' मैसूर राजघराण्याचा काळा इतिहास: राणीच्या एका शापाने संपवला वंश – InMarathi

मैसूर राजघराण्याचा काळा इतिहास: राणीच्या एका शापाने संपवला वंश

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बँगलोरला पर्यटनासाठी गलेली प्रत्येक व्यक्ती ही ‘मैसूर पॅलेस’ बघायला जातेच. भव्य इमारत, आकर्षक प्रकाशयोजना, स्वच्छता यामुळे मैसूर पॅलेसला भेट देणं हे नेहमीच आनंददायी असतं. प्रत्येक सणाच्या वेळी ‘मैसूर पॅलेस’ला जवळपास दीड लाख दिव्यांनी प्रकाशित केलं जातं.

देश विदेशातील पर्यटकांना नेहमीच आनंद देणारी ही जागा! हे राज घराणं ‘शापित’ आहे हे फार कमी जणांना माहीत असेल. मैसूर राज घराणं हे एका राणीच्या शापामुळे ४०० वर्ष म्हणजे अगदी २०१७ पर्यंत त्रस्त होतं हो कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही.

 

mysore palace im

 

“या राज घराण्याला कधीच वारस मिळणार नाही” असा तो शाप होता. मैसूर पॅलेस मधील कानाकोपरा बघितलेल्या व्यक्तींना राजवाड्याच्या या इतिहासाबद्दल फार कमी माहीती असावी.

काय आहे या वास्तूचा इतिहास ? कोणत्या राणीने आणि का या घराण्याला शाप दिला होता ? जाणून घेऊयात.

वाडीयार घराणं हे मैसूर पॅलेस चे राज्यकर्ते आहेत. वाडीयार घराणं पुढे चालवणारे प्रत्येक कारभारी हे दत्तक पुत्र आहेत अशी माहिती २०१७ मध्ये समोर आली आहे. चामुंडेश्वरी देवीचे ते भक्त आहेत. मैसूर पॅलेस मध्ये या देवीची एक मूर्ती आहे. देवीच्या मूर्तीच्या शेजारी राजा तिरुमलाराज आणि त्यांच्या पत्नी राणी अल्मेलम्मा यांची देखील एक मूर्ती आहे.

 

mysore palace 5 im

 

तिरुमलाराज हे मैसूरचे ९वे राजे होते. अशी आख्यायिका सांगितली जाते, की वाडीयार घराण्याने तिरुमलाराज या राजाकडून म्हैसूरचं राज्य धोक्याने मिळवलं होतं. या घटनेनंतर तिरुमलाराज हे आजारी पडले होते. तिरुमलाराज यांचं आजारपण वाढत गेलं आणि त्यातच त्यांचं निधन झालं.

आपल्या नवऱ्याच्या निधनानंतर राणी अल्मेलम्मा यांनी आपले काही दागिने मैसूर येथील मंदिरांना दान केले होते. वाडीयार घराण्याने मैसूर राजवाड्याची मालकी मिळवल्याने त्यांनी राहिलेले दागिने राणी अल्मेलम्मा यांच्याकडून घेऊन येण्यासाठी आपल्या सेवकांना पाठवलं होतं.

राणी अल्मेलम्मा यांनी ते दागिने सेवकांना देण्यास नकार दिला. सेवकांनी बळजबरीने हे दागिने घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा राणी दागिने घेऊन कावेरी नदीकडे पळाल्या.

 

mysore palace secrets 2 im

 

कावेरी नदीमध्ये उडी मारतांना त्यांनी राजवाड्याकडे बघत वाडीयार घराण्याला हा शाप दिला की, “ही नदी ओसाड व्हावी, ही जमीन नापीक व्हावी आणि आम्हाला धोका देणाऱ्या वाडीयार घराण्याला कधीही संतान होऊ नये.”

१६१२ मध्ये राणी अल्मेलम्मा यांनी दिलेला हा शाप ४०५ वर्ष म्हणजे २०१७ पर्यंत कायम होता असं स्थानिक लोक सांगतात. वाडीयार घराणं हे आजवर केवळ त्यांच्या नातेवाईकांना आपल्या गादीवर बसवायचे आणि आपली सत्ता कायम टिकवायचे.

२०१७ मध्ये तत्कालीन राजा यदुवीर कृष्णदत्त चमाराज आणि त्रिशिका कुमारी यांचा राज विवाह संपन्न झाला. या दाम्पत्याला पुत्रप्राप्ती झाली आणि या शापातून वाडीयार घराणं मुक्त झालं असं वाडीयार घराण्यानेच सोशल मीडियावर घोषित केलं होतं.

===

===

राणी अल्मेलम्मा यांच्या शापातून मुक्त होण्यासाठी वाडीयार परिवार हे त्यांच्या मूर्तीची वर्षानुवर्ष पूजा करत. यदुवीर कृष्णदत्त आणि त्रिशिका कुमार यांना झालेला पुत्र हा ‘चमत्कारी’ असल्याचं वाडीयार घराण्याकडून सांगितलं जात आहे.

‘मैसूर पॅलेस’ हा दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी सजवला जातो. दसऱ्याच्या दिवशी साजरा केल्या जाणाऱ्या या सोहळ्याला ‘जंबु सावरी’ या नावाने ओळखलं जातं. या सोहळ्याच्या वेळी मैसूर पॅलेस मधून एक शोभा यात्रा काढली जाते ज्यामध्ये चामुंडेश्वरी देवी आणि राणी अल्मेलम्मा यांची पूजा केली जाते.

 

queen alamalemma

 

राणी अल्मेलम्मा यांनी कावेरी नदीमध्ये ज्या ठिकाणी आपला जीव दिला त्या जागेला ‘तलकाडू’ हे नाव आहे. तलकाडूची जमीन नापीक व्हावी आणि त्याच्या जवळच्या ‘मलंगी’ या जागेत पाण्याचा भोवरा तयार व्हावा अशी इच्छा राणी अल्मेलम्मा यांनी व्यक्त केली होती.

राणीच्या या दोन्ही इच्छा निसर्गाने मान्य केल्या होत्या हे एक आश्चर्य आहे.
तलाकाडू येथील बहुतांश जमीन ही आजही ओसाड आहे आणि मलंगी या जागेत अतिवृष्टी होत असते.

१६१२ मध्ये राणी अल्मेलम्मा यांच्या निधनाची बातमी मैसूर मध्ये पसरताच तिथल्या तत्कालीन वाडीयार घराण्यातील राजाने तिची एक सोन्याची मूर्ती तयार करवून घेतली होती. राजाने मैसूर पॅलेस मधील एका भागात या मूर्तीची विधिवत पूजा करून स्थापना केल्याचे दाखले काही इतिहासकारांनी दिले आहेत.

७ डिसेंबर २००७ रोजी वाडीयार राज घराण्यात मुलाचा जन्म झाला. राणी अल्मेलम्मा हिने वाडीयार घराण्याला आपल्या शापातून मुक्त केलं अशी त्यावर्षी स्थानिक लोकांमध्ये चर्चा झाली.

 

mysore palace 3 im

 

विज्ञान आज खूप पुढे गेलेलं असलं तरीही वाडीयार राज घराण्याला राणी अल्मेलम्मा यांच्या शापावर कोणताही पर्याय काढता आला नाही ही वस्तुस्थिती आहे.

मैसूर पॅलेस आणि त्या संबंधित कथा ही येत्या काही वर्षात एखाद्या दाक्षिणात्य सिनेमातून मोठ्या पडद्यावर बघायला मिळू शकते असा अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?