सरोज खानने रेखाला सेटवर इतकं सुनावलं की तिला अश्रू अनावर झाले
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सिनेमा तयार होतो. लोक हौसेने बघायला जातात. वास्तविक फक्त भारतीय सिनेमातच गाणी नृत्य यांची रेलचेल असते. हिंदी सिनेमेच तीन तासाचे असतात. पाश्चात्य सिनेमे हे दीड तासात संपतात.
हिंदी सिनेमातील काही गाणी ही त्यांच्या शब्दापेक्षा त्या गाण्यावरील डान्समुळे आठवणीत राहतात. उदा. नैनो मे सपना. हे कवायत छाप अॅक्शन असलेलं गाणं. भगवान दादांची स्टाईल, गोविंदाची कितीतरी गाणी, माधुरीची गाणी.
अशी कित्येक गाणी आहेत, कितीतरी डान्स आहेत. या गाण्यावर नायक नायिका नाचताना दिसत असले तरी त्यासाठी खरं कसब असतं ते त्यांच्या कोरिओग्राफरचं. त्या त्या गाण्याच्या शब्दांवर चपखल अॅक्शन, भावमुद्रा हे सर्व नायक नायिका नाही तर नृत्य दिग्दर्शक ठरवतात.
थोडक्यात सांगायचं तर नायक नायिका कळसूत्री बाहुली असतात. दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक यांच्या तालावर त्यांना नाचावे लागते.चिन्नी प्रकाश, प्रभुदेवा, फराह खान, गणेश आचार्य, सरोज खान ही नामवंत नृत्य दिग्दर्शकांची नावे.
भारतीय सिनेसृष्टीमधील एकेकाळची आघाडीची नृत्य दिग्दर्शिका म्हणजे सरोज खान. दोन वर्षांपूर्वी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण आजही त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक रचना अजरामर आहेत. माधुरी दीक्षित त्यांची सर्वात आवडती शिष्या मानली जाते. माधुरी पण आजही त्यांचे नाव विलक्षण आदराने मास्टरजी म्हणून घेते.
श्रीदेवीवर चित्रित झालेलं हवा हवाई, चांदनी मधील मेरे हाथो मे नौ नौ चुडिया है या गाण्यांची कोरिओग्राफी त्यांनीच केली होती. तेजाब मधील ज्या एक दो तीन गाण्याने माधुरीला स्टारडम दिला ते गाणे त्यानीच बसवले होते. थानेदार मधील तम्मा तम्मा लोगे, आणि बेटा मधील धक धक करने लगा हे त्यांचे मास्टरपीस.
हमको आजकल है इंतजार या गाण्यावर माधुरी किती सुंदर नाचली आहे. तिला आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या सरोज खानच होत्या. देवदास या बहुचर्चित आणि बहुखर्चिक सिनेमातील डोला रे डोला या गाण्याच्या नृत्य दिग्दर्शनासाठी तर सरोज खान यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
सरोज खान या अतिशय कठोर शिक्षिका होत्या. शंभर टक्के व्यायसायिकता असलेला त्यांचा स्वभाव भल्या भल्या स्टार लोकांना पण चांगलाच माहीत होता. अगदी त्यांची आठ महिने पाच दिवस झालेली मुलगी गेली. तरी तिचा दफनविधी उरकून सरोज खान हरे कृष्ण हरे राम च्या शूटिंगसाठी निघून गेल्या होत्या.
सिनेमा सृष्टी ही आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेरची असते. इथे होणारी प्रेमप्रकरणे, मैत्री, दुष्मनी यांचा आपण विचारही करू शकणार नाही. सुपरस्टार म्हणून असलेल्या हिरो लोकांचा ईगो, हिरोईन लोकांचे नखरे हे सर्व सांभाळत एखादा प्रोजेक्ट पूर्ण करताना निर्मात्याच्या तोंडाला फेस येतो. तिथे दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक यांची काय कथा. आपली स्टार व्हॅल्यू दाखवायचा एकही प्रसंग न सोडणारे लोक इथे आहेत.
फार कमी लोक नम्र, जमिनीवर पाय असलेले आहेत. पैसा प्रसिद्धी यांनी भरलेलं बॉलीवूड लोकांना तुच्छ वागणूक सहजासहजी देतं. पण एखादी व्यक्ती त्यांना आपल्या सध्या कृतीतून जमिनीवर पण सहज आणते.
अशीच एक घटना सरोज खान आणि रेखा यांच्याबाबतीत घडली होती. सरोज खाननी रेखाला असं काही सुनावलं की रेखा ओक्साबोक्शी रडली होती. रेखा ही चतुरस्त्र अभिनेत्री. एके काळी तिचाही दरारा होताच की. स्टारडम होता.
१९९० साली आलेल्या शेषनाग या सिनेमाची नायिका रेखा होती. या नायक नायिकांचे पण आवडते कोरिओग्राफर असतात बरं! म्हणजे तो त्यांचा कम्फर्ट झोन असतो असं म्हणूया. तर या सिनेमातील एक गाण्यावर रेखाला नृत्य करायचं होतं. ते गाणं रेकॉर्ड होऊन आलं. निर्मात्याने सांगितलं तीन दिवसात या गाण्याचं शूटिंग करायचं आहे.
सरोज खान यांनी आपल्या टीमसोबत सगळ्या स्टेप्स बसवल्या. आणि शूटिंग करण्याआधी रिहर्सल करण्यासाठी रेखाला निर्मात्याकडून बोलावणं पाठवलं. अतिशय अवघड स्टेप्स आहेत आणि तुम्ही त्यांना लवकर पाठवून द्या अशी विनंती सरोज खान यांनी केली होती. पण रेखा आली नाही.
आपली तब्येत बरी नाही असा उलट निरोप रेखाने पाठवला. पण त्याचे वेळी ती दुसरीकडे शूटिंग करायला जात होती. मग शूटिंगसाठी रेखा आली. पण तिने त्या डान्स साठी आवश्यक असलेला कॉस्चूम घातला नव्हता. केवळ मेकअप करून ती आपल्या कारमध्ये बसून राहिली होती.
===
अमिताभसारखा वेष करून रेखाच्या आसपास असणारी ही ‘खास’ व्यक्ती नक्की आहे तरी कोण?
ना जाहिरात, ना सिनेमा, तरी सगळ्यांची आवडती रेखा स्वतःचं घर कसं चालवते..वाचा!
===
सरोज खान बाहेर गेल्या. आणि त्यांनी रेखाला विचारले काय झाले? तर तिने उत्तर दिले, आजचं शूटिंग कॅन्सल करा. माझी तब्येत ठीक नाहीय. पण प्रत्यक्षात तसं काही वाटत नव्हतं. मग सरोज खान रेखाला स्पष्ट शब्दात म्हणाल्या, “रेखाजी, मला असं वाटतंय तुम्हाला माझी अॅलर्जी आहे. मी तुम्हाला रिहर्सलला बोलावलं तुम्ही आला नाहीत. शूटिंगसाठी म्हणून येता आणि सांगता मला बरं वाटत नाही. तुम्हाला माझ्यासोबत काम करायचं नसेल तर तुम्ही निर्मात्यांना तसं स्पष्ट सांगा की, तुम्हाला डान्स मास्टर बदलून हवी आहे. मला सरोज खान सोबत काम करायचं नाहीय. मला यात मी काही चुकीचं बोललेय असं नाही वाटत. तुम्ही आज शूटिंग करायला हरकत नाही.”
रेखा थक्कच झाली. कारण ती हिरोईन होती. तिला असं थेट सुनावणारं कुणी भेटलं नसेल. मी करेन शूटिंग असं म्हणून रेखा आत निघून गेली. आणि थोड्या वेळाने रेखाची सेक्रेटरी सांगत आली तुम्ही काय बोलला त्यांना? त्या रडायला लागल्या आहेत.
मग सरोज खान तिच्यसोबत आत गेल्या. आणि त्यांनी रेखाला विचारलं काय झालं? मग रेखा म्हणाली, “मला तुमचा इतका आदर वाटतो आणि तुम्ही मात्र मला म्हणाला तुझी कामावर श्रद्धा नाही.” मग सरोज खान रेखाला समजवण्यात म्हणाल्या, “मी म्हणाले त्याचा अर्थ असा नव्हे, प्रत्येक नटाचा कुणी ना कुणी आवडता डान्स मास्टर असतो. ते त्यांना बोलावतात. गोविंदा डिम्पल यांचा चिन्नी प्रकाश आवडता नृत्य दिग्दर्शक आहे कारण त्यांना त्याची स्टाईल आवडते म्हणून का मी त्यांच्यावर रागवायचं? श्रीदेवी मला बोलावते. कारण तिला माझ्या स्टेप्स आवडतात. त्या कुणाला आवडत नाहीत. त्यात एवढं रागावण्याचं मला काही कारण नाही. तुला माझ्या स्टेप्स आवडत नसतील तू तसं सांगून मोकळी हो इतकच माझं म्हणणं होतं.”
रेखाचा राग थोडा निवळला. आणि रेखा नृत्यासाठी आली. आणि तिने इतका सुंदर डान्स केला की आजवर तसा झाला नाही. पण तो सरोज खान यांच्या बोलण्याचा वचपा काढून तुम्ही म्हणता ना माझी कामावर श्रद्धा नाही.. बघा मी कसा डान्स करते हे कृतीतून दिलेलं उत्तर होतं.
अशा रीतीने रागाचा पण सकारात्मक वापर झाला. त्यानंतर सरोज खान आणि रेखा यांच्यात कधीही वाद झाले नाहीत. सरोज खान जाईपर्यंत त्यांचे एकमेकींशी संबंध चांगले होते.
कधी कधी मोठे लोक पण लहान मुलांपेक्षा लहान होऊन वागतात ना?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.