Site icon InMarathi

औरंगाबादमध्ये या दोन मुलींनी चक्क प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरून आपलं घर बांधलं!

namita and kalyani im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

घर म्हटले की आपले डोळे नकळत ल्काकतात. आपली स्वप्ने भरारी घेऊ लागतात. कारण विषयच तसा आहे. आपले स्वत:चे छोटेसे का होईना पण घर असावे आणि ते आपल्याला हवे तसे सजवता यावे ही खरच खूप इमोशनल गोष्ट आहे.

घर हे फक्त गरज नसून ते आपले सगळेकाही आहे ते तुम्ही नक्कीच मान्य कराल. असेच आपले मनपसंद घर बनवण्याची किमया दोन मैत्रिणींनी केली आहे. कशी? चला जाणून घेऊया.

एकट्या युनायटेड स्टेट्स मध्ये , दररोज १२५ दशलक्षाहून अधिक प्लास्टिकच्या बाटल्या टाकल्या जातात, त्यापैकी 80 टक्के लँडफिलमध्ये संपतात. हा कचरा पुन्हा वापरला जाऊ शकतो आणि तो ही जवळपास १०,०००, १२१००-चौरस-फूट घरे बांधण्यासाठी! (विचारात घेतल्यास एवढ्या आकाराचे घर बांधण्यासाठी सरासरी १४,०००  प्लास्टिकच्या बाटल्या लागतात).

 

 

काय आश्चर्य वाटले ना? पण खरच असं घडू शकतं आणि तुम्हाला अभिमान वाटेल की पर्यावरण रक्षणाच्या या उपायाची सुरवात आपल्या भारतामध्ये झाली. या प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून घर बांधणे ही कल्पना युनिक असली तरी आता सर्वच जगाने तिचे स्वागत केले आहे.

हे “बॉटल ब्रिक” तंत्रज्ञान नऊ वर्षांपूर्वी भारत, दक्षिण आणि मध्य अमेरिकेत सुरू झाले, जे पारंपारिक इमारतींच्या विटांना किफायतशीर आणि पर्यावरणास अनुकूल पर्याय ठरते आहे.

नायजेरिया मध्ये , प्लास्टिकच्या बाटलीपासून घर बांधण्याचे हे तंत्रज्ञान यशस्वी ठरले आहे, ज्यामुळे प्लॅस्टिक कचऱ्याचे परवडणाऱ्या (आणि सुंदर) गृहनिर्माण साहित्यात रूपांतर झाले आहे.

 

 

प्लॅस्टिकच्या बाटल्या माती, वाळू किंवा प्लॅस्टिकच्या पिशव्या भरून पॅक करून विटांसारख्या वापरल्या जातात आणि नंतर त्यांना माती आणि तारांनी बांधून, नियमित विटांपेक्षा 18 पट अधिक मजबूत असलेले भूकंपरोधक घर बांधता येते.

प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बांधलेल्या घराचे फायदे देखील खूप आहेत –

१. हे घर एक प्रभावी थर्मल इन्सुलेशन आहे.

२. ते ऊर्जेचा वापर कमी करते.

३.  हे लँडफिल्सवरील भार कमी करते “पीईटी बाटल्या हलक्या, सहज वाहतूक करण्यायोग्य आहेत आणि पारंपरिक भाजलेल्या विटांपेक्षा, रस्त्यावर सर्वत्र उपलब्ध आहेत.

४.  या पर्यावरण पूरक घराची बांधणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते.

५. प्लास्टिकच्या बाटली पासून बनवलेल्या विटांचा विकास कुटिरोद्योगातही होऊ शकतो, ज्यामुळे अनेकांना उपजीविका मिळते.

बाटल्या भरण्यासाठी आणि पॅक करण्यासाठी पैसे दिले जात असल्याने, वृद्ध आणि अशक्त कामगारांना त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य शोधण्यासाठी सक्षम करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे, यामध्ये पीईटी बाटल्या गोळा केल्या जातात, आकारानुसार हाताने क्रमवारी लावल्या जातात आणि चिखल, फ्लाय अॅश किंवा वाळू आणि प्लास्टीकच्या पिशव्या भरून हवाबंद करुन सीलबंद केल्या जातात.

साइटवरील मातीच्या लोड-बेअरिंग क्षमतेनुसार पाया खंदक खोदला जातो. फाउंडेशनच्या खंदकात PCC चा पाया घातला जातो आणि नंतर पॅक केलेल्या बाटल्या भिंतीच्या दुप्पट रुंदीच्या आत जमिनीच्या पातळीपर्यंत ठेवल्या जातात. वर सिमेंट मोर्टार स्लरी ओतली जाते.

 

 

सिमेंट मोर्टार बाटल्यांना एकत्र जोडते. प्लॅस्टिकच्या बाटल्या नंतर भिंती बनवण्यासाठी स्टॅक केल्या जातात. यासाठी शेण किंवा मातीचे लिंपण केले जाते. घराचे छत तसेच खिडक्या, दरवाजे करण्यासाठी लाकूड किंवा फायबर वापरले जाते.

मित्रांनो ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचे कारण हे की असेच पर्यावरण पूरक बाटल्यांचे घर औरंगाबादमध्ये फाईन आर्ट्सचे शिक्षण घेणार्‍या दोन मैत्रिणी बांधले आहे आणि ५ जून या जागतिक पर्यावरण दिनी (world environment day) त्यांच्या या कलाकृतीचं अनावरण झाले आणि त्यांनी बनवलेले हे प्लास्टिकचे टुमदार, देखणं घर आता सर्वांना बघण्यासाठी खुले झाले आहे.

प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या बाटल्या किती घातक आहेत, त्यांचे दुष्परिणाम काय आहेत , हे आपण जाणतोच.. पण तरीही त्याचा वापर काही कमी होत नाही. पाण्याच्या, कोल्ड्रिंक्सच्या हजारो बाटल्या कचरा म्हणून दिवसाखेरीस रोज जमा होतात.

 

 

बाटल्यांचा नेमका आणि अतिशय देखणा उपयोग करून औरंगाबाद जिल्ह्यातील शरणापूर येथील दोन मैत्रिणींनी त्यांपासून चक्क घर बांधले आहे.

नमिता कपाले आणि कल्याणी भारंबे या दोघी मैत्रिणी. नमिता आणि कल्याणी या दोघीही फाईन आर्ट्सचे शिक्षण घेत आहेत. लॉकडाऊन सुरू असताना कॉलेज बंद असल्याने दोघी मैत्रिणी घरीच होत्या. नवीन काहीतरी शोधण्यासाठी इंटरनेटवर सर्चिंग करताना त्यांना गुवाहाटी येथील विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या बाटल्या वापरून केलेली एक कलाकृती दिसली.

ती कलाकृती त्यांच्यासाठी एक स्पार्क ठरली आणि प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे घर बांधण्याच्या कल्पनेला चालना मिळाली. प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याची ही आयडिया त्यांना भारीच क्लिक झाली आणि त्यांनी तसाच प्रयोग करायचा ठरवला.

जागा शोधण्यापासून ते प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करण्यापर्यंत सगळेच करायचे होते. एका शेतातली जागा त्यांना मिळाली मग शोध सुरू झाला तो प्लास्टिकच्या बाटल्यांचा आणि प्लास्टिक पिशव्यांचा…

त्यांनी खेडेगावात असतं तसंच ऐसपैस घर बनवायचं ठरवलं. त्यामुळे बाटल्या आणि प्लास्टिक त्यांना भरपूर प्रमाणात लागणार होते. त्यासाठी त्यांनी गावातील कचरा वेचणार्‍या लोकांना गाठले आणि त्यांच्याकडून बाटल्या जमा करण्यास सुरवात केली.

नातलग, मित्रमंडळी, परिसरातील दुकाने आणि कॉलनीतील इतर घरांमध्येही त्यांनी प्लॅस्टिकच्या अशा रिकाम्या बाटल्या त्यांना देण्याची विनंती केली. त्यांचे म्हणणे आणि त्यांचा उद्देश कळल्यावर सगळीकडूनच त्यांच्याकडे बाटल्या आणि प्लास्टिकचा ओघ सुरु झाला.

 

 

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये अगदी खच्चून प्लास्टिकच्या पिशव्या भरायच्या, त्यातली सगळी अतिरिक्त हवा काढून घ्यायची आणि ती बाटली पॅक करायची. अशा पद्धतीने त्यांनी प्लास्टिक बाटल्यांपासून आगळ्या- वेगळ्या पद्धतीच्या प्लास्टिकच्या विटा बनवल्या.

अशा पद्धतीने तयार केलेल्या बाटल्यांच्या विटा एकमेकांवर रचल्या आणि त्याला माती व शेण यांचे मिश्रण करून लिंपण केले. आणि घराच्या भिंती तयार झाल्या. त्यांच्या या प्रयोगात आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी गुगलची मदत घेतली.

===

===

घराचे छत तयार करण्यासाठी त्यांनी बांबू आणि लाकूड यांचा वापर केला आहे. घराचे दरवाजे आणि खिडक्या लाकडाचे आहेत. जवळपास ४ हजार चौरस फुटांवर त्यांनी हे घर उभारले असून यासाठी तब्बल १६ हजार प्लास्टिकच्या बाटल्या आणि जवळपास १५ टन प्लास्टिक पिशव्या त्यांनी त्यासाठी वापरल्या आहेत.

आपल्या या घराला त्यांनी ‘वावर’ हे नाव दिले आहे. घर पाहण्यासाठी आलेल्या प्रत्येकाने त्यांच्या या अभिनव आणि कलात्मकतेचे कौतुक केले आहे.

आज जगभर प्लॅस्टिकच्या कचर्‍याची समस्या भेडसावत आहे. प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या हा पर्यावरणाच्या दृष्टीने खरोखरंच चिंतेचा विषय होत आहे. पण आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्लास्टिकचा वापर रास्ते बांधणी, घर बांधणी याबरोबरच कापड निर्मितीसाठी केला जात आहे.

 

 

विशेष म्हणजे प्रसिद्ध लेव्हीस जीन्स बनवताना देखील या प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर केला जात आहे. तेव्हा जर प्लास्टिक कचर्‍याचा पुनर्वापर केला गेला, तर नक्कीच प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो, हेच या दोघींनी त्यांच्या या अनोख्या प्रयोगातून दाखवले आहे.

मित्रांनो, नव्या कल्पनांसाठी आकाशाच्या पुढे ही एक आकाश असते नाही का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version