Site icon InMarathi

नेट पॅक संपल्यानंतर मोठ्या रकमेचा भुर्दंड सहन करायचा नसेल तर हे नक्की वाचा!

telecom-marathipizza00

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

जिओच्या ऐतिहासिक यशस्वी वाटचालीनंतर टेलीकॉम मार्केटमधील स्पर्धा अजूनच तीव्र झाली आहे. ही कधीही न संपणारी लढाई आहे. जिओ सगळ्यांना मोफत डेटा देऊ लागल्यानंतर इतरांनाही त्या दिशेने पाउले उचलावी लागली. पूर्वी, इतर ऑपरेटर फक्त नफा मिळवण्याच्या शर्यतीत असायचे, परंतु जिओच्या आगमनानंतर त्यांनी ग्राहकांच्या दृष्टीकोनातून देखील विचार करण्यास सुरुवात केली.

पण एक गोष्ट मात्र आपल्याला लक्षात येत नाही की, या टेलीकॉम कंपन्या डेटा देण्याच्या नावाखाली घोटाळा करत आहेत आणि ग्राहकांना फसवत आहेत. तुमचा विश्वास बसत नाहीये, चला आज हे गौडबंगाल जाणून घ्याच.

jansatta.com

तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आला असेल की, अतिरिक्त डेटा वापरल्यावर तुमचा मेन बॅलेंस खूप कमी झाला असेल. आपण हा विचार करून या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की, ‘मी तेवढा डेटा वापरला म्हणून तेवढा बॅलेंस गेला असेल’. पण यामागचं सत्य जाणून घेतल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तुमचा नेटचा पॅक संपल्यानंतर वापरण्यात येणाऱ्या अतिरिक्त डेटाच्या बदल्यात ह्या कंपन्या तुमच्याकडून खूप मोठी किंमत वसूल करतात. जर तुम्ही नेट पॅक संपल्यानंतर जर  थेट १ जीबी डेटा वापरला तर त्यासाठी तुम्हाला चक्क १०,००० रुपयाचा फटका बसू शकतो.

उदारणार्थ, एअरटेल आणि वोडाफोन त्यांचा नेटचा पॅक संपल्यानंतर,अतिरिक्त डेटा वापरामध्ये प्रत्येक १० केबीला १० पैसे शुल्क आकारतात. तुम्हालाही हे रेट माहित असतीलच आणि तुम्हाला हे रेट खूप कमी वाटत असतील, पण तसे नाही आहे. जर तुम्ही १ जीबी डेटाची किंमत १० पैसे  १० केबीनुसार मोजली तर तुम्हाला मिळणारा आकडा हा १०,००० रुपयांच्या वर असेल. म्हणजे आपण डेटा पॅक शिवाय प्रत्येक अतिरिक्त जीबीला  १०,००० रुपये मोजतो. हे शुल्क कंपन्यांच्या ‘Pay As You Go’ च्या श्रेणी अंतर्गत तुमच्या वापरलेल्या डेटासाठी लागू होते. ही गोष्ट जर ग्राहकाला समजली तर कोणताही ग्राहक डेटा वर एवढा खर्च करणार नाही याची प्रत्येक ऑपरेटरला खात्री असते.

ऑपरेटर चातुर्याने मुख्य बॅलेंस मधून हे रुपये वजा केल्यानंतर ग्राहकाला मेसेज पाठवतात. पण मुख्य बॅलेंसमधून पैसे वजा करण्याआधी ग्राहकाची परवानगी घेतली पाहिजे  किंवा ग्राहकाची डेटा मर्यादा संपल्यानंतर त्याची डेटा सेवा खंडित केली जावी आणि त्यांना अतिरिक्त शुल्काबद्दल माहिती देण्यात यावी. पण ऑपरेटर असे काहीही करत नाहीत.

खालील टेबल पहा, हे २०१६ चे दर आहेत.

rvcj.com

अश्या प्रकारे ग्राहकांना फसवण्याऐवजी, कंपन्यांनी नेट पॅकची मर्यादा समाप्त होण्यापूर्वी वापरकर्त्याला सावध केले पाहिजे, परंतु त्याऐवजी,ऑपरेटर असा दावा करतात की, ते ग्राहकांचा विचार करतात आणि ग्राहकांच्या डेटा सेवांमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये हि त्या मागे त्यांची भावना असते.

यावर एक उपाय करता येऊ शकतो तो म्हणजे, ऑपरेटरने डेटा पॅक वापरल्यानंतर कंपनीने एक पॉपअप प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

तुमच्या विनामूल्य डेटा पॅकची मर्यादा संपत आली आहे, होयवर क्लिक केल्यास तुमच्या प्रीपेड खात्यामधून उरलेली शिल्लक कमी केली जाईल. तुम्ही ही सुविधा चालू ठेवू इच्छिता? – हो किंवा नाही

बीएसएनएल सारख्या ब्रॉडबँड ऑपरेटर्स कंपन्या डेटा संपण्याच्या अगोदरच हा संदेश दाखवतात. तथापि, टेलीकॉम कंपन्या असं करणार नाहीत, कारण त्यांना माहित आहे की ग्राहक उपयुक्त शुल्क भरण्याऐवजी डेटा पॅक रिचार्ज करणे पसंत करतील.

सध्या वोडाफोन ३४६ च्या रिचार्जवर ५६ जीबी डेटाची ऑफर देत आहे, म्हणजे अंदाजे ७ रुपये प्रती जीबी शुल्क हे आकारात आहेत. पण फक्त ७ रुपये प्रती जीबी देता देऊन त्यांना काही फायदा होणार आहे का? नक्कीच नाही! म्हणूनच कंपनी चालू ठेवण्यासाठी या ऑपरेटर्सना “Pay As You Go” या सारख्या सहाय्य योजनांची गरज आहे.

telecomvibe.com

आता तुम्ही असा म्हणत असाल की नेट पॅक शिवाय १ जीबी डेटा कोण कशाला वापरेल? पण हाच विचार तुम्ही कमी वापरावर करा, समजा तुमचा नेट पॅक संपला आणि तुमच्या ही गोष्ट लक्षात आली नाही आणि तुम्ही चुकून १०० एमबी इतकं नेट अधीकचं वापरलं तरी तुम्हाला त्यासाठी मोठा फटका पडू शकतो, ज्यात तुम्ही कदाचित नवीन नेट पॅक खरेदी करू शकता.

अशी आपली फसगत होऊ नये म्हणून काय करावे?

डेटाची मर्यादा ठरवा : तुमचा डेटा पॅक जर १ जीबी डेटा प्रदान करत असेल, तर आपण ८०० एमबीवर मर्यादा सेट करू शकतो. ८०० एमबीनंतर तुम्हाला सुचना मिळेल आणि अतिरिक्त पडणाऱ्या शुल्कापासून वाचू शकतो.

कमीत कमी बॅलेंस ठेवा : आपल्याकडे पुरेसा बॅलेंस नसल्यास, कंपनी तुम्हाला नेट सेवा पुरवणार नाही.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सतर्क राहाल, तर अश्या गोष्टींपासून स्वत:चा बचाव करू शकाल.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Exit mobile version