स्टॅलिनच्या मुलीचे भारताशी असलेले संबंध आणि तिचं प्रेम प्रकरण भारतालाच महागात पडणार होतं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जागतिक राजकारणात रुची असणाऱ्या लोकांना ‘जोसेफ स्टॅलिन’ हे नाव परिचित असणार हे नक्की. १९२२ ते १९५३ या काळात जोसेफ स्टॅलिन या व्यक्तीने सोव्हिएत युनियनचं (रशिया) नेतृत्व केलं होतं.
‘चेअरमन ऑफ द काऊन्सिल ऑफ मिनिस्टर्स ऑफ द सोव्हिएत युनियन’ हे पद भूषवणाऱ्या या व्यक्तीने आपल्या नेतृत्व क्षमतेच्या जोरावर त्यांनी रशियावर ज्याप्रकारे एक हाती सत्ता मिळवली आणि टिकवली होती तो इतिहास वाचला तर त्यांचा समावेश जगातील सर्वश्रेष्ठ नेत्यांमध्ये का केला जातो? हे लक्षात येऊ शकतं.
१८ डिसेंबर १८७८ रोजी रशिया मधील जॉर्जिया येथे जन्म झालेल्या जोसेफ स्टॅलिनने ‘लोकसेवक’ म्हणून कामास सुरुवात केली, नंतर ते रक्षामंत्री झाले, नंतर सोव्हियत युनियनच्या मंत्रिमंडळाचे ‘चेअरमन’ आणि मग ‘जनरल सेक्रेटरी’ असा यशस्वी प्रवास केल्याने जागतिक राजकारणात हे नाव सन्मानाने घेतलं जातं.
जोसेफ स्टॅलिनच्या मुलीचा भारताशी संबंध होता. जोसेफ स्टॅलिनच्या मुलीचं एका भारतीय व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण होतं जे की भारताला महागात पडणार होतं. जोसेफ स्टॅलिनच्या मुलीचं आयुष्य हे ‘जेम्स बॉण्ड’च्या एखाद्या सिनेमा प्रमाणे होतं असं बोललं जातं. काय होतं हे प्रकरण? जाणून घेऊयात.
‘स्वेत्लाना अलिलुयेवा’ हे जोसेफ स्टॅलिन यांच्या मुलीचं नाव होतं. जोसेफ स्टॅलिन त्यांच्या मुलीला लाडाने “माझी छोटी चिमणी” या नावाने संबोधन करायचा. स्वेत्लाना अलिलुयेवा हिला पर्यटनाची प्रचंड आवड होती. आपली ही आवड जोपासण्यासाठी ती कित्येक वेळेस भारतात आली होती.
स्वेत्लाना अलिलुयेवा यांच्या एका भारत भेटीत त्यांची ब्रजेश सिंग या भारतीय व्यक्तीसोबत ओळख झाली. काही वर्षांनीं या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, दोन्ही बाजूने या नात्याला तीव्र विरोध झाला.
उत्तर प्रदेशच्या एका राजेशाही घराण्याचा वारसदार असलेला कुंवर ब्रजेश सिंग हा काही काळांसाठी सोव्हिएत युनियन मध्ये राहिलेला होता. रशियाची राजधानी मॉस्को येथे १९३० मध्ये ब्रजेश सिंग रशियात असतांना त्याला स्वेत्लाना अलिलुयेवा सोबत लग्न करायचं असल्यास त्याला ‘कम्युनिझम’ला मान्यता देण्यासाठी बळजबरी करण्यात आली. पण, स्वेत्लाना अलिलुयेवाची अशी कोणतीही इच्छा नव्हती. रशियन लोकांचा विरोध पत्करून हे दोघं ‘सोची’ या रशियामधील एका शहरात आजीवन एकत्र राहिले जी की त्या काळात मोठी गोष्ट होती.
३१ ऑक्टोबर १९६६ रोजी ब्रजेश सिंग यांचं रशियात निधन झालं. स्वेत्लाना अलिलुयेवा यांचा पती अशी तोपर्यंत रशियात ओळख झालेल्या ब्रजेश सिंग यांच्यावर भारतीय हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार व्हावेत अशी भारतीयांची इच्छा होती. पण, सोव्हिएत युनियनचे लोक तसं होऊ देत नव्हते.
हे प्रकरण त्या काळात खूप गाजलं होतं आणि त्यामुळे भारत आणि ओव्हिएत युनियन मधील संबंध काही काळासाठी बिघडले होते. दोन्ही देशातील वाढता तणाव बघून सोव्हिएत युनियनने ब्रजेश सिंग यांच्यावर भारतीय हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार करण्याची परवानगी दिली होती.
स्वेत्लाना अलिलुयेवा यांची देखील अशी इच्छा होती की, ब्रजेश सिंग यांच्यावर भारतीय पद्धतीनेच अंतिम संस्कार व्हावेत, त्यांच्या अस्थींचं विसर्जन गंगा नदीत व्हावं आणि ती इच्छा त्यांची पूर्ण झाली. स्वेत्लाना अलिलुयेवा या स्वतः ब्रजेश सिंग यांच्या अस्थींना घेऊन उत्तर प्रदेश मध्ये आल्या आणि त्या अस्थी विसर्जन करून ब्रजेश सिंग यांच्या घरी ७ महिने राहिल्या.
स्वेत्लाना अलिलुयेवा यांची ब्रजेश सिंग यांच्या चितेमध्ये उडी मारून आपण ‘सती’ जावं अशी सुद्धा इच्छा होती. ही इच्छा त्यांनी रशियातील माध्यमांना बोलून दाखवली होती. पण, रशियाच्या तत्कालीन राष्ट्रप्रमुख अलेक्सि कोसीजीन यांनी मध्यस्थी करून स्वेत्लाना अलिलुयेवा यांना असं कोणतंही पाऊल उचलण्यास सक्त मनाई केली होती.
स्वेत्लाना अलिलुयेवा या रशियातील समस्त लोकांचा विरोध पत्करून ब्रजेश सिंग यांच्या निधनाच्या दोन महिन्यांनी त्या भारतात आल्या होत्या. ब्रजेश सिंग यांच्या अलाहाबाद जवळील एका खेड्या गावात त्या राहिल्या होत्या आणि त्यांनी या जागेला ‘नंदनवन’ अशी उपमा दिली होती. त्यांचं अधिक वास्तव्य हे नवी दिल्ली येथील सोव्हिएत युनियनच्या अतिथीगृहात असायचं. पण, तरीही त्या नेहमीच भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी प्रयत्न करायच्या.
स्वेत्लाना अलिलुयेवा यांना भारताचं नागरिकत्व देणं म्हणजे सोव्हिएत युनियनसोबत वैर घेणं हे भारताच्या लक्षात आलं होतं.
भारताच्या विदेश मंत्रालयाने या प्रकरणावर भाष्य करतांना हे सांगितलं होतं की, “स्वेत्लाना अलिलुयेवा यांच्या विनंतीला उत्तर देणं हे आमच्यासाठी कठीण काम होतं. कारण, या एका व्यक्तीला भारतीय नागरिकत्व देणं हे सोव्हिएत युनियन सोबत युद्ध पुकारण्यासारखं होतं.”
आपल्याला भारताचं नागरिकत्व मिळू शकत नाही याची खात्री पटून सुद्धा स्वेत्लाना अलिलुयेवा या ब्रजेश सिंग यांच्या मृत्यूनंतर ३ महिने भारतात राहिल्या. भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी त्यांनी नवी दिल्लीत असलेल्या अमेरिकेच्या ‘एम्बेसी’ला संपर्क साधला.
===
जगातील सर्वात क्रूर व्यक्तीचं क्रौर्य केवळ वाचतानाही अंगावर काटा येतो
…आणि अमेरिकेने अख्खं जहाजच गायब केलं, डोकं भंडावून सोडणारं रहस्य!
===
स्वेत्लाना अलिलुयेवा ज्यावेळी या कार्यालयात पोहोचल्या तेव्हा ते कार्यालय बंद होतं. त्यांनी चतुराईने भारतात असलेल्या अमेरिकेचे राजदूत ‘चेस्टर बोवेल्स’ यांची भेट घेतली. अमेरिकेनेसुद्धा या विनंतीवर सावध प्रतिक्रिया दिली. स्वेत्लाना अलिलुयेवा यांनी ही विनंती लिखीत स्वरूपात दिली तरीही अमेरिकेने त्यावर कोणतंही उत्तर दिलं नाही.
सेंट्रल इंटेलिजन्स अकॅडमी या संस्थेने स्वेत्लाना अलिलुयेवा यांना ३ महिन्याची मुदत संपल्यावर भारतातून बाहेर जाण्यास सांगितलं. त्या भारतातून इटलीला गेल्या, तिथून त्या स्वित्झर्लंडला गेल्या आणि तिथून त्या अमेरिकेला गेल्या. भारताने त्यानंतर या प्रकरणाची माहिती देणं बंद केलं.
१९७१ मध्ये भारत आणि सोव्हिएत युनियन यांच्यात एक मैत्री करार करण्यात आला ज्याद्वारे दोन्ही देशांनी एकमेकांना देशविरोधी करणाऱ्या व्यक्तींची माहिती द्यायची असं ठरवण्यात आलं.
काही वर्षांनी स्वेत्लाना अलिलुयेवा यांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं. त्यांनी अमेरिकेत ब्रजेश सिंग यांच्या नावाने एका सेवाभावी संस्थेची स्थापना केली. १९८० मध्ये त्या सोव्हिएत युनियन परतल्या आणि त्यानंतर त्या इंग्लंडमध्ये राहू लागल्या. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्या अमेरिकेत रहायच्या.
२२ नोव्हेंबर २०११ रोजी स्वेत्लाना अलिलुयेवा यांचं निधन झालं. ‘द विस्कॉन्सिन स्टेट जर्नल’ या वर्तमानपत्राला दिलेल्या शेवटच्या मुलखातीत स्वेत्लाना अलिलुयेवा यांनी सांगितलं होतं की, “मी स्वित्झर्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका कुठेही गेलो तरीही मी नेहमीच जोसेफ स्टॅलिन यांच्या नावाची राजकीय कैदीच होते.”
जोसेफ स्टॅलिन आणि त्यांची मुलगी स्वेत्लाना अलिलुयेवा यांचं एकमेकांसोबत असलेलं नात्यात सर्व काही आलबेल नव्हतं. पण, त्यांच्यातील व्यक्तिगत संघर्षाचं नुकसान हे भारताला होणार होतं याबाबतीत फार कमी जणांना माहीत असेल.
स्वेत्लाना अलिलुयेवा यांची ही प्रेमकथा आणि जीवनपट येत्या काही वर्षात मोठ्या पडद्यावर बघायला मिळेल असा अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.