आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – ओंकार जोशी
===
हेलो, अरे आज मी नवीन लॅपटॉप घेतला. 1टीबी हार्डडिस्क, 4जीबी रॅम, I5 processor , 5TH GENERATION लॅपटॉप आहे कि नाही भारी???’
हो तर, एकदम मस्तच आहे. बाकी सगळं समजलं पण हे 5th generation काय भानगड आहे???? माहिती आहे का काही तुला???
नाही रे बाबा. मलाही नाही माहिती.
तर असं आहे हे. आपल्या दैनंदिन वापरातले संवाद, पण बर्याच लोकांना माहिती नसतं. चला तर मग जाणुन घेऊयात, हे generation नेमकं काय प्रकरण आहे ते.
जेनेरेशन म्हणजे काय? तर एक संगणक संज्ञा, जी संगणकात काळनुरुप जे बदल होत गेले ते मांडणारी. सुरुवातीच्या काळात जनरेशन ही संज्ञा दोन हार्डवेअर तंत्रज्ञानातील बदल सांगण्यासाठी वापरली जात असे. पण आजच्या काळात हार्डवेअर सॉफ्टवेअर म्हणजे एकंदरित संपूर्ण संगणकाबद्ल माहितीसाठी वापरली जाते.
1st Generation Computer
1st Generation Computer हे संगणक युगातील अत्यंत सुरुवातीच्या काळातील संगणक होत. १९४६ ते साधारण १९६० च्या जवळपासच्या काळ हा 1st Generation Computer चा काळ म्हणुन ओळखला जातो. माहिती साठवण्यासाठी व प्रोसेसिंगसाठी Vacuum Tubes चा वापर हा होत असे. ह्या ट्युब्सना वारंवार बदलावे लागत असे.
आपल्या घरातील ट्युबलाईट प्रमाणेच ह्यासुद्धा त्याकाळात फार लवकर खराब होत आणि खुप जास्ती प्रमाणात उष्णता निर्माण करत असत. हृयामुळे ह्या संगणकांना मोजक्याच काही कंपनी वापरत असत. ह्या संगणकातुन केलेली आकडेमोड त्याकाळानुसार कदाचित असेलही, पण आजच्या काळानुसार बिल्कुलही विश्वासार्ह नव्हता.
1st Generation Computer ची काही उदाहरणेः- UNIVAC, IBM-701, IBM-650
2nd Generation Computer
१९५९ ते १९६५ हा काळ 2nd Generation Computer चा काळ म्हणुन ओळखला जातो.
2nd Generation Computer हे 1st Generation Computer पेक्षा थोडे ऍडव्हान्स्ड होते. संगणकीय आकडेमोड ही 1st Generation Computer पेक्षा थोडी विश्वसनीय आणि जलद होती. ह्याप्रकारच्या संगणकात ट्रान्झिस्टर्स(Transisters) हे प्रथमच वापरात आणल्या गेले.
हे ट्रान्झिस्टर्स हे 1st Generation Computerमधील Vacuum Tubes पेक्षा स्वस्त होते, आकाराने लहान होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, Vacuum Tubes पेक्षा कमी ऊर्जा लागत असे. माहिती साठवण्यासाठी हृया संगणकात मॅगनेटिक कोअर वापरले जात.
FORTRAN, COBOL सारख्या संगणकीय भाषा ह्या संगणकात वापरल्या गेल्या.
2nd Generation Computer ची काही उदाहरणेः- IBM-1620, IBM-7094, CDC-3600
3rd Generation Computers
3rd Generation computers १९६५ ते १९७१ ह्या काळातील संगणक. 2nd Generation Computer हे 1st Generation Computer पेक्षा थोडे स्वस्त म्हणजे काय तर दगडापेक्षा वीट मऊ हा प्रकार.
जरी किंमत कमी असली तरीही हे संगणक महाग तर होतेच, पण त्याचबरोबर आकारानेही मोठे होतेच. जॅक किल्बी नावाच्या माणसाने IC (Integrated Circuits) चे संशोधन केले. एका IC मध्ये भरपुर ट्रान्झिस्टर्स, कॅपॅसिटर्स वगैरे घटक असत. ह्या संशोधनामुळे संगणकात अभूतपुर्व असे बदल झाले. संगणकांचा आकार कमी झाला, संगणकाची कार्यक्षमता जलद झाली तसेच संगणकीय आकडेमोड सुद्धा विश्वसार्ह झाली.
High level languages (FORTRAN-II V, COBOL, PASCAL,ALGOL) ह्यांचा वापर ह्या संगणकात झाला. ह्या सर्व गोष्टी असूनही ह्या संगणकांची किंमत अजुनही जास्तीच होती.
3rd Generation Computers ची काही उदाहरणे :- IBM-360 SERIES, Honeywell-6000 series, TDC-316
4th Generation Computers
4th Generation Computers चा काळ होता १९७१ ते १९८० च्या दरम्यानचा. ह्या संगणकामध्ये व्ही.एल.एस.आय.(व्हेरी लार्ज स्केल) इंटिग्रेटेड सर्कीटस् चा वापर झाला.
व्ही.एल.एस.आय. सर्कीटस् मध्ये जवळजवळ 4500-5000 ट्रान्झिस्टर्स सामावुन घेण्याची क्षमता होती. ही ४५००-५००० ट्रान्झिस्टर्स आणि त्यांची बाकी घटक एकाच छोट्याश्या चिपमध्ये सामावुन घेतल्यामुळे मायक्रोकंपुटर्स (MICROCOMPUTERS) चा निर्माण शक्य झाला. 4th Generation Computers हे पहिल्या तीन संगणकांच्या मानाने अधिक जलद, अधिक विश्वासार्ह संगणकीय आकडेमोड देवू शकत असत. त्याचप्रमाणे, एकुणच आकाराने आणि किंमतीने स्वस्त झाले.
ह्यातुनच पि.सी. (P.C.) ही संकल्पना अस्तित्वात आली. जसे जसे संगणक आधुनिक होत गेले, तसे तसे त्यांच्या ओ.एस.(OPERATING SYSTEM) मध्येसुद्धा आधुनिकीकरण होत गेले.
4th Generation Computers मधील ओ.एस. मध्ये प्रथमच आपल्याजवल सदासर्वदा असणार्या इंटरनेटचा वापर झाला. सर्व High level languages (C, C++, DBASE, COBOL इ.) ह्यांचा वापर ह्या संगणकात झाला.
4th Generation Computers ची काही उदाहरणे :- Super Computers
5th Generation Computers
5th Generation Computers ह्यांचा काळ आहे १९८० ते आजपर्यंतचा.
ह्या संगणकामध्ये व्ही.एल.एस.आय.(व्हेरी लार्ज स्केल) इंटिग्रेटेड सर्कीटस् ह्यांना यु.एल.एस.आय.(अल्ट्रा लार्ज स्केल) इंटिग्रेटेड सर्किट्सने. ह्या सर्किट्समध्ये मायक्रोप्रोसेसर चिप्सचा वापर झाला. ह्या चिप्समध्ये १० मिलियन इलेक्ट्रॉनिक घटक बसु शकत असत.
स्वयंविचार करण्याची क्षमता ह्या संगणकात होती. ह्यालाच आर्टिफिशियल इंटेलिजेन्स म्हणतात. एखाद्या गोष्टीवर विचार करुन त्यावर माणसांप्रमाणे निर्णय देण्याची क्षमता ह्यात विकसित केली होती.
वर्च्युअल गेमींग ह्याच संगणकात सुरु झाली. सर्व High level languages (C, C++, DBASE, COBOL इ.) ह्यांचा वापर ह्या संगणकात झाला. एकावेळी अनेक ऍप्लिकेशन्स, प्रोसेसेस कार्यप्रणाली, ज्याला आपण MULTITASKING, MULTIPROCESSING म्हणुन ओळखतो, ह्याच संगणकांत होती.
5th Generation Computers ची काही उदाहरणे :- Desktop, Laptop, Mobiles इ.
कळानुसार या जनरेशन्समध्ये सतत नवे बदल होत आहे, प्रगती होत आहे.
आता पुढच्यावेळी Generation म्हणजे काय असा प्रश्न पडणार नाही ना???
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.