आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आ-ठ-शे…इ..स्क्वे..र फूट…म्हणजे बगा पन्नास बॉक्स.
तो कॅलक्यूलेटरवर खट खट करत बोलला.
स्टोअरचं रिनोव्हेशन चाललंय. टाईल्स बदलणे, रंग बदलणे, ट्रॅक माउंटेड एलईडी लाईट्स लावणे वगैरे वगैरे. गेले तीन चार दिवस ह्याच कामात आहे. स्टोर ‘कसं’ असावं आणि दिसावं ह्याबाबतीत सॅमसंग (किंवा कुठलाही ब्रँड) अतिशय पर्टीक्युलर असतो.
कुठल्याही बाबतीत केली गेलेली तडजोड त्यांना मान्य नसते. स्टोरमध्ये ‘कजारीया’ च्या आयव्हरी रंगाच्या टाईल्स होत्या. सॅमसंगला त्या मान्य नाहीत.
“Johson’s porcelain vitrified salt and pepper (grey series)” ह्याच टाईल्स असायला हव्यात ह्यावर कंपनी अडून बसली. ह्या टाईल्स रेअर आहेत…महाग आहेत.
अखेर अडला हरी म्हणत पुण्यात वणवण हिंडून मी ह्या टाईल्स मिळवल्या. आता एक मिस्त्री हवा होता.
शेजारच्या एक-दोन दुकानवाल्याना बोलून ओळखीत एखादा मिस्त्री मिळतो का ते पाहूया म्हणून गेलो. एक जण माझ्या ओळखीतला मिस्त्री आहे म्हणून ऐकाला घेऊन आला.
हा बाप्या सगळंच काम मी करतो म्हणायला लागला. टाईल्सवाले, सिमेंट रेतीवाले माझ्या ओळखीतले आहेत मी स्वस्तात मिळवून देतो म्हणायला लागला. कामाला ५ दिवस लागतील म्हणाला.
आधीच्या टाईल्स तोडायला वीस रुपये प्रति चौरस फूट आणि नव्या बसवायला छत्तीस रुपये प्रति चौरस फूट असा भाव त्याने सांगितला. मटेरियल वेगळे! हा खर्च त्या महागड्या टाईल्सपेक्षा जास्त होत होता. मी घासाघीस करायचा प्रयत्न केला तर.
सायेब तुम्ही मराठी माणूस, मी पन मराठी माणूस…मी जास्त घेईन का? बाहेर ७५ रुपये भाव घेतो. तुमच्यासाठी ५६ लावला…बघा पटत असल तर करू, नाहीतर दुसरा माणूस मिळतंय का बघा ह्याहून कमीमध्ये.
तो बेफिकिरीने तंबाखू मळत बोलला.
मी संध्याकाळी सांगतो म्हणून सांगितलं. अर्थात हा भाव मला परवडणारा नव्हताच. स्टोअर सुरू करताना मी विश्वकर्मा नावाच्या एका राजस्थानी माणसाकडून फॉल सिलिंगचं काम करून घेतलं होतं. नशिबाने त्याचा नंबर माझ्याकडे होता. फोन करून त्याला बोलावलं आणि ओळखीचा मिस्त्री आण म्हणून सांगितलं.
लगोलग तो एका “शर्मा” नावाच्या ग्वाल्हेरच्या माणसाला घेऊन आला. तिशीतला उमदा हसरा खेळकर माणूस! शर्मा एकदम मस्त काम स्वस्तात करून देईल असंही विश्वकर्माने मला सांगितलं.
शर्माने स्टोर पाहून घेतलं आणि मला आधीच्या टाईल्स तोडण्याचा आणि नवीन बसवण्याचा भाव सांगितला. त्याने सांगितलेला भाव ऐकून मी उडालोच.
स्वस्त स्वस्त म्हणजे दहा पाच रुपयांचा फरक असेल असं मला वाटत होतं. पण –
सर जी, टाईल्स तोडने का ८ रुपये और बिठाने का १६ रूपिया लुंगा. और हम रेती के बजाय डस्ट युज करेंगे. रेती का जरूरत नाही है फोकट मे पैसे मत उडाव.
कुठे ५६ आणि कुठे २४?….निम्म्याहून कमी!!! तरी देखील विश्वकर्माने लाडी गोडी लावून हा सौदा २२ वर आणून ठेवला. शिवाय ३ दिवसात काम पूर्ण!
=========
मराठी माणूस मागे का आहे ते कळतंय?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.