक व्यवसायकांनी आणि रहिवाश्यांनी या गरीब अतिथींना परिधान करण्यासाठी कपडे, सूट आणि इतर वस्तू दान केल्या.

तीन महिन्यांपासून बेघर असलेल्या चार्ली ऍलेन नामक युवकाला दान केलेले एक जॅकेट मिळाले, तो म्हणाला,

माझ्याकडे कधीच असा स्पोर्ट कोट नव्हता, मी यात खूप छान दिसतो आहे. इतर अतिथींप्रमाणेच मला दिलेल्या या आमंत्रणाबद्दल मी कृतज्ञ आहे.

२५ वर्षीय सारा कॅमिन्स कमिन्स हिने सांगितले की,

लग्न मोडल्याचे मला एवढे दु:ख नाही, आम्ही वधू-वरांनी समंतीने हा निर्णय घेतला होता, पण असो, त्यामुळे माझ्या हातून एक चांगल काम घडलं याचा मला आनंद आहे.

mgtvwncn.files.wordpress.com

दु:खाच्या प्रसंगी ही इतरांना आनंद देण्याचा विचार मनात येऊन तो प्रत्यक्षात उतरविणाऱ्या साराचे खरंच करावे तेवढे कौतुक थोडे आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version