Site icon InMarathi

तुमच्या झोपण्याची स्थिती सांगते तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल बरंच काही…

sleeping position im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रोगोंकी एक दवा है ती म्हणजे ‘झोप’. कितीही थकलेलं शरीर असलं तरीही एक व्यवस्थित झोप झाली की सगळी दुखणी कमी होतात. जेव्हा माणूस आजारी असतो तेव्हा तर त्याला सक्तीची विश्रांती सांगितली जाते. न ऐकणाऱ्या लोकांना तर डॉक्टर दवाखान्यात ठेवून घेतात.

खूप जणांना पडल्या पडल्या झोप लागते. काही जणांना झोपेची आराधना करावी लागते आणि एक गोष्ट कधी लक्ष देऊन बघितली असेल तुम्ही, प्रत्येक माणसाची झोपण्याची आपली आपली एक पद्धत असते. त्यानुसार माणसाच्या स्वभावाचे विश्लेषण पण मनोवैज्ञानिक सांगतात.

आज आपण अशाच वेगवेगळ्या तऱ्हेने झोपणाऱ्या माणसांच्या स्वभावाबद्दल माहिती घेणार आहोत.

कुणी उताणं झोपतं, कुणी एका अंगावर झोपतं, कुणाला पालथं झोपायची सवय असते तर कुणी पाय पोटाशी घेऊन झोपतं, काही जणांना तर कूस पण न बदलता झोपायची सवय असते. म्हणजे रात्री झोपताना जसे झोपलेले असतात त्याच स्थितीत उठेपर्यंत झोपतात. या प्रत्येक कृतीतून तुमचा स्वभाव समजतो असं मनोवैज्ञानिक सांगतात.

 

 

तुमच्या मनस्थितीशी किंवा व्यक्तिमत्वाशी या सर्वांची सांगड घातली जाते आणि तुम्ही कसे आहात हे या सवयीवरून समजतं.

१. पाठीवर झोपणारे लोक-

जे लोक उताणे किंवा पाठीवर झोपतात ते लोक खूप आशावादी असतात. लोकांचे लक्ष केंद्रित करून घ्यायला अशा लोकांना आवडतं. हे लोक चारचौघात उठून दिसतात आणि एकंदरीत यांच्या सगळ्यांकडून अगदी स्वत:कडून पण फार म्हणजे फारच अपेक्षा असतात. हे लोक स्वप्नाळू असतात.

ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी प्रचंड कष्ट करायची त्यांची तयारी असते. न पटणाऱ्या गोष्टींकडे हे लोक सहज दुर्लक्ष करतात. खोटं बोलणं यांना अजिबात सहन होत नाही. थोडक्यात सांगायचं तर हे लोक आपल्या मनाचे राजा किंवा राणी असतात.

२. एका कुशीवर झोपणारे-

हे लोक अतिशय विश्वासार्ह असतात. भूतकाळाचा फारसा विचार न करता भविष्याचा विचार करतात. तडजोडीला सतत तयार असतात. कठीण परिस्थितीत पण अतिशय नेटाने आणि हसमुख राहून काम करायचा यांचा स्वभाव असतो.

स्वत:बद्दल पूर्ण माहिती असते. त्यामुळे त्यांना अपमानित करणं तितकं सोपं नसतं.

 

 

यातही अजून एक प्रकार असतो, जे लोक एका अंगावर झोपताना हात पसरून झोपतात ते आपल्या मतावर ठाम असतात. थोडक्यात हट्टी असतात. त्यांना टीका सहन होत नाही. मनातून त्यांना थोडंसं असुरक्षित वाटत असतं.

जे एका हाताची उशी करून झोपतात ते नेहमी लोकांच्या मदतीला तयार असतात. हे लोक आपल्या मतापेक्षा नातेसंबध जास्त महत्वाचे मानतात.

३. पाय पोटाशी घेऊन झोपणारे-

खूप लोकांना पाय पोटाशी घेऊन किंवा गुडघे मुडपून झोपायची सवय असते. असे लोक असुरक्षित भावनेने वागत असतात. यांना सतत कुणीतरी आपली काळजी करावी किंवा लाड करावेत अशी त्यांची भावना असते.

स्वभावाने अंतर्मुख असतात त्यामुळे त्यांच्या मनातील ओळखून वागणं तसं कठीणच असतं. काही अंशी असंतुष्ट स्वभावाचे लोक असे झोपतात.

चार लोकात मिसळणे त्यांना जमत नाही. आपला कम्फर्ट झोन त्यांना सोडवत नाही. आपल्या कुटुंबियांशी हे लोक खूप कम्फर्टेबल असतात. काहीसे तुसडे असणारे हे लोक भित्रे असतात.

===

४. पालथे झोपणारे लोक-

या लोकांची इच्छाशक्ती अतिशय चांगले असते.कोणतेही आव्हान झेलण्यास तयार असलेले हे लोक मनाने अतिशय धाडसी असतात. कोणतीही अडचण सोडवण्यात यांचा हातखंडा असतो.

अचूक मार्गदर्शन करतात. पण तरीही मनोवैज्ञानिक सांगतात या लोकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो.

 

 

५. पाठीवर सरळ झोपणारे लोक-

जे लोक पाठीवर म्हणजे उताणे झोपतात, अगदी सावधान पोझिशनमध्ये, तर हे लोक अतिशय कडक स्वभावाचे असतात.आणि ते अतिशय घुमे असतात.

६. उशीला मिठी मारून झोपणारे-

हे लोक एकदम मस्तमौला असतात. अतिशय प्रेमळ, आणि काळजीपूर्वक नाती निभावणारे असे असतात.

आता प्रश्न येतो यातील प्रत्येक प्रकारे आपण कधी कधी झोपत असतो. मग आपण काय समजायचं?

शेवटी मनोवैज्ञानिक काहीही म्हणाले तरी आपण स्वतःला फार उत्तम प्रकारे ओळखत असतो. त्यामुळे खरं काय आहे हे आपल्यालाच माहीत असतं. नाही का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version