Site icon InMarathi

आयुर्वेदाच्या पंचामृतातील ‘या’ पदार्थाला नाकारण्याची चूक कधीही करु नका

Dahi im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका – डॉ. प्राजक्ता जोशी

— 

दह्याचे महत्व

 

 

दही हे आयुर्वेदानुसार पंचामृतापैकी एक असुन आहारामध्ये त्याचे वेगळे स्थान आहे. आधुनिक दृष्ट्याही दही उत्तम दुग्धजन्य पदार्थ आहे.

दही कसे लावावे??

गायीचे किंवा म्हशीचे (कमी चरबीयुक्त) 1litre दुध घेवून 80°c ला 15 मिनीट तापवावे. तापवताना हलवत रहावे. त्यात 20gm विरजन लावावे विरजन 100gm दुधात मिसळून नंतर बाकीचे दुध टाकावे. हे मिश्रण 10 ते12 तास उबदार जागेत ठेवावे.

दह्यातील पोषकांश/100gm- Calories—98

पोषकांश टक्केवारी

स्निगधांश 6%

कार्बोदके 1%

प्रथिने 22%

जीवनसत्वA 2%

जीवनसत्वB12 6%

कॅल्शीअम 8%

 

दह्याचे फायदे:-

1) दही पचनशक्ती वाढवते.

2) दह्यातील lactic acid bacteria, B व T प्रकारच्या पेशी वाढवून प्रतिकार क्षमता वाढवते.

3) दह्याच्या नित्य सेवनाने लैंगिक क्षमता (sexual impotence), शैथिल्य हे विकार नाहीसे होतात. – (स्त्रोत-masschusetts institute of technalogy)

4) दह्यातील प्रथिने केसांना पोषण देतात व केस नरम व चमकदार होतात.

5) दह्यामध्ये प्रथिने ,जीवनसत्वे भरपूर असल्याने ते superfood सारखे कार्य करते. तसेच ईतर दुग्धजन्य पदार्थापेक्षा स्निग्धांश कमी असतात. त्यामुळे वजन कमी करताना आहारात समाविष्ट करावे. दह्यात पाणी व कॅल्शीअम चे प्रमाण अधिक असून त्यामुळे अतिरीक्त सेवन टळते.

 

 

6) Calcium च्या पुर्ततेअभावी satiety centers activate होत नाही.

7) (belly fat/wt loss/international journal of obesity)

8) दह्यातील calcium मुळे दात, हाडे मजबूत राहतात.

9) Zinc, lactic acid या दह्यातील घटकांनी त्वचेला उत्तम पोषण मिळते.

 

 

दह्याचे पथ्यापथ्य

आयुर्वेदानुसार, दही कफप्रधान असल्याने रात्री कफकाल असल्याने खाऊ नये. त्याऐवजी दुपारी खावे. गुरू गुणात्मक असल्याने पचनास जड असते. त्यामुळे जेवणापुर्वी किंवा जेवताना खावे. नंतर खाऊ नये. ऊष्ण असल्याने गरम करून खाल्यास पित्चा त्रास होतो. दही रक्तजन्य व्याधी (bleeding disorders) त्वकव्याधी (psoriasis) यांनी खाऊ नये – (स्त्रोत-चरकसंहिता)

ऋतुनूसार दही सेवन

ऊन्हाळा – कोशींबीर, श्रीखंड, लस्सी
हिवाळा – ताजे दही, ताक,
पावसाळा – कढी

 

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version